माझे शाळा मंत्रिमंडळ

4
1067
_Maze_Shala_Mantrimandal_1.jpg

माझी शाळा इयत्ता पहिली ते चौथी अशी आहे. ती कडा गावात कर्डीले वस्ती भागात आहे. मी शाळा सर्वांगानी सुंदर बनावी यासाठी नेहमी प्रयत्न करत आहे. माझा त्यामधील एक भाग म्हणजे ‘माझी शाळा-माझे शाळामंत्रिमंडळ’ हा उपक्रम.

मी शाळेत 2008 साली रुजू झालो. मी माझा उपक्रम तेव्हापासून यशस्वीपणे राबवत आहे. उपक्रमाचे मला व माझ्या विद्यार्थ्यांना अनेकविध फायदे झाले आहेत. त्यातील प्रमुख फायदा म्हणजे ‘स्वानंद’ हा होय! ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती तिचे घर स्वच्छ ठेवते, त्याप्रमाणे माझा विचार माझी शाळा स्वच्छ व सुंदर असावी असा असायचा. तो साध्य एकट्याने प्रयत्न करून होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून एक आनंददायी उपक्रम साकारण्याचे ठरवले. उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक जीवनात उपयोगी ठरेल असा नाविन्यपूर्ण होता.

_Maze_Shala_Mantrimandal_2.jpgमी शाळास्तरावरील सर्व कामे, कार्यक्रम, गरजा इत्यादींची विभागणी करण्याचे व त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याचे ठरवले. त्या कामात मला माझे शिक्षकमित्र, सहकारी, अधिकारी यांचे सहाय्य मिळाले. विद्यार्थ्यांत शिस्तप्रियता येण्यासाठी कोणती कामे शाळास्तरावर आहेत त्यांची यादी केली – नीटनेटकेपणा, विद्यार्थी आरोग्य, क्रीडा-खेळ विषय, वर्ग-शाळा-परिसर स्वच्छता, पिण्याचे पाणी, दैनंदिन अभ्यास, सण-उत्सव, दैनंदिन परिपाठ, जयंती व स्मृती दिन, सांस्कृतिक कार्यक्रम ही आणि इतर… त्या कामांचे नियोजन केले. त्या प्रत्येक कामासाठी योग्य विद्यार्थी/विद्यार्थिनी यांची एक जबाबदार मंत्री म्हणून नेमणूक केली. सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शाळा मंत्रिमंडळ कार्यकारिणी निवडली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे–1. मुख्यमंत्री, 2. उपमुख्यमंत्री, 3. स्वच्छता व आरोग्य मंत्री, 4. अभ्यासमंत्री, 5. शिस्तमंत्री, 6. क्रीडामंत्री, 7. सांस्कृतिक कार्यक्रममंत्री, 8. पर्यटनमंत्री, 9. परिपाठ मंत्री. याप्रमाणे कार्यकारिणी निवड दरवर्षी केली जाते. वर्षभरातील प्रमुख कार्यक्रमाचे नियोजन आणि शाळेतील स्वच्छता व नैतिक मूल्ये यांची रुजवण विद्यार्थ्यांत आपसूक होते हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे.

_Maze_Shala_Mantrimandal_4.jpgआठवड्यात येणा-या अडचणींचा आढावा दर शनिवारी सभा आयोजित करून घेतला जातो. विद्यार्थी प्रतिनिधींच्या कामात माहिती व मार्गदर्शन केले जाते. मलाही त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळते. त्यांचे काम पाहताना आनंद खूप वाटतो. इयत्ता पहिली ते चौथी वर्गात असणारे लहानगे माझे विद्यार्थी घर सांभाळल्यागत संपूर्ण शाळा कामकाज पाहतात. विद्यार्थी विविध महापुरुष यांच्या जयंती, स्मृतिदिन, परिसर स्वच्छता, परिपाठ, खेळ, कार्यक्रम, आरोग्य तपासणी, जखम झालेल्याची मलमपट्टी करून योग्य काळजी इत्यादी कामे जबाबदारीने पार पाडतात. प्रत्येक प्रतिनिधीच्या मनात तो शाळेतील जबाबदार मंत्री आहे एवढेच असते. फार आनंद वाटतो.

उपक्रमाची उपयुक्तता पुढीलप्रमाणे – स्वच्छ व सुंदर शाळा निर्मिती, नैतिक मूल्यांची रुजवण, जबाबदारी निभावणे/पार पाडणे, भीती-लाजरेपणा नाहीसे होतात, शाळा कामकाज सुरळीतपणे चालण्यास मदत मिळते, विद्यार्थ्याच्या अंगी धीटपणा निर्माण होतो, विद्यार्थी योग्य वर्तन अनुभवतात, विद्यार्थी व शिक्षक यांच्यात अधिकचे प्रेम निर्माण होते.

