ज्योती पंडित दादरच्या त्यांच्या राहत्या घरी साडीविक्रीचा व्यवसाय बावीस वर्षें करत आहेत. त्यांचा प्रवास नोकरी करणारी सामान्य स्त्री ते एक स्वतंत्र उद्योजक असा आहे. “माझ्या नोकरीला तळवलकर्स जिमपासून सुरुवात झाली. मी तेथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. काही कालावधीतच जिमची शाखा स्वतंत्रपणे सांभाळू लागले. मुले झाल्यावर नोकरी करणे शक्य नव्हते. त्यामुळे मी नोकरीला राम राम ठोकला. पण घरी नुसते बसून राहणेही शक्य नव्हते. सुरुवातीला, घरातच जिम उघडले, पण हळुहळू कसरत करणा-यांची संख्या वाढत गेल्याने जागा अपुरी वाटू लागली. मग घरी पदार्थ बनवून विकण्याचा उद्योग सुरू केला. पण ऑर्डर वाढत गेल्या आणि कामाचा ताण जाणवू लागला. मला मदतनीस बाई ठेवणे शक्य नव्हते. मग मी नव-याच्या मित्राच्या सल्ल्याने साडी विकण्याचा व्यवसाय निवडला. त्याच दरम्यान, वर्तमानपत्रात जाहिरात आली, पाच हजारांच्या साड्या विकत घ्या अन् स्वतंत्र व्यवसाय सुरू करा! मी पाच हजारांच्या साड्या विकत घेतल्या. माझ्या व्यवसायाचा पाया तेथेच रचला गेला !” ज्योती त्यांची कहाणी आत्मविश्वा साने सांगतात.
ज्योती यांच्या साड्या विकल्या गेल्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांना व्यवसायासाठी आत्मविश्वास मिळाला.
ज्योती सांगतात, “माझ्याकडील साड्या लोकांच्या पसंतीस उतरल्या आणि ओळखीतून ऑर्डर मिळत गेल्या. मेहनत, आत्मविश्वास यांच्या जोरावर मी यशाचा टप्पा गाठला आहे अशीच माझी भावना आहे. कॉटन, कांजीवर, धर्मावरम, नारायण पेठ या साड्यांपासून ते पैठणीपर्यंत… उत्तमोत्तम साड्या माझ्याकडे उपलब्ध आहेत. ग्राहक ज्या प्रकारची साडी मागेल त्या प्रकारची साडी देण्याचा माझा प्रयत्न असतो.”
मी स्वतः हैदराबाद, बंगलोरला जाऊन साड्या खरेदी करते. मी सुरुवातीला, मुली लहान असताना, त्यांना घेऊन जात असे. मग ते साड्यांचे ओझे घेऊन मुंबई गाठायची. जेव्हा माझ्या साडीच्या व्यवसायातील तन्मयता तेथील व्यापार्यां ना कळली, तेव्हापासून त्यांची चांगली मदत मिळू लागली. माझा प्रामाणिकपणा सिद्ध होत गेला.
आता, मी फारच सराईत झाले आहे. लांबून कापड पाहूनही त्याचा पोत कळतो. या व्यवसायामुळे माणसे जोखण्याचे कौशल्यही अंगी आले. वेगवेगळ्या स्वभावाचे, नाना तर्हेपचे विक्रेते व ग्राहक भेटतात. त्यांना कौशल्याने आणि संयमाने हाताळावे लागते. या व्यवसायात मेहनत खूप असते. कधी कधी, सकाळी दहा वाजता मी साड्या दाखवण्यास बसते, ते रात्री आठ वाजेपर्यंत मी एकाच ठिकाणी बसलेली असते. यशस्वी व्यावसायिकाच्या अंगी हा संयम येतोच.”
ज्योती पंडित यांच्याकडे वर्षातून एकदा, जून महिन्यात साड्यांचा सेल असतो. अगदी दोनशे रुपयांपासून ते जास्तीत जास्त किंमतीच्या साड्या ज्योती यांच्याकडे उपलब्ध असतात. त्यांनी एक अनुभव सांगितला, “माझ्याकडे साड्यांचा दर्जा उत्तम असतो. त्यामुळेच ग्राहक साड्या खरेदी करायला दूरदूरहून येतात. एक बाई माझ्याकडे आल्या. चेहरा ओळखीचा वाटला पण मला त्यांचे नाव आठवेना. मी त्यांना घरात बसायला सांगितले. त्या बाई म्हणाल्या, की त्या दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे, त्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाच्या साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. आता धाकट्या मुलीच्या लग्नासाठी साड्या खरेदी करायला आल्या आहेत. माझ्या व्यवसायाचे व आजवरच्या परिश्रमाचे याहून मोठे फलित ते काय?”
त्यांच्या घरातील पाचवारी पसारा त्यांना यशस्वी उद्योजक म्हणून समाधान मिळवून देतो.
– लता दाभोळकर
latadabholkar@gmail.com
Address kalel ka. Email
Address kalel ka. Email subhadab4@gmail.com
मी
स्वता पैठणी विंनकाम करते…
मी
स्वता पैठणी विंनकाम करते
मी येवला येथे राहते मोबाईल नंबर9028191336
Comments are closed.