आरती कुलकर्णी या पर्यावरण विषयातील पत्रकार-कार्यकर्त्या आहेत. त्यांनी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आता डिजिटल मीडिया असे, पत्रकारितेतील तिन्ही टप्पे पाहिले आहेत; तसेच, त्या पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीतील टप्पेही लेखनाच्या अंगाने सांगतात. मराठीमध्ये व्यंकटेश माडगूळकर, मारुती चितमपल्ली ही पहिली पिढी; किरण पुरंदरे, अतुल देऊळगावकर यांची दुसरी पिढी आणि आम्ही चाळीशीतील लेखक-मीडिया व्यक्ती ही तिसरी पिढी अशीनिसर्गलेखनाची परंपरा त्यांनी मांडली आहे. ती मुख्यतः जाणीव जागृतीच्या अंगाने आहे. आरती कुलकर्णी स्वतः गेली वीस वर्षें निसर्ग व पर्यावरण यावर तपशीलवार लेखन करत आहेत. त्यांनी त्यांच्या भवतालची घनदाट जंगले, नद्या, वैविध्यपूर्ण वनस्पती, पशुपक्षी, कीटक यांच्या नाना तऱ्हांचे अद्भुत विश्व विविध डॉक्युमेंटरीज व व्हिडियो यांच्याद्वारे मराठीजनांसमोर खुले केले आहे.
त्यांचा गणपतीपुळे हा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसंपन्न व समुद्राची साथ लाभलेला गाव. त्यांनी त्या गावाच्या निसर्ग व पर्यावरणाला वाहिलेल्या कविता ‘समुद्राचं गाव’ या काव्यसंग्रहात शब्दबद्ध केल्या आहेत. आरती यांचे वडील ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा‘मध्ये नोकरीस होते, तर आई शिक्षिका. त्यांना बाबांकडून निसर्गप्रेम व आईकडून लेखन या गोष्टींचा वारसा मिळाला. त्याखेरीज कॉलेजमध्ये असताना त्यांना ‘वाइल्ड’सारखी निसर्ग संस्था व अविनाश धर्माधिकारी यांचे ‘चाणक्य मंडल’ हेव्यासपीठ मिळाले. त्यामुळे त्यांचा कल पत्रकारितेकडे व सामाजिक कार्याकडेही वळला. त्याच ओघात त्यांनी पर्यावरण पत्रकारितेवरच काम करण्याचे ठरवले. त्या म्हणतात, की “‘वाइल्ड’च्या शेखर नानजकर यांच्या व्याख्यानाने माझे आयुष्य बदलून गेले. मला त्या संस्थेच्या ‘श्रावण’ या मासिकात उपसंपादकपदी काम करण्याची संधी मिळाली. पुण्यामध्ये निसर्गसंवर्धनाच्या चळवळीत प्रकाश गोळे, किरण पुरंदरे, विवेक परांजपे, माधव गाडगीळ असे धुरंधर लोक काम करत होते. पक्षीनिरीक्षणाची शिबिरे भरण्यास नुकतीच सुरुवात झाली होती. मी त्यात भाग घेत असे. मला वृक्षारोपणाच्या चळवळी, पर्यावरणसंवर्धन म्हणजे काय याचे धडे त्या लोकांचे काम बघून मिळाले.”
त्याकाळी पर्यावरणपत्रकारिता इंग्लिश माध्यमांमध्ये काही मोजक्या पद्धतीने सुरू होती. मराठीमध्ये पर्यावरण पत्रकारिता नव्हतीच. आरती यांच्याकरिअरची सुरुवात ‘तारा मराठी’ या न्यूज चॅनेलमध्ये झाली. लगेच त्या ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये नोकरी करू लागल्या. त्यांनी त्या नोकरीमध्ये पर्यावरणाचा विषय वर्तमानपत्रांच्या जगामध्ये वार्तांकनाच्या स्वरूपात आणला असे म्हणता येईल. त्या सांगतात, “मुंबईमध्ये ‘बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी‘मध्ये (बीएनएचएस) काही पर्यावरणतज्ज्ञांशी माझ्या भेटी झाल्या. जसा वन्यजीवांना जगण्यास छान अधिवास लागतो, तसा मला पत्रकारितेसाठी पोषक अधिवास ‘बीएनएचएस’चा लाभला. तेथे आयझॅक किहीमकर, प्रशांत महाजन हे पर्यावरण संवर्धनाचा, संशोधनाचा वारसा चालवणारे लोक होते. ‘बीएनएचएस’च्या वरद गिरी यांना ऑलिव्ह