Home कला मला तुझ्याशी मैत्री करायचीय!!!

मला तुझ्याशी मैत्री करायचीय!!!

– हिनाकौसर खान

      त्या दिवशी अचानक रात्री अवेळीच फोन वाजला. पलीकडून कसलाच आवाज नाही! मी ‘हॅलो हॅलो’ करत राहिले आणि तिकडून केवळ नि:शब्द श्वास. अर्थात, वैतागून, मी फोन ठेवला. रात्रीच्या झोपेचं खोबरं झालं होतं. पुन्हा कधीतरी तोच नंबर…. मी उचललाच नाही. यावेळेस वैतागून उचलला तर चक्क पलीकडून ‘हॅलो’ असं ऐकू आलं. कोणीतरी अनोळखी होता. पुढे म्हणाला, ‘मला तुझ्याशी मैत्री करायचीय. करशील, प्लीज?’ आर्जवलेल्या  …

हिनाकौसर खान

     त्या दिवशी अचानक रात्री अवेळीच फोन वाजला. पलीकडून कसलाच आवाज नाही! मी ‘हॅलो हॅलो’ करत राहिले आणि तिकडून केवळ नि:शब्द श्वास. अर्थात, वैतागून, मी फोन ठेवला. रात्रीच्या झोपेचं खोबरं झालं होतं. पुन्हा कधीतरी तोच नंबर…. मी उचललाच नाही. यावेळेस वैतागून उचलला तर चक्क पलीकडून ‘हॅलो’ असं ऐकू आलं. कोणीतरी अनोळखी होता. पुढे म्हणाला, ‘मला तुझ्याशी मैत्री करायचीय. करशील, प्लीज?’ आर्जवलेल्या शब्दांतील ती हुरहुर. मी क्षणभर गोंधळलेच. पटकन उत्तर दिलं, ‘सॉरी हे कसं शक्य आहे? मी न तुला ओळखते न तू मला.’ उत्तरात तो खूप छान हसला, ‘मी खरंच तुला नाही ओळखत. आय जस्ट नो युवर नेम. आय थिंक यु आर ‘भूमी,’ राईट.’ मी जागेवरून उडीच मारली आणि घाबरून, पटकन फोन ठेवला.

     त्यानंतर खूप दिवसांनी त्याचा फोन आला. यावेळी मी जरा त्याला सुनावलंच, ‘कोणतही नातं स्वच्छ व पारदर्शक असावं लागतं आणि असं ठरवून नाही निर्माण करता येत एखादं नातं किंवा मैत्री. ते उत्फुल्लपणे घडावं लागतं. तुमची वेव्हलेंथ जुळावी लागते… असं आणि बरंच काही. त्यावर तो पुन्हा तसाच हसला, अगदी मोकळेपणानं. मला म्हणाला, ‘मग भेटशील मला? विल स्पेण्ड टाईम टुगेदर…देन डिसाईड.’ मी काहीच बोलले नाही. शेवटी पुन्हा तोच म्हणाला. ‘अॅण्ड आय थिंक आय अॅम लिटल स्मार्ट डेट. यू शुअरली विल लाईक टु बी फ्रेण्ड ऑफ माईन.’

     तो भेटायला आला…थोडासा मिस्कील, थोडासा वेंधळा आणि तितकाच  क्यूट. आणि तो म्हणाला होता, तसा मला खरंच खूप आवडला. तो पर्यावरणाच्या कुठल्याशा एनजीओत काम करत होता. भटकणं आणि पर्यावरणाचं संवर्धन हे त्याच्या बोलण्याचे आवडीचे टॉपिक असल्याचं वारंवार जाणवत होतं. ठाऊक नाही कसं, पण अनोळखी असूनही मला त्याचा सहवास आवडला. एकदम कम्फर्टेबल. जाताना म्हणाला, ‘तुला वाटलं तर भेटुयात, वाटलं तर बोलुयात. कसलीच जबरदस्ती नाही. तुझ्याविषयी माझं नॉलेज झिरो आहे. पण तुझे कधीमधी लेख वाचायचो. ते खूप भिडायचे. वाटायचं, यार आपल्याच मनातलं बोलते ही. अगेन युवर नेम ‘भूमी’! आय अॅम इम्प्रेस्ड टोटली. म्हणून आटापिटा केला आणि फोननंबर मिळवला. आज तुझ्यासोबत प्रत्यक्ष वेळ घालवला. बस्स, अपनी इतनीही ख्वाहीश थी. आणि हो, तू म्हणालीस तसं उत्फुल्लपणे मैत्री करावीशी वाटेल तेव्हा…यु हॅव माय मोबाईल नंबर, राईट.’

     त्यानंतर महिनाभरासाठी अचानकच मला गावाला जावं लागलं. मोबाईलला रेंज नाही, त्यामुळे आमचा कॉंण्टॅक्ट तुटला. परतल्यावर बोलेन म्हणून नंबर डायल केला, पण उगीच भीती वाटली. खूप वेळा नंबर डायल केला, पण शक्यच होईना, मग एसएमएस केला. उत्तर आलं नाही. माझी अवस्था व्याकुळलेली झाली. दोन-तीन दिवस..आठवडा गेला. रागावला की काय असं वाटलं. दरम्यान, त्याला फोनही लावला. पठ्ठ्यानं उचललाच नाही. महिना गेला. माझी तगमग, त्याला भेटण्याची उत्सुकता वाढतच चालली होती. स्वत:चा रागही येऊ लागला होता.

     त्या दिवशी अचानक, रात्री अवेळी फोन वाजला. पलीकडून कसलाच आवाज नाही. मी ओळखलं, तसा तो हसला. ते हसणं मला वेड लावणारं होतं. या वेळेस माझे श्वास उगीचच वाढले होते, ‘भूमी, अगं, आसामला होतो. फोन घरी. बाहेरगावी गेल्यावर आपल्याला एकदम मुक्त राहायला आवडतं. काल परतल्यावर तुझी उत्फुल्लता कळली.’ यानंतर मला खूप वेळ काहीच सुचलं नाही. मग म्हणाले, ‘यु नो व्हॉट. यु आर डिफरण्ट. आय थिंक आय…ल..लाईक यु. अॅण्ड तुला तर मी आवडतेच. सो… व्हॉट आर यु डुईंग टुमारो? भेटायचं मैत्रीची वीणा गुंफायला?’ पलीकडून फक्त त्याच्या हसण्याचा आवाज येत राहिला आणि त्यागणिक माझी हुरहुर वाढत राहिली, झोप लागेपर्यंत.

– हिनाकौसर खान संपर्क – 9850308200 greenheena@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous article‘अमृतवेल’ बहरत आहे!
Next article‘टिंबख्तू’: एक विदारक सत्य!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

  1. I am senior citizen and my…
    I am senior citizen and my wife also senior citizen at Vasai from last one year our daughter in law harrasing us too much our son not harras us but daughter in law calling and treating very badly pl guide us

Comments are closed.

Exit mobile version