– हिनाकौसर खान
नमस्कार मित्रांनो!! कसे? बरे आहात ना. तुम्ही ठीकठाक असाल तरच आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अंहं, ‘ज्वलंत’ शब्द ऐकून घाबरायचं कारण नाही. अर्थात तुम्ही जिगरबाज पठ्ठे. घाबरणार नाही, कारण रोज निदान एकदा तरी सिगारेटचं थोटूक पेटवताना तुमचा ज्वलंतपणाशी परिचय येतच असेल म्हणा…
बरं! ते जाऊ द्या! महत्त्वाचं हे आहे, की तुमचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला हवी, बुवा….
– हिनाकौसर खान
नमस्कार मित्रांनो!! कसे? बरे आहात ना. तुम्ही ठीकठाक असाल तरच आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत. अंहं, ‘ज्वलंत’ शब्द ऐकून घाबरायचं कारण नाही. अर्थात तुम्ही जिगरबाज पठ्ठे. घाबरणार नाही, कारण रोज निदान एकदा तरी सिगारेटचं थोटूक पेटवताना तुमचा ज्वलंतपणाशी परिचय येतच असेल म्हणा…
बरं! ते जाऊ द्या! महत्त्वाचं हे आहे, की तुमचं अभिनंदन करायचं आहे आणि तुमच्या हिमतीची दाद द्यायला हवी, बुवा. म्हणजे बघा हं. धुम्रपानविरोधी कायदा आला. अंमलबजावणीच्या बतावण्यासुध्दा झाल्या. सिगारेट पुरवणार्यापासून ते ओढणार्यापर्यंत… गुन्हा करणार्या प्रत्येकाविरुध्द दंड ठोठवायचा निर्णयही झाला, पण त्यानं तुमचं काही बिघडलं? तुम्हा पामरांवर त्याचा धूसरही परिणाम झाला नाही. यामुळेच तर तुमच्या जिगरबाज अंदाजाला सलाम!! आता पाहा ना, तुम्ही अगदी कुठे, कुठेही म्हणजे कुठेही राजरोसपणे ‘धुआँ उडाताही चला’ म्हणत एक के बाद एक सिगारेटी फुंकता. आता, तुम्ही म्हणाल यात कसली आली हिंमत? अहो, नाही कशी, स्वत:च्या घरात कोणीही वाघ असतो. पण कायद्यानं जर रस्त्यात, कामाच्या ठिकाणी, इतरांना त्रास होईल अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सिगारेटचा ‘स’ उच्चारायलासुध्दा बंदी केली असेल तिथं… त्या रस्त्यावर… गल्लीबोळात… चौकात… तुम्ही अगदी शान मारत कायद्याचा धुव्वा उडवता. ग्रेटच! फर्ग्युसन… जंगली महाराज.. बाजीराव.. टिळक.. सेनापती.. बापट.. कात्रज.. हडपसर किंवा गल्लीबोळातील थोरामोठ्यांच्या नावाचे कोणतेही चौक… सगळीकडे तुम्ही आणि तुमची सिगारेट सारखीच, असं असताना तुमचा गौरव केला नाही तरच नवल.
आमचे एक सहकारी आहेत. भारी सज्जन माणूस. दुसर्याला त्रास होऊ नये म्हणून कँण्टीनमधल्या एका कोपर्यात बसून पाहिजे तेवढा धूर सोडणार. मग ऑफिसमध्ये येणार. मात्र त्यालाच आपला त्रास होऊ नये अशा प्रकारे त्याच्या आकारमानाच्या चहुबाजूंनी किती वेळ कोणी फिरकत नाही. त्याला उगीच वाटते, की सगळेच त्याचा भारी आदर करतात. कोणी काहीही म्हणो त्याच्या सौजन्याची ऐसीतैशी करावीशी…(सॉरी हं, स्लिप ऑफ टंग! समजून घ्या.) हां तर म्हणत होते, त्याच्या सौजन्यात ऐस – पैस व्हायला होतं. हे तर काहीच नाही. पण सांगू की नको असं होतंय. तुम्हाला म्हणून सांगते हां. आपल्यातील गुपित बरं का? कोणाला म्हणून सांगायचं नाही (पुरी पार्श्वभूमी). पुरे तर पुरे.. आपले कायद्याचे संरक्षक (अहो, कोण म्हणून काय विचारता?) पोलिसदादा हो! क्वचित एकदोनदा त्यांनाही धुरांच्या रेषेत पाहिलंय. (त्यांना सिगारेट म्हणजे मशाल वाटत असेल बहुतेक) तेव्हा सामान्यजनांच्या हिमतीची दाद द्यायलाच हवी ना..!
आता जर दहशतवादी माणुसकीचा धूर उडवत असतील…सवलतींच्या लोभापायी कोणीही आरक्षणाचा धूर उडवत असेल… जगाच्या पाठीवर कोणाच्या कोणत्याही असंस्कृतपणानं भारतीयत्वाचा धूर निघत असेल, तिथं तुम्ही जर फक्त सिगारेटचा धूर उडवत असाल तर जास्तीत जास्त काय स्वत:च्या हाडांचा आणि इतरांच्या स्वास्थ्याचा धूर काढता इतकंच…..!!! तेव्हा तुमच्या वाढलेल्या हिंमतीला आणि आमच्या ढासळलेल्या नियमांना सलाम तर ठोकावाच लागेल.
– हिनाकौसर खान
संपर्क – 9850308200
greenheena@gmail.com
{jcomments on}