कोकणातील चिपळूणजवळील वहाळ गावात ‘चतुरंग’ या संस्थेतर्फे गरीब विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासवर्ग चालवले जातात. नापास विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी, उजळणी वर्ग चालवून त्यांचा पास होण्याचा निर्धार वाढवण्यात येतो. शिस्त, काटेकोरपणाने निरपेक्ष व निष्ठापूर्वक सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल व या निवासी वर्गाबद्दल माहिती. गेली चाळीस वर्षे नवे नवे कार्यक्रम करण्यात ख्यातनाम झालेल्या ‘चतुरंग’तर्फे या निवासी अभ्यासवर्गात चौरस आहार देण्यात येतो. मुंबईच्या काही अव्वल शिक्षकांचे मार्गदर्शनही त्यांना दिले जाते.
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164