रिडले कासव वरळीच्या किनाऱ्यावर सापडले. मी त्याची केलेली ‘स्टोरी‘ गाजली. तेव्हा लक्षात आले, की लोकांना त्यांच्या भोवतीच्या निसर्गाबद्दल जाणून घ्यायचे आहे. मग मी ‘महाराष्ट्र टाइम्स’साठी प्राणी–पक्षी जगताबद्दल नियमित लिहू लागले. त्याच प्रकारचे वाचन करू लागले. व्हिडिओ पाहू लागले.” त्यातूनच आरती प्रत्यक्ष कार्यात उतरल्या. त्यांनी ‘शेकरू वन्यजीव संवर्धन संस्था’ 2005 साली स्थापन केली. तिची तीन उद्दिष्टे आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रातील वन्यजीवनाचे, वेगवेगळ्या वसतिस्थानांचे दस्ताऐवजीकरण करणे, निम्न पातळीवर जे वन्यजीव कार्यकर्ते, पर्यावरणवादी काम करत आहेत त्यांचे काम लोकांपर्यंत पोचवणे, तसेच सद्य स्थितीतील पर्यावरणीय विषय घेऊन, निर्णयक्षम लोकांपर्यंत पोचणे व त्यांना महत्त्व पटवून देणे. आरती यांनी ‘Shekru’ हे युट्युब चॅनेल मार्च, 2020 पासून म्हणजे ऐन लॉकडाऊनच्या काळात सुरू केले आहे. शेकरू म्हणजे मोठी खार. त्यांचे सोशल मीडियावरील ‘वन ट्री चॅलेंज’ हे वडपौर्णिमेनिमित्ताने केलेले आवाहन आहे. ते ‘चॅलेंज‘ स्वीकारून प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवावे हा त्यांचा त्यामागीलउद्देश आहे.
आरती कुलकर्णी यांनी ‘आयबीएन लोकमत’मध्ये बारा वर्षें पत्रकारिता केली. राजदीप सरदेसाई, निखिल वागळे यांच्या ‘लिडरशिप‘खाली वेगळ्या पद्धतीचा ‘व्हायब्रंट जर्नालिझम‘ केल्याचे त्या सांगतात. त्यांनी ताडोबाजवळच्या कोळशाच्या खाणीवर ‘रिपोर्ताज’ केला. ती खाण कशी बेकायदेशीर आहे हे पुराव्यानिशी सिद्ध केले. अदाणी कंपनीची ती खाण वाघाच्या हद्दीत होणार होती. चंद्रपूरच्या लोकांनीही खाणविरोधात आंदोलन पुकारले होते. परिणामी, तो खाण प्रकल्प रद्द करण्यात आला. त्यांना त्या डॉक्युमेंटरीसाठी ‘रामनाथ गोयंका अवॉर्ड, 2009’ हा पर्यावरणाचा सर्वोच्च पुरस्कार आणि कोकणातील वीज प्रकल्पांवर केलेल्या ‘रिपोर्ताज’ला दुसऱ्यांदा रामनाथ गोयंका अवॉर्ड, 2011 सालीमिळाले.
आरती सांगतात, “मला ‘बीबीसी‘(मराठी)मधील पर्यावरण पत्रकारितेने पर्यावरणाकडे जागतिक दृष्टिकोनातून पाहणाऱ्यास शिकवले. वन्यजीव संवर्धन, पर्यावरण साक्षरता यांचा रोख हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यांच्यापर्यंत येऊन पोचलेला होता. ‘बीबीसी’ने पर्यावरणाच्या प्रश्नांवर कोणी मार्ग शोधत असेल तर त्याला प्राधान्य दिले पाहिजे हा मंत्र दिला. त्यामुळे समस्यांवर उपाययोजनात्मक पत्रकारितेला ‘बीबीसी’पासून सुरुवात झाली.“
[youtube=https://www.youtube.com/watch?v=A8WPS3TPczA&w=320&h=266]
आरती कुलकर्णी या डॉक्युमेंटरीफिल्ममेकरही आहेत. त्यांच्या ‘जन्नत–ए–नाईल’, ‘नागझिऱ्याची प्रेमकथा’, ‘नातं पश्चिमघाटाशी’, ‘नमामि चंद्रभागा’, ‘गाज… कॉल ऑफ द ओशन’ या डॉक्युमेंटरीज विशेष गाजल्या आहेत. पैकी त्यांनी ‘गाज… कॉल ऑफ द ओशन’ ही डॉक्युमेंटरी 2006 साली तयार केली. ती कोकणच्या सागरी जीवनावर आधारित आहे. प्रथमचसिंधुदुर्गातसागरी जीवनाचे समुद्राखालीजाऊन दस्तावेजीकरण करण्यातआले. तोवर डॉल्फिन मासे, सिगल पक्षी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील निवतीच्या बेटाजवळ दिसतात हे लोकांना माहीत नव्हते. भाऊ काटदरेव राम