माढ्याचे ग्रामदैवत – माढेश्‍वरी देवी

12
193

माढा हे सोलापूरच्‍या माढा येथील तालुक्‍याचे गाव. तेथील ग्रामदैवत माढेश्‍वरी हीच्‍या नावावर त्या गावाचे माढा असे पडले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेची प्रतिरूपे सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आढळून येतात. त्‍यांमध्‍ये प्रसिद्ध असलेली ठिकाणे तीन – सोलापूरची रूपाभवानी, करमाळ्याची कमलाभवानी आणि माढ्याची माढेश्वरी.

माढेश्वरी देवीचे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्‍वात असल्‍याचे मानले जाते. मात्र त्‍यास कोणताही पुरावा नाही. महादजी निंबाळकर (शिवाजी महाराजांचे जावई) यांच्‍या दासीपुत्राचा मुलगा रावरंभाजी निंबाळकर यांना 1710 नंतर माढ्याची जहागिरी मिळाली. त्‍यानंतर त्‍यांनी माढेश्‍वरीचे मंदिर उभारले. ते मंदिर दगडी, हेमाडपंथी शैलीतील आहे. मंदिराच्या आसपास बराच मोठा परिसर आहे; बऱ्यापैकी स्वच्छ आहे. पुजारी नावाच्या परिवाराकडे त्या देवळाची देखभाल करण्याचे काम आहे. तो परिवार, त्यांच्यापैकी एक सदस्य तेथे राहूनच देखभाल करत आहे. त्‍या परिवारातील पुजारी मॅडम आम्हाला भेटल्या. त्या स्वत: सत्त्याहत्तर/ अठ्ठ्याहत्तर वर्षांच्या आहेत. त्यांच्या मदतीला गोरेबाई आहेत. त्या दोघी मिळून व्यवस्था पाहतात. देखभालीसाठी ट्रस्ट स्थापन केलेला आहे.

मंदिराच्या परिसरापासून काही अंतरावर किल्ला होता. आता किल्ल्याचे फक्त दोन बुरुज बाहेरून दिसतात. फार पूर्वी त्या किल्ल्यापासून ते माढेश्वरी मंदिरापर्यंत भुयारी रस्ता अस्तित्‍वात होता. त्या मार्गाचा वापर किल्ल्यावरील स्त्रियांना देवळात येण्यासाठी होत असे. मंदिराच्या बाजूने ते भुयार बंद केलेले आहे असे पुजारी मॅडमनी सांगितले. अनेक वर्षांपूर्वी मंदिराच्‍या शेजारून छोटा ओढा वाहायचा, अशी आठवण सांगितली जाते.

माढेश्वरी मंदिरासंबंधी पुजाऱ्यांच्या कुटुंबात अशी कथा सांगितली जाते. माढा गावातील शेतकरी रोज तुळजापूरच्या भवानी देवीला नैवेद्य नेत असे. त्याने तसे कित्येक वर्षे केले. पुढे, तो शेतकरी देवीला ‘थकलो’ असे म्हणाला. देवी त्या शेतकऱ्याला म्हणाली, ‘आता मीच तुझ्याबरोबर येते माढ्याला. अट एकच, की तू चालायला सुरुवात कर. मागे वळून पाहायचे नाही.’ शेतकऱ्याच्या चालण्याच्या मार्गात, मनक्रणिका नदी होती. शेतकऱ्याने नदीत पाय धुतले व मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी लुप्त झाली!

त्यानंतर पुजारी कुटुंबीयांच्या पूर्वजांनी देवीची स्थापना केली!

अश्विनातील नवरात्रात माढेश्‍वरीच्‍या मंदिरात उत्सव असतो. पूर्वी नऊ दिवस स्त्रिया, पुरुष उपवास करत व उभे राहत असत. म्हणून त्याला ‘खडे नवरात्र’ असेही म्हणत. कोजागिरीला देवळात मोठी यात्रा भरते. देवळाच्या आवारात हत्ती, घोडा, नंदी अशी देवीची वाहने (लाकडी) आहेत. त्या वाहनांवरून रात्री बारा वाजता देवीचा छबिना निघतो. मंदिराच्या बाहेरील बाजूस मातंगी आईचे मंदिर आहे. त्या मंदिरापर्यंत छबिना जातो व परत येतो. मातंगी देवी ही महार-मांग लोकांची देवी आहे. पूर्वी त्या लोकांना माढेश्वरी देवीच्या मंदिरात प्रवेश नसे.

माढेश्वरी देवी या मातंगी देवीला भेटायला जाते असे मानतात. त्या देवळाची स्वच्छता करणाऱ्या दोन मांगिणी आहेत, वंशपरंपरागत. त्यांना आता पगार दिला जातो असे पुजारी मॅडम यांनी सांगितले.

आम्ही माढेश्वरी मंदिर पाहायला गेलो होतो त्यावेळी देवळात एक परिवार आला होता. त्यांची ती कुलस्वामिनी होती. त्यांच्या परिवारातील कोणाचे तरी लग्न ठरले होते. परिवार त्या लग्नाची पहिली पत्रिका देवीसमोर ठेवण्यासाठी, देवीला आमंत्रण देण्यासाठी आला होता. त्यांनी देवीची पूजा, आरती केली. त्यांनी देवीसाठी संपूर्ण जेवणाचा नैवेद्य करून आणला होता.

आरतीनंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना प्रसाद दिला गेला. प्रसाद म्हणजे केळ्याची दह्यातील घट्ट शिकरण होती. त्या विधीला ‘भोगी’ असे म्हणतात. आरतीच्या वेळी मंदिरात ताशा वाजवला जात होता. ताशा वाजवणाऱ्या गृहस्थांचे नाव श्री शिंदे होते. ते वंशपरंपरागत ताशा वाजवण्याचे काम करत आहेत असे त्यांनी सांगितले. पुजारी मॅडम म्हणाल्या, पाण्याची टंचाई आहेच. दोन-तीन दिवसांनी पाणी येते. परंतु विहीर असल्यामुळे वापरासाठी पाण्याची टंचाई जाणवत नाही. भारनियमन आहेच. वीज रोज सकाळी 6:00 ते 9:30 नसते. परंतु पुजारी मॅडम यांनी इनव्हर्टर बसवला आहे. बुधवार हा देवळाच्या भागातील/ माढ्यातील maintenance day आहे. त्यामुळे त्या दिवशी सतत वीज येत-जात असते.

– पद्मा क-हाडे

(माहितीसंकलन सहाय्य – संदीप येरवडे)

Last Updated On – 30th Sep 2016

About Post Author

12 COMMENTS

  1. उपयुक्त माहिती
    उपयुक्त माहिती

  2. खुप छान माहिती अपडेट केली
    खूप छान माहिती अपडेट केली. धन्यवाद थिंक महाराष्ट्र 9822677179.

  3. अतिशय सुंदर माहिती.
    अतिशय सुंदर माहिती. किल्ल्याची माहिती सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर यांचेकडे मिळेल. खूप छान…

  4. feeling proud I born in Madha
    feeling proud I born in Madha…Thank you for posting this info….From – Me and all Madhekar.

  5. अतिशय सुंदर माहिती.
    अतिशय सुंदर माहिती.

  6. The information is very good
    The information is very good n all facts r given. Only thing that Raje Raorambha Nimbalkar had gone to Tulajapur n requested Goddess Tulaja bhavani to come to Madha n same condition Jagdamba put before him that he should not turn back. There farmer is given. Whatever may be the facts but Goddess Jagdamba/ madheshwari is deity of all people of Madha city. My childhood n we friends used to enjoy 9 aaratis n yatra. Those were very sweet days. Thanks for wonderful information.

  7. The information posted is
    The information posted is very nice n I feel very happy that I m from Madha. One thing which I differ from the author is that Madheswari devi originally Tulajabhavani came to Madha as the noble Shri Rairambha Nimbalkar wanted her to b in Madha n she put a condition that she will follow him bt he shud nt see back. At Madha he saw back n there itself on the bank of the mankarnika Goddess tulajabhavani was invisible. Our old people used to tell us this version whereas authoress has told similar story with a farmer. But its very nice worded with detail information is praiseworthy n I m very thankful for the post on our Goddess Jagadamba mata.

  8. ६५ वर्षापूर्वी माढा सोडले..
    ६५ वर्षापूर्वी माढा सोडले. त्यावेळेच्या आठवणी जागृत झाल्या. मंदिराजवळील ओढा बुजला जाणे. भुईकोट किल्ल्याची दुरावस्था. इ. वाचून वाईट वाटले. असो… या लेखानिमित्ताने अवघे बालपण आठवणींसह दृगोचर झाले. स्मरणरंजनाचा आनंद मिळाला.

  9. खूप छान माहिती
    खूप छान माहिती

  10. सुवर्ण महोत्सव कोजागिरी
    सुवर्ण महोत्सव कोजागिरी पौर्णिमा…
    माहेश्वरी देवी….

  11. खुप छान माहीती अपलोड केली ..
    खुप छान माहीती अपलोड केली ….

Comments are closed.