‘मराठी’पणाची ज्योत तेवत ठेवायला हवी

    चंद्रपुरातील साहित्य संमेलनात तीन कोटी रुपयांची ग्रंथविक्री झाली. ही गोष्ट मराठीच्या संदर्भात आश्वासक व प्रेरणादायक आहे. साहित्य संस्था, ग्रंथालये, भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांच्यांत सुसंवाद निर्माण झाल्यास तंत्रयुगातही मराठी भाषा सशक्त होईल. दिल्ली, बनारस, कोलकाता, हैदराबाद, बडोदा, भोपाळ, ग्वाल्हेर, गोवा, छत्तीसगढ, कर्नाटक, दुबई, अमेरिका इथली मराठी माणसे दूर राहूनही आपले मराठी भाषाप्रेम टिकवून आहेत. आंतरिक जाणिवांतून मराठीपण प्रकट होत राहिले तर मराठी भाषा व संस्कृती यांना मरण नाही.

    About Post Author

    Previous articleलढणा-या ‘सजग नागरिक मंचा’ची कहाणी
    Next articleअभिजात मराठी
    प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164

    Exit mobile version