ऊहापोह हा सामासिक शब्द आहे. तो समास ऊह आणि अपोह या दोन शब्दांचा आहे. अपोह या शब्दाचेही अप-ऊह असे दोन घटक आहेत. ऊह या संस्कृत