भरपूर वापरा इमोजी (Use of Emojis Will Help Increase Writing)

इंटरनेटची जोडणी जगातील तीन अब्ज वीस कोटी लोकांकडे आहे आणि इमोजींचा वापर त्यांतील ब्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त लोक नियमितपणे करतात. इंग्रजी ही जगाची भाषा समजली जाते. इमोजीभाषकांची संख्या इंग्रजीभाषकांच्या तिप्पट आहे. इमोजी म्हणजे इमोटिकॉन्स. लिहिताना बोलणाऱ्याच्या चेहऱ्यावरील भावना आणि हातवारे व्यक्त करता येत नाहीत. ते काम इमोजी करतात. चहापासून दारूपर्यंतचे इमोजी डिजिटल जगाचे रंग दाखवत आहेतच. त्यांचा भरपूर वापर होऊ द्या. अमेरिकेतीलबिंगहॅम्टन युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सेलिया क्लिन यांनी तसे म्हटले आहे, तर ब्रिटिश भाषाशास्त्रज्ञ व्हिव्हियन इव्हान्स यांनी इमोजींचे वर्णन जगाच्या संपर्काचे जागतिक स्वरूपअसे केले आहे.

बहुतेक स्मार्टफोनमध्ये सातशेवीसपेक्षा अधिक स्माइली उपलब्ध असतात. अनेक जुन्या अभिव्यक्ती या नव्या भाषेत, नव्या ढंगात व्यक्त करता येतील. उदाहरणार्थ, केशवसुत यांनी म्हटले आहे, की काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या | प्राशन करता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या हे पूर्ण पद्यात्मक वाक्य एका इमोजीत बसू शकते ! केशवसुत यांनी जणू बदलत्या जगाची चुणूकच दाखवली होती !

चिनी भाषा ही ध्वन्याधारित आहे; म्हणजेच आवाजातील चढउतारानुसार शब्दांचे अर्थ बदलतात. परंतु चिनी लिपी ही चित्रात्मक लिपी आहे. त्यामुळेच चीनमधील एका प्रांतातील लोकांना दुसऱ्या प्रांतातील लोकांचे बोलणे समजत नसले, तरी त्यांनी लिहिलेले सगळे समजते. भारतातील देवनागरी लिपीमुळे हिंदी-मराठी जशा एकरूप दिसतात, पण वेगळ्या राहतात, तसाच प्रकार तिकडे आहे. त्यामुळेच भाषाशास्त्रज्ञ चिनी भाषा ही एक न मानता ते भाषाकुल मानतात; मात्र लिखाणाची पद्धत एकसारखी असल्याने तिला एक भाषा म्हणून ग्राह्य धरण्यात येते. चिनी लिपीत सुमारे तेवीसशे मुळाक्षरे आहेत. तिच्या खालोखाल, जपानी भाषेत अठराशे मुळाक्षरे आहेत.

भावचिन्हांची स्वतंत्र भाषा शक्य? (Will There Be New Language of Emojis)

इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual Language)

चिनी लिपी एवढी अवघड असल्यामुळे माओ झेडाँगने 1936 मध्ये म्हटले होते, की देशात जनसामान्यांचा सामाजिक संस्कृतीत सहभाग वाढवण्याचा असेल, तर चिनी अक्षरे मुळातून बाद करण्यास हवीत; मात्र त्याच माओने 1948 मध्ये सत्तेवर आल्यानंतर सुलभ चिनी लिपी आणली. देशात तीच सिम्प्लिफाइड चायनीज म्हणून वापरली जाते. व्यवहारातील बोलीभाषांप्रमाणेच टेक्स्ट एसएमएसहे लिखित संदेशांमध्ये भावना प्रभावी पद्धतीने अभिव्यक्त करतात. शब्दांचे लिखाण बदलणे आणि विरामचिन्हांचा अनियमित वापर यांतून (उदाहरणार्थ,  !!!) शब्दांना अतिरिक्त अर्थपूर्ण पद्धतीने व्यक्त करता येऊ शकते. इमोजी हे त्याचे प्रत्यक्ष रूप आहे. या प्रकारे भावना व्यक्त करण्याला अभ्यासकांनी टेक्स्टिझम असे नाव दिलेले आहे. क्लिन यांनी म्हटले आहे, की नवीन भाषिक रचना इलेक्ट्रॉनिक संपर्कव्यवस्थेमुळे विकसित होत आहेत. त्या रचना लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी उपलब्ध असलेली साधने आणि त्यांना जे व्यक्त करायचे आहे ते, यांतील दरी भरून काढत आहेत. त्या निमित्ताने तरी लोक लिहिते होतील आणि त्यांच्या त्यांच्या भाषेला नवसाज चढवतील.

देविदास देशपांडे 8796752107devidas@dididchyaduniyet.com                  

लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.

——————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here