नवजीवनचे संवेदना काउन्सिलिंग

0
37
carasole

सांगली जिल्‍ह्यात मतीमंद मुलांच्‍या व्‍यक्तिमत्‍त्‍व आणि शैक्षणिक विकासासाठी रेवती हातकणंगलेकर ‘नवजीवन मतिमंद शाळा’ चालवतात. त्‍या शाळेच्या समांतर पातळीवर ‘संवेदना काउन्सिलिंग’ या सेंटरचे काम चालते.

अपंग मूल घरात जन्माला आले, की त्याचा चांगला-वाईट परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो. घरातील अन्य तरुण-तरुणींचे विवाह जुळताना समस्या निर्माण होतात. त्या मुलाच्या जन्माला स्त्रीला कारणीभूत ठरवले जाते. त्यात स्त्री भरडली जाते. मूल आईबरोबर चोवीस तास असते. मतिमंद मुलांना कुटुंबाच्या-समाजाच्या प्रेमाची, मायेची गरज असते. कुटुंबानेच फटकारले तर त्या मुलांच्या मनात एकटेपणाची भावना निर्माण होते. अशा वेळी मूल अजून एकलकोंडे बनून त्याची मानसिक वाढ खुंटते. पालकांनी – कुटुंबातील सदस्यांनी अशा मुलांना स्वीकारावे, यासाठी सामाजिक जागरूकतेची गरज निर्माण झाली. त्या गरजेतून १९९२ साली ‘संवेदना काउन्सिलिंग सेंटर’ सुरू करण्यात आले. त्या सेंटरच्या माध्यमातून कौटुंबिक व सामाजिक पातळीवर मतिमंदांच्या वाढीतील स्थित्यंतरे, त्यांची मानसिकता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबवण्यात येतात. मतिमंद मुलांच्या भावंडांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. काउन्सिलिंग सेंटरमध्ये मानसिक आजार असणारे लोक, व्यसनाधीन- जीवनात हताशा अनुभवणारे तरुण, घटस्फोटितसुद्धा काउन्सिलिंगसाठी येतात. काउन्सिलिंग सेंटरमुळे काही विस्कटणारे संसार सांधले गेले आहेत. काही तरुण व्यसनमुक्त झाले आहेत. या सेंटरमार्फत विशेष मुलांच्या पालकांसाठी व शिक्षकांसाठी चाईल्ड डेव्हलपमेंटचा तीन वर्षांचा कोर्स शिकवला जातो.

संचालक – रेवती हातकणंगलेकर
नवजीवन शाळा,
जुना बुधगाव रस्‍ता, रेल्‍वे गेटजवळ,
संभाजीनगर, सांगली – 416 416
(०२३३) – २३२१४८३१0, २३२१४८३
navjeevan.sangli@rediffmail.com

– वृंदा राणे-परब

About Post Author