कोरोना : मलेशियात मॉल्स खुले, प्रवास खुला! (Corona in Malaysia Lockdown is Over)

2
32
मी मूळ मुलुंडची (मुंबई) आहे. माझा जन्म हुबळी येथे आणि संगोपन मुंबईमध्ये झाले. मी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य पदवी मिळवली आहे. मी मुंबईच्या  लोअर परळमधील रिझलट्रिक्स पब्लिक्स इंडिया या कंपनीत काम करत होते. माझे पती साहिल यांना क्वालालंपूरमध्ये नोकरीची संधी मिळाली; म्हणून आम्ही भारतातून मलेशियाला जाण्याचा निर्णय घेतला. मलादेखील तेथे नंतर नोकरी मिळाली. माझे पती 2017 साली आणि मी 2018 मध्ये मलेशियात आलो. आम्ही क्वालालंपूरमध्ये राहतो. दोघेही डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करतो. त्यासाठी मलेशिया येथे चांगल्या संधी आहेत.

मलेशियामधील कोरोनोच्या घटनांमध्ये वाढ मार्चमध्ये होऊ लागली. फेब्रुवारीमध्ये केवळ तीस ते साठ प्रकरणे होती. एक धार्मिक मेळावा 16 मार्च रोजी घेण्यात आला आणि तेथूनच कोरोना प्रकरणांची वाढ सुरू झाली. तेव्हापासून रोज कोरोनाचे नवे दीडशे ते दोनशे रुग्ण वाढू लागले. त्यामुळे मलेशिया सरकारने 18 मार्च ते 31 मार्चपर्यंत पहिला लॉकडाऊन घोषित केला. संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता.     
         मलेशियात 18 मार्चपासून एमसीओ (हालचाल नियंत्रण आदेश) लागू करण्यात आला. त्यावेळी आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. शाळा व कार्यालये बंद होती. लोक घरात अडकले होते, करमणूकीची साधने नव्हती, घरी काम करणाऱ्याची सेवा, जीम, उद्याने, मॉल्स सर्व बंद करण्यात आले होते. रेस्टॉरंट्स फक्त पार्सल (टेक अवेज) देत होती. सामाजिक मेळाव्यांवर बंदी होती. सरकारने स्वतः मायदेशी परतणार्‍या मलेशियन नागरिकांना सक्तीने चौदा दिवस त्यांचा खर्च करून अलग राहण्यास सांगितले. मलेशियाची स्थानिक भाषा मलय असून त्यांचे स्थानिक भोजन नसी लेमक आहे.
     
घराबाहेर पडताना मास्क अनिवार्य करण्यात आले होते. सरकारने कोविद-19चा संसर्ग होऊ नये म्हणून चांगले उपाय केले. त्यामुळे जनतेसाठी फक्त अत्यावश्यक असलेल्या वस्तूंचा पुरवठा केला जात होता. आम्हाला अगदी आवश्यकता असेल तरच बाहेर जाण्याची परवानगी होती. प्रत्येक कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला कुटुंबासाठी लागणारा किराणा सामान आणण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी होती. लोक खूप घाबरले होते आणि सर्व काही विकत घेऊ लागले. किराणा दुकानांनी होम डिलिव्हरी सिस्टम सुरू केली आणि आम्ही तेथे दुकानात गेलो तर ते तापमान तपासत आणि सर्व वैयक्तिक तपशील घेत. तेथे प्रत्येक स्टोरमध्ये सॅनिटायझर्स वापरासाठी ठेवण्यात आले होते. एप्रिलमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यावेळी रुग्णांची संख्या सहा हजारावर गेली होती. म्हणून सरकारने अधिक कडक नियम बनवले आणि जो रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत असेल त्यांना आरएम(1000) एक हजार दंड आकारला जाई.
       मे महिन्यात रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत गेली आणि आर्थिक क्षेत्रे, रेस्टॉरंट्स सर्व उघडण्यात आली. लॉकडाऊन कालावधीत शहरे स्वच्छ केली गेली, सर्वत्र सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात आली. मलेशियातील लोक आज्ञाधारक आहेत. ते नियमांचे पालन करतात. जूनमध्ये दैनंदिन रुग्णांची संख्या जवळपास वीस-तीसपर्यंत खाली आली आणि जवळजवळ सर्व काही उघडण्यात आले आहे. काही कार्यालये घरून कार्य करत आहेत आणि प्रत्येकजण सोशल डिस्टन्सिंगचा सराव करत आहेत.
      आम्ही 18 मार्चपासून घरून काम करत आहोत आणि फक्त गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो, ही वेळेची गरज असल्याने आम्ही बर्‍याच वेळा घरीच राहतो. आम्हाला आमच्याजवळील एका सुपरमार्केटमध्ये भाज्या, फळे आणि धान्य यासारखे सर्व किराणा सामान सहज मिळे. भारतीय दुकाने सामान घरपोच करत होती. त्यामुळे आम्ही डाळ, भारतीय नाष्ट्याचे पदार्थ, पोहे, रवा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची मागणी करू शकू. आमच्या निवासी इमारतीत कठोर नियम होते.
     
मलेशियाची लोकसंख्या सुमारे बत्तीस दशलक्ष आहे. तेथे मुख्यत: तीन धर्म आहेत. स्थानिक मुस्लिम, चिनी (चीनमधून स्थलांतरित झालेले) आणि भारतीय (भारतातून स्थलांतरित झालेले). मराठी लोकांनी ‘महाराष्ट्र मलेशिया मंडळ’ नावाचा समुदाय तयार केला आहे. तेथे ते गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दिवाळीअसे सर्व भारतीय सण साजरे करतात. ते समुदाय सदस्यांसाठी खाद्य महोत्सव, प्रदर्शने व अन्य कार्यक्रमांची व्यवस्था करतात. त्यांच्याकडे महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप ग्रूप आहेत. त्यात सदस्य विविध विषयांवर चर्चा करतात.

सध्या मलेशियात दररोज कोरोनाचे सरासरी तीन-चार रुग्ण आढळतात. आरएमसीओ 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लागू आहे, लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. आंतरराज्य प्रवास खुला करण्यात आला आहे. आता सर्व काही सामान्य आहे. लोक घराबाहेर पडून सर्वत्र फिरू लागले आहेत. ते रेस्टॉरंट्समध्ये जेवण करण्यासाठी, मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी, उद्याने, किनारे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जातात. ते घराबाहेर जाताना मास्क घालतात आणि सर्वत्र तपमान तपासणी केली जाते.

मयुरी बोंगले +60 17-376 4168 mayuri89.jahagirdar@gmail.com
———————————————————————————————————————

मयुरी आणि त्यांचे पती साहिल
————————————————————————————————————–

About Post Author

2 COMMENTS

  1. अनुभव लिहिणारे सगळे लहान देशात गेलेले आहेत . सर्वसाधारणपणे सगळयांचे अनुभव सारखेच असतात. भारतीय लोक आज्ञाधारक नाहीत असा समज होतो 

  2. खूप छान माहिती मिळाली इतर देश कोरोना नियंत्रणात येतोय भारतातही नक्की नियंत्रणात येईल याचा आत्मविश्वास निर्माण झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here