डॉ. अविनाश वैद्य
3. कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मा देणे
2.Aids या रोगावर उपयुक्त ठरलेली औषधे
1. मलेरियावरील उपचारात वापरली जाणारी औषधे
या रोगावर अजून तरी कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. जगात अनेक ठिकाणी विविध उपचारपद्धती अजमावल्या जात आहेत.
अमेरिकेतील काही रुग्णांत त्यापेक्षा निराळ्या पद्धतीचे परिणाम शरीरावर दिसून आले. Lungs, Heart, Brain, Liver व Kidney या महत्त्वाच्या अवयवांमधील छोट्या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या असंख्य तयार झालेल्या दिसल्या. त्याला Dic असे म्हणतात. तशा रुग्णाचे निदान करणे फार कठीण आहे व तसे रुग्ण 24 ते 36 तासांच्या आत दगावू शकतात. अमेरिकेत तसे रुग्ण वीस ते तीस या वयोगटातीलही आहेत. भारतातही अशा तऱ्हेने काही तरुण एकाएकी मृत पावल्याची उदाहरणे आहेत. परदेशातील पोस्टमार्टम रिपोर्टवरून या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. भारतात पोस्टमार्टम रिपोर्ट करण्याची पद्धत ठेवली आहे, की कसे ते माहीत नाही. रोगाचे निदान जवळ जवळ शंभर टक्के Throat Swab घेऊन पीसीआर पद्धतीने अचूक होते. कौतुकाची बाब म्हणजे त्या टेस्टकरता लागणारी Kits पुणे येथील My lab या कंपनीने तयार केली असून ती भारतात वापरली जात आहेत. टेस्ट करण्यासाठी कुशल अनुभवी तंत्रज्ञ व उच्च पातळीच्या Laboratory ची गरज असते. त्या टेस्टचा खर्च चारहजार पाचशे रूपये असून तो सर्वांना परवडणारा नाही. लागण झालेल्या व्यक्तीची वीस किंवा त्याहून जास्त दिवसांनंतर रक्तातील अँटीबॉडी डिटेक्शन ही टेस्ट करता येते. त्यावरून किती रूग्ण कोरोनाबाधित होऊन गेले आहेत याचा निष्कर्ष काढता येतो. परंतु या टेस्टचा उपयोग संक्रमणातील काळात होऊ शकत नाही. त्यासाठी ही एक फार मोठी मर्यादा आहे. चीनमधील कंपन्यांकडून या टेस्ट कीट्स मागवण्यात आल्या होत्या, परंतु त्या सदोष असल्याने त्यांचा काहीच उपयोग होऊ शकला नाही. त्या बाद करण्यात आल्या आहेत.
विषाणू नाक व घसा या भागातून हळूहळू फुप्फुसांमध्ये (Lungs) प्रवेश करतात. तेथे पोचण्याचा संक्रमण काळ साधारण चार ते चौदा दिवस असतो (Incubation Period). त्या काळामध्ये साठ ते ऐंशी टक्के लोकांना कोणतीच लक्षणे दिसत नाहीत (Asymptomatic). त्यांतील काही व्यक्ती सुपर स्प्रेडर असू शकतात. तशा व्यक्ती जेव्हा बाहेरील लोकांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांतील अनेक लोकांना कोरोनाची लागण होते. ही या साथीतील फार गंभीर समस्या आहे. सुपर स्प्रेडर व्यक्ती शोधणे हे महाकठीण काम आहे. उदाहरणार्थ, दक्षिण कोरियातील सेऊल शहरामध्ये एका स्त्रीने दोन समारंभांत हजर राहून जवळ जवळ चारशे लोकांना लागण दिली होती. परंतु तिचा तपास लागल्यानंतर मात्र ती चेन थांबवण्यात यश आले. फुप्फुसांमध्ये शिरलेला विषाणू चतुरपणे वायुकोशाच्या भिंतीच्या पेशींचा संपूर्ण ताबा घेऊन प्रचंड हल्ला करतो, तेव्हा शरीरातील नवीन तयार झालेल्या इम्यून सिस्टम सेल्स (रोगप्रतिकारशक्ती) मोठ्या प्रमाणात युद्धाला सामोरे जातात व त्या तुंबळ युद्धात त्यांची सरशी झाली तर विषाणू निष्प्रभ होतात. अशा वेळी रोगाची थोडी लक्षणे दिसतात. पुढे चौदा दिवसांत रोगी पूर्ण बरे होतात व त्यांचा लॅब रिपोर्ट निगेटिव्ह येतो. परंतु जर या लढाईत इम्यून सिस्टीम सेल्सचा पाडाव झाला तर फुप्फुसांमधील Alveolar walls तुटतात व तेथे चिकट द्रवाचे गोळे (Mucus Plugs) तयार होतात. त्याच वेळी रक्तातील तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिन या घटकावर गंभीर परिणाम होतो. या दोन गोष्टींमुळे शरीराला ऑक्सिजन वायूचा पुरवठा कमी होत जातो व कार्बन-डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत जाते. रोग्याच्या अशा गंभीर स्थितीत बाहेरून ऑक्सिजनचा पुरवठा व व्हेंटिलेटरची मदत तातडीने मिळाल्यास रोगी वाचण्याची शक्यता असते. परंतु शरीराकडून प्रतिसाद कमी मिळाल्यास मृत्यू अटळ असतो!हातात टाटाचे बारीक मीठ घ्या. त्यातील एक कण बाजूला तळहातावर ठेवा. त्याच्यापेक्षा दहाहजार पटींनी लहान आहे कोरोनाचा विषाणू! असे लक्षावधी कण श्वासातून, खोकल्यातून वा शिंकेतून बाहेर पडणाऱ्या एका थेंबात (Aerosol) असतात. काहीवेळा तो थेंब तीन ते पाच फूटांपर्यंत खाली न पडता, जवळच्या व्यक्तीच्या चेहर्यावर वा हातावर पडू शकतो आणि त्यातूनच होते विषाणूची लागण! म्हणून मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व आहे. ते थेंब पाच फूटांनंतर खाली पडतात व कोणत्याही पृष्ठभागाला चिकटू शकतात. त्यांचे तेथील अस्तित्व किती तास वा किती काळ राहते याबद्दल ठामपणे सांगणे कठीण आहे. विषाणूंच्या बाहेरील आवरणात fatty layer आहे. तो साबण वा कोणत्याही प्रचलित Disinfectant मध्ये विरघळत असल्याने विषाणू निष्प्रभ होतो. त्यामुळे मधून मधून साबणाने हात धुणे हे फार गरजेचे आहे.
डॉक्टरांकडून आलेले लेख अधिकृत म्हणून वाचता येतात ते विश्वसनीय वाटतात ..धन्यवाद ..सोपी भाषा ..अद्यावत माहिती
सामान्य माणसाला समजेल अशा शब्दात वरील लेख आणि त्यातील रोगाविषयी वैज्ञानिक /वैद्यकीय माहिती मिळाली जी अतिशय महत्त्वाची आहे. हे सारे कधी संपेल या विवंचनेला या लेखाने थोडा दिलासा मिळतो..
कोरणा विषयाविषयी अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे
उपयोगी माहिती आहे
वास्तव आणि खबरदारी या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.. विषाणू विषयी सविस्तर माहिती दिली आहे.. धन्यवाद सर..
अतिशय अभयासपूर्ण लेखन. धन्यवाद .