मोनेयांनी स्थापन केलेल्या‘सह्याद्री निसर्गमित्र’ संस्थेच्याकामाबद्दलही ‘गाज…’मध्येमाहिती मिळते. मालदीवमध्येआयोजित ‘आंतरराष्ट्रीय पर्यावरणफिल्म फेस्टिव्हल’मध्येतो माहितीपट दाखवण्यातआला. आरती यांनी‘जन्नत–ए–नाईल’ व ‘नमामि चंद्रभागा’ या डॉक्युमेंटरीज 2016 सालीतयार केल्या. नाईलवरीलडॉक्युमेंटरीमध्येनाईलची विलोभनीय रूपे, तिच्या खोऱ्यातील लोकजीवनव इजिप्तला नाईलचीदेणगी का म्हटले आहे ते अनुभवतायेते. त्यांनी ‘नमामिचंद्रभागा’ ही डॉक्युमेंटरी महाराष्ट्र सरकारसाठीकेली. त्यामध्ये नदीचाप्रवास, नदीच्या वपर्यावरणाच्या समस्या,तिचे प्रदूषण कसे टाळता येईल यावर उद्बोधक माहिती आहे. ती फिल्म पर्यावरणतज्ज्ञांशी बोलून बनवण्यातआल्याचे आरती सांगतात. आरतीयांनी ‘नातं पश्चिमघाटाशी’ हीडॉक्युमेंटरी सहा राज्यांमध्येफिरून 2013 साली तयार केली. बेकायदेशीरखाणकाम, जंगलतोड, पवनचक्क्यांसाठीहोणारी जंगलाची नासधूस यामुळे पश्चिमघाटचर्चेत होता. त्या माहितीपटात पश्चिमघाटातीलजैवविविधता, निसर्गवैभव पाहतानाडोळ्यांचे पारणे फिटते. तर दुसऱ्याबाजूला माणसाने निसर्गालाओरबाडून उभे केलेले असंख्य पर्यावरणीयप्रश्न अस्वस्थ करतात. त्या डॉक्युमेंटरीला‘वसुंधरा इंटरनॅशनल एन्व्हायर्नमेंटफिल्म फेस्टिव्हल’ पुरस्कारमिळाला. आरती कुलकर्णीयांची 2020 सालची‘नागझिऱ्याची प्रेमकथा’ ही डॉक्युमेंटरी पक्षीमित्रकिरणपुरंदरे व त्यांचीपत्नी अनघा यांच्यापर्यावरणविषयक कामाची ओळख करून देणारी आहे. त्या उभयतांनी‘निसर्गवेध’ या ट्रस्टच्यामाध्यमातून निसर्गसंवर्धनाची कामे नागझिऱ्याच्यापिटेझरी गावामधून सुरू केली आहेत. आरती यांना डॉक्युमेंटरीज बनवण्यासाठी महाराष्ट्रसरकारचा पर्यावरण विभाग व काही प्रायोजक यांच्याकडूनआर्थिक सहाय्य मिळाले. तसेच त्यांना हितचिंतक, कुटुंबीययांचीही मदत होत असते. शिवाय, डॉक्युमेंटरीजना मिळालेल्यापुरस्कारांचे मानधन डॉक्युमेंटरीवरचखर्चकेल्याचे आरती सांगतात.
आरती कुलकर्णी सध्या ‘ओआरएफ’ (ऑब्जर्वर रिसर्च फाउंडेशन) मराठी वेबसाईटसाठी पर्यावरणावर लेखन करत आहेत. त्या ‘आपलं कोकण’ न्यूज चॅनेलसाठी कन्सल्टिंग एडिटर म्हणून काम पाहतात. आरती यांना निसर्ग लेखन परंपरेचा वारसा पुढे न्यायचा आहे. “माध्यम कोणतेही असो, मी शेवटपर्यंत पर्यावरण पत्रकारिताच करत राहीन” असे आरती सांगतात.
आरती कुलकर्णी 9930360556 arti.kulkarni1378@gmail.com
– वृंदा राकेश परब 7506995754 vrunda.rane@gmail.com
वृंदा राणे-परब मुंबईत गोरेगाव येथे राहतात. या दहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी मराठी विषयातून एमएची पदवी मिळवली आहे. त्यांनी ‘दै. वृत्तमानस’, ‘पुढारी‘, ‘मुंबई तरुण भारत‘, ‘मी मराठी‘ या वर्तमानपत्रात मुद्रितशोधक पदावर काम केले. त्यांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘मध्ये काही काळ उपसंपादक पदावर काम केले. सध्या त्या ‘थिंक महाराष्ट्र‘सोबत मुक्त पत्रकार म्हणून जोडलेल्या आहेत.
———————————————————————————————–
उत्तम माहिती आहे. लेख आवडला
खूपच सुंदर लेख
Khup chhan
शेकरू बद्दल माहिती मिळाली. धन्यवाद.लेख माहितीपूर्ण आहे.
Khup khup chan Arti Tai👌👌
छान माहिती. आरतीताईंच्या डाॅक्युमेंटरीजची युट्युब लिंक मिळेल का ?