पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर येथून सुटली. ते तेव्हा लाकडी स्थानक होतं. बोरिबंदरसमोरील परिसर धोबी घाट म्हणून ओळखला जायचा. धोबी घाट महालक्ष्मीला जाईपर्यंत तिथे कपडे धुण्याचं काम चालत असे. फ्रीअर मार्गाकडे जाणारा एक भाग फाशी तलाव किंवा गिबेट पाँड म्हणून प्रसिद्ध होता. तिथे 1800 सालापर्यंत खुन्यांना जाहीर फाशी देण्यात येई. तर कमी गंभीर गुन्हा करणा-या गुन्हेगारांवर नासकी अंडी, चपला, चिखल, विटांचा चुरा फेकण्यात येई. 1840 मध्ये या प्रकारची शिक्षा रद्द करण्यात आली. बोरिबंदर आणि व्हिक्टोरीया टर्मिनल परिसराच्या इतिहासास उजळणी देणारा हा लेख.
About Post Author
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्यानंतर वृत्तसंस्था, दैनिक ‘मुंबई चौफेर’ आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र’सोबत 2010 साली जोडले गेले. त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्यांचा ‘डिपार्टमेन्ट’, ‘अब तक छप्पन – 2’, ‘अॅटॅकस् ऑफ 26/11’, ‘क्विन’, ‘पोस्टर बॉईज’ अाणि ‘शेण्टीमेन्टल’ अशा व्यावसायिक चित्रपटांच्या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते ‘बुकशेल्फ’ नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात.
लेखकाचा दूरध्वनी
9029557767