‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा जन्म महाराष्ट्र-भाषा व संस्कृती यांचे डॉक्युमेण्टेशन व्हावे आणि तेणेकरून या स्थानिक बाबी जागतिक स्तरावर नोंदल्या जाव्या याकरता झाला आहे. त्यामुळे ‘थिंक महाराष्ट्र’वर मजकूर प्रसिद्ध करताना त्याच्या सत्यासत्यतेची खात्री दोन वेळा करून घेण्याकडे कल असतो. परंतु भाषा काय किंवा संस्कृती काय, आखीवरेखीव पद्धतीने विकसित होत नाहीत, म्हणून डॉक्युमेण्टेशन ललित पद्धतीने व्हावे असाही प्रयत्न असतो. संस्कृतीत काही गोष्टी तर घडलेल्या म्हणून इतक्या पक्केपणाने प्रचलित असतात (जसे, की लो. टिळक यांची शेंगाच्या टरफलांची गोष्ट, गांधीजींनी केलेल्या चोरीची गोष्ट), की त्या खऱ्या म्हणूनच गृहित धरल्या जातात. त्यांच्या सत्यतेचा दावा करता येतोच असे नाही. मात्र अशा गोष्टींमुळे समाजाच्या सांस्कृतिक स्वभावावर प्रकाशही पडत असतो. त्या गोष्टी हलक्याफुलक्या, गमतीदार असतात आणि गंभीर व उद्बोधकही असू शकतात. तशा गोष्टी ‘किस्से… किस्से…’ या सदरात संकलित करायच्या आहेत. वाचकांनीही या सदरासाठी साहित्य पाठवावे.
फोन – 9892611767/ 9323343406/ 02224131009
इमेल – info@thinkmaharashtra.com
पत्ता – थिंक महाराष्ट्र डॉट कॉम, 22 मनुबर मॅन्शन, पहिला मजला, 193 आंबेडकर रोड, चित्रा सिनेमासमोर, दादर (पूर्व) मुंबई – 400014.