भारत-पाकिस्तान संबंधांचे भविष्य?

0
13

अमन की आशा भारत-पाकिस्तान संबंधांचे भविष्य?

– अरूण निगुडकर

पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी व पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी पाक सैन्याचे प्रमुख कयानी यांना तीन वर्षे मुदतवाढ दिल्याने पाकिस्तानच्या लोकशाहीचे अस्तित्व फार तर थोडा काळ वाढेल! कयानी हे खरेतर पाकिस्तानचे सर्वेसर्वा आहेत. भारताच्या दृष्टीने काय वा पाकिस्तानच्या जनतेच्या दृष्टीने काय, कयानी यांची छुपी लष्करशाही अधिकच बळकट कयानीहोण्याचा धोका आहे. त्याचे काय परिणाम होतील हे अमेरिका वा चीन यांना  किती महत्त्वाचे वाटते ते आपण बाजूला ठेवू . कयानी यांचा भारताविषयीचा द्वेष जनरल मुशर्ऱफ यांच्या इतकाच तीव्र आहे. झरदारी वा गिलानी ही कळसुत्री बाहुली आहेत, ती तशीच राहू देण्यात कयानी यांना अडचण नसल्याने पाकिस्तानात लोकशाही देखाव्यापुरती नांदेल. कयानी यांना हवी तेव्हा तिचे विसर्जन करण्यास ते मागेपुढे पाहणार नाहीत.

पाकिस्तानच्या जन्मापासून आजतागायत तेथे अठरा पंतप्रधान झाले. त्यांचा आढावा घेताना मला काय आढळले त्याचा आलेख मी येथे मांडतो. लष्करशहांनी त्यांचे काय केले याचा मागोवा उद्बोधक आहे. ‘अमन की आशा’चा विचार डोक्यात ठेवताना या राजकीय परिस्थितीचे भान असणे गरजेचे आहे.

  1. 01. लियाकत अली खान  –  १४ ऑगस्ट १९४७ ते १६ ऑक्टोबर १९५१ – खूनयुसुफ रझा
  2. 02. ख्वाजा नजिबुद्दीन – १७ ऑक्टोबर १९५१ ते १७ एप्रिल १९५३ – पदच्युत
  3. 03. महम्मद अली बोग्रा – १७ एप्रिल १९५३ ते १२ ऑगस्ट १९५५ – पदच्युत
  4. 04. चौधरी महम्मद अली – १२ ऑगस्ट १९५५ ते १२ सप्टेंबर १९५६
  5. 05. इब्राहीम इस्माइल श्रुंद्रीगर – १७ ऑक्टोबर १९५७ ते १६ डिसेंबर १९५७
  6. 06. हुसेन शहीद सुरावर्दी – १२ सप्टेंबर १९५६ ते १७ ऑक्टोबर १९५७
  7. 07. फिरोदाखान नून – १६ डिसेंबर १९५७ ते ७ ऑक्टोबर १९५८
  8. 08. नुरूल अमीन – ७ डिसेंबर १९७१ ते २० डिसेंबर १९७१
  9. 09. झुल्फिकार अली भुट्टो – १४ ऑगस्ट १९७३ ते ५ जुलै १९७७झरदारी
    10. महम्मद खान जुनेजो – २४ मार्च १९८५ ते २९ मे १९८८

    11. बेनझीर भुत्तो – २ डिसेंबर १९८८ ते ६ ऑगस्ट १९९० – पदच्युत, पलायन

    12. गुलाम मुस्तफा जतोई – ६ ऑगस्ट १९९० ते १८ एप्रिल १९९३ – काळजीवाहू पंतप्रधान

    13. नवाझ शरीफ – ६ नोव्हेंबर १९९० ते १८ एप्रिल १९९३- पदच्युत, पलायन

    14. बलाख शेर मझारी – १८ एप्रिल १९९३ ते २६ मे १९९३- काळजीवाहू पंतप्रधान

    15. नवाझ शरीफ – २६ मे १९९३ ते १८ जुलै १९९३ – पदच्युत

    16. मोझनुद्दीन कुरेशी – १८ जुलै १९९३ ते १९ ऑक्टोबर १९९३ – काळजीवाहू पंतप्रधान

    17. बेनझीर भुत्तो – १९ ऑक्टोबर १९९३ ते ५ नोव्हेंबर १९९६ – राजकीय हत्या

    18. मलिक मेराज खलिद – ५ नोव्हेंबर १९९६ ते १७ फेंब्रुवारी १९९७ – काळजीवाहू पंतप्रधान

यांपैकी कुठल्याही पाकिस्तानी पंतप्रधानाला आपली कारकिर्द पूर्ण करता आलेली नाही. लष्करशहांनी त्या त्या काळी पंतप्रधानांना एक तर पदच्युत केले वा उठाव घडवून त्यांना पलायन करणे भाग पाडले वा त्यांचा खून घडवून आणला. झुल्फिकार अली भुट्टो यांना तर फाशी व त्यांची कन्या बेनझिर भुट्टो यांना मुशर्रफ यांनी अराजकाची संभाव्य भीती दाखवून, त्या निमित्ताने सरळ सरळ ठार मारले! अमेरिकेला पाकिस्तानात लोकशाही रूजवण्यात गेल्या साठ वर्षांत कधीही स्वारस्य नव्हते. अमेरिका, ब्रिटन व चीन यांचे एक प्यादे या पलीकडे पाकिस्तानला महत्त्व नाही.

पाकिस्तानच्या राजकारण्यांच्या हिशेबी तेथील जनतेला किंमत नाही. पाकिस्तान पंजाब सोडल्यास शासनाने सिंध, बलुचिस्तान, वायव्यसरहद्द प्रांत या राज्यांत शासकीय सुविधा,
शेतमजुरांचे कायद्याने संरक्षण या बाबतींत दुर्लक्ष केले. बाजारभावाचे नियंत्रण केले नाही. वीज,
पाणीवाटप, सरकारी नोक-या यांत असणारा असमतोल, यामुळे ही तिन्ही राज्ये फुटून, बांगलादेशाच्या वाटेने कधी जातील याची खात्री खुद्द पाकिस्तानी राज्यकर्ते देऊ शकत नाहीत. स्वात हा प्रांत पाकिस्तानने तालिबानला जवळजवळ देऊन टाकला आहे!

आझाद काश्मीर हा भारताचा काश्मीरमधील पाकव्याप्त भाग पाकिस्तानात राहू देण्यामध्ये चूक आहे हे जनरल थिमय्या यांनी पंडित नेहरूंच्या नजरेला १९४८ साली आणून दिले होते. परंतु पंडित नेहरू जागतिक शांततावादी होते. त्यांना हा प्रश्न जागतिक संस्थेमार्फत सुटू शकेल व हे दुखणे नाहीसे होईल असे प्रांजळपणे वाटले. त्यांनी युनोमध्ये हा प्रश्न नेला व त्या पोटी आम्ही एक राज्य गमावून बसलो.

काळ बदलला आहे. पाकिस्तानशी परत युद्ध करा असे कुणी सुजाण नागरिक म्हणणार नाही. हे खरे असले तरी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना त्याचे महत्त्व कळले पाहिजे. मुल्लामौलवी, तालिबान, लष्कर ए तोयबा ही राजकर्त्यांचीच बाळे आहेत.

‘अमन की आशा’ सारखे प्रयोग गेल्या साठ वर्षांत अनेक वेळा झाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अमृतसर-लाहोर एक्सप्रेस सुरू केली. वाघा बॉर्डर खुली करण्याचे प्रयोग झाले. त्यातून आयएसआय ने प्रशिक्षित अतिरेक्यांची सशस्त्र निर्यात केली.  शांततापथके, पत्रकारांची देवघेव, कलाकारांचे कार्यक्रम… या सर्व गोष्टी प्रभावीपणे पुढे आल्या नाहीत.  काय झाले त्यांचे आजपर्यंत?

“शठं प्रतिशाठ्यमं…”. पाकिस्तानला तसेच जबरदस्त उत्तर जेव्हा भारताकडून दिले जाईल तेव्हाच या उपखंडात शांतता नांदेल. अमन की आशा काही दिवसांनी इतर उपक्रमांसारखी विस्मरणात जाईल.

– अरूण निगुडकर

arun.nigudkar@gmail.com

About Post Author

Previous articleइतिहासाचं अवघड ओझं
Next articleतीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.