Home वैभव भारतवाणी – एकशेवीस भारतीय भाषांचा एक उद्गार! (Bharatwani)

भारतवाणी – एकशेवीस भारतीय भाषांचा एक उद्गार! (Bharatwani)

 

भारतवाणी ही सर्व म्हणजे एकशेवीस भारतीय भाषांना तिच्या कवेत सामावून घेणारी महत्त्वाकांक्षी व दीर्घ काळ चालणारी योजना आहे. म्हैसूरच्या भारतीय भाषा संस्थेची ती योजना आहे. ज्ञान दृक्श्राव्य, पाठ्य, मुद्रण, छाया अशा विविध माध्यमांद्वारा उपलब्ध करणे, त्याचा प्रसार करणे हे त्या योजनेचे उद्दिष्ट आहे. ते भारतीय भाषांबद्दल आणि भारतीय भाषांमधून असेल. त्यासाठी संवादात्मक, गतिशील आणि सर्वसमावेशक असे आंतरजालीय संकेतस्थळ निर्माण करून भारतीय समाजाला मुक्तज्ञान समाज बनवणे हा त्या योजनेचा हेतू आहे. सर्व सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्तरांतील कोणत्याही वयाच्या व्यक्तींना भारतवाणीचा उपयोग व्हावा असा त्या योजनेच्या आयोजकांचा प्रयत्न आहे.
भारतीय भाषा संस्था योजनेसाठी सामग्री गोळा करताना त्या कामामध्ये सरकारी व बिनसरकारी संस्था, विद्यापीठे, अन्य शिक्षणसंस्था, प्रकाशन गृहे, ग्रंथवितरण केंद्रे इत्यादींना सामील करून घेत आहे. त्याच प्रमाणे, भाषांसाठी उपलब्ध असलेले सर्व तंत्रज्ञान, उदाहरणार्थ मुद्राक्षरे, टंकलेखन साधने, भ्रमणध्वनीवरील अॅप्स. भाषांतर साधने, संहितेचे भाषणात रूपांतर आणि भाषणांचे संहितेत रूपांतर करण्याची साधने सर्व भाषकांना उपलब्ध करून देणे हेही त्या योजनेचे एक उद्दिष्ट आहे. योजना शेती, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, सेवा अशा सर्व घटकांशी संबंध ठेवून एकाच संकेतस्थळावर सर्व भारतीय भाषांचे आंतरजालावर अस्तित्व निर्माण करील आणि त्या द्वारा नष्टप्राय होत असलेल्या अल्पसंख्यांक आदिवासी, भटक्या समाजांच्या निजभाषांना आंतरजालावर स्थान मिळवून देईल. परिणामत: ती योजना भाषांच्या द्वारा भारतातील सर्व समाजघटकांशी जोडली जाईल. त्या योजनेने पुढील कार्ये हाती घेण्याचे ठरवून ठेवले आहे.
1. भाषा आणि साहित्य यांचे अंकीय (डिजिटल) व विद्युत परमाण्वीय (इलेक्ट्रॉनिक) स्वरूपात दस्तावेजीकरण करणे.
2. लिपी व मुद्राक्षरे यांची संकेतचिन्हे तयार करणे.
3. शब्दकोश व शब्दार्थकोश निर्माण करणे.
4. लिखित आणि मौखिक साहित्याचे व ज्ञानसंहितांचे आधुनिक आणि अभिजात भाषांत भाषांतर करणे.
5. भाषांचे अध्ययन आणि अध्यापन करणे, भाषाशिक्षकांचे प्रशिक्षण करून त्यांना प्रमाणपत्र देणे आणि ऑनलाईन अभ्यासक्रमांचे परीक्षण व मूल्यमापन करणे.
भारतवाणी योजनेतील सामग्री स्वामित्वहक्कमुक्त असेल. त्यामुळे ती कोणालाही मुक्तपणे वापरता येईल. भारतवाणी योजना मान्यताप्राप्त भाषावैज्ञानिक आणि तज्ज्ञ यांची राष्ट्रीय सल्लागार समिती आणि तंत्रज्ञान सल्लागार समिती यांच्या द्वारे आणि प्रत्येक भाषेसाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ मंडळाकडून राबवली जात आहे.
भारतवाणीला ज्या भाषांमध्ये आणि ज्या भाषांसाठी मुक्तस्रोत ज्ञानसामग्री निर्माण करणे आहे, त्या भाषा पुढीलप्रमाणे:
001. आदी
002. अनाल
003. अङगामी
004. आओ
005. असमिया
006. बैगा
007. बाल्टी
008. बंजारा
009. बांगला
010. भीली
011. भूमिज
012. भुटिया
013. विष्णुप्रिया
014. बोडो
015. चोकरी
016. चाङ
017. कोडवा
018. देउरी
019. डिमासा
020. डोगरी
021. गदबा
022. गाङटे
023. गारो
024. गोंडी
025. गुजराती
026. गुरूङ
027. हलाम
028. हल्बी
029. हिंदी
030. मार
031. हो
032. इरुळा
033. जातपु
034. जुआंग
035. कबुइ
036. कन्नड
037. कार्बी
038. कश्मिरी
039. खानदेशी
040. खरिया
041. खासी
042. खेझा
043. खियेमनुडन
044. कोंध
045. किन्नौरी
046. कोच
047. कोडा/कोरा
048. कोलामी
049. कोम
050. कोंडा
051. कोंकणी
052. कोन्याक
053. कोरकु
054. कोरवा
055. कोया
056. कुइ
057. कुरुख
058. लद्दाखी
059. लहांदा
060. लाहुली
061. मारा
062. तिवा
063. लेपचा
064. लियाङमइ
065. लिम्बू
066. लोथा
067. मिजो
068. महाल
069. मैथिली
070. मलयालम
071. माल्टो
072. मणिपुरी
073. माओ
074. मराम
075. मराठी
076. मारिड
077. मिसिड
078. मिशमी
079. मोग
080. मोनपा
081. मुंडा
082. मुंडारी
083. नहाली
084.नेपाली
085. निकोबारी
086. निशी
087. नोकते
088. ओडिआ
089. पाइते
090. पारजी
091. पावी
092. फोम
093. पोचुरी
094. पंजाबी
095. राभा
096. राइ
097. रेडमा
098. साडतम
099. संस्कृत
100. संताली
101. सवरा
102. सेमा
103. शेरपा
104. शिना
105. सिमते
106. सिंधी
107. तमाड
108. तमिल
109. ताडखुल
110. ताडसा
111. तेलुगु
112. थाडो
113. तिब्बती
114. कॉकबरक
115. तुळु
116. उर्दू
117. वाइफेइ
118. वांचो
119. यिमचुरङरे
120. जेमे
121. जठ
– प्र.ना. परांजपे 9422509638
pranaparanjpe@gmail.com
————————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version