_Maze_Shala_Mantrimandal_3.jpgअनुभव विद्यार्थ्यांचा

मी मुख्यमंत्री, शाळा मंत्रिमंडळाचा

मी सृष्टी संदीप मेहेत्रे (इयत्ता चौथी) आहे. मी शाळेत मुख्यमंत्री आहे. संपूर्ण मंत्रिमंडळ यांना अडचणीवेळी मदत करणे, कामकाज सुव्यवस्थित चालवणे, निरीक्षण व माहिती मार्गदर्शन करणे हे माझे काम. मी या शाळेत ज्या वेळेपासून आले, तेव्हा या मंत्रिमंडळात मी मंत्रीपदी होते. आज मी मुख्यमंत्री आहे.

दरवर्षी मी या शाळेच्या मंत्रिमंडळाचे काम पाहत आले. अनुभवले. माझे उत्तम कार्य तथा माझ्यातील गुणांचा विचार करता मला मुख्यमंत्रीपद मिळाले. मी शाळा सुरू ते शाळा सुटेपर्यंत सर्व मंत्रिमंडळ यांच्या कार्यात येणारे अडथळे दूर करते, तथा त्यांना कामात मदत करते. त्यात मला माझे गुरूजी मदत व मार्गदर्शन करतात. मी सर्वांशी प्रेमाने वागते, बोलते. आमचे मुख्याध्यापक, शिक्षक, आई, वडील, मैत्रिणी माझ्या कामाचे कौतुक करतात. मला या कामाचा शाळेतील, तसेच शाळाबाह्य कामात फार उपयोग झाला आहे. विशेषतः माझे वागणे, बोलणे, फार छान सुंदर आहे असे माझे नातलग, गुरूजी व मित्रमैत्रिणी म्हणतात. ते ऐकून मला आनंद होतो. त्याचे सर्व श्रेय माझ्या शाळेस जाते.

थँक्यू. …खूप खूप धन्यवाद!

– सृष्टी

_Maze_Shala_Mantrimandal_5.jpgमी खेळमंत्री (क्रीडामंत्री) शाळा मंत्रीमंडळचा

नमस्कार, मी सार्थक सुनील मेहेत्रे (इयत्ता दुसरी), मी शाळेच्या मंत्रिमंडळात खेळमंत्री आहे. शाळेत विविध खेळ खेळणे व त्यांची माहिती सांगणे.. नवनवीन खेळ घेणे, मुलांना आनंद मिळेल असे त्यांनी सांगितलेले खेळ खेळणे हे माझे काम. मी खेळाचे नियोजन मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री यांच्या समवेत करतो व तसे खेळ घेतो. मी क्रीडास्पर्धेत पंच म्हणून काम पाहतो.  माझे काम सर्वांना आवडते. मुले मला खेळमंत्री म्हणतात. मी माझे काम पूर्ण जबाबदारीने करतो. सर्व मंत्रिमंडळ, माझे मित्र मला मदत करतात.खूप छान वाटते… सर्वांचे आभार.
– सार्थक

प्रमोद धुर्वे

संपर्क – 9766675602,7756996060
dhurweps@gmail.com
zppskardilewastikada@gmail.com

– प्रमोद सखाराम धुर्वे

About Post Author

Previous articleज्ञानोत्सुक महाराष्ट्र!
Next articleमहिलांचे भावविश्व उलगडणारे बचतगट
प्रमोद धुर्वे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कर्डीलेवस्ती येथे मुख्यध्यापक म्हणून कार्यरत आहेत. शिकवण्याची आवड असणारे प्रमोद धुर्वे हे शाळा सर्वांगाने सुंदर व्हावी यासाठी सतत प्रयत्नशील असतात. प्रमोद धुर्वे यांनी २००४ साली त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमंत गाव येथे सहशिक्षक या पदाने केली. २००८ साली त्यांची बदली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कर्डीलेवस्ती येथे झाली. शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना २०१७ साली ‘आसराबाई लोखंडे सेवाभावी संस्था, अहमदनगर’ या संस्थेद्वारे दिला जाणारा ‘आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार’ आणि ‘श्री. संत सावता माळी युवक संघा’च्यावतीने राज्यस्तरीय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिला जाणारा ‘संत सावता भूषण पुरस्कार’ हे दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. प्रमोद धुर्वे यांनी केंद्रस्तरावर आणि राज्यस्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. लेखकाचा दूरध्वनी 7756996060

4 COMMENTS

  1. Very very nice programe…
    Very very nice programe arranged by u pramod sir and your cabinet ministry so nice . Hearty congratulations for Ur project my school and cabinet ministry.

  2. Very very nice programe…
    Very very nice programe arranged by u pramod sir and your cabinet ministry so nice . Hearty congratulations for Ur project my school and cabinet ministry.

  3. शाळेचे भाग्य की एवढे गुणी…
    शाळेचे भाग्य की एवढे गुणी शिक्षक मिळाले …. खुुप छान कार्य धुर्वे सर
    Keep it up

Comments are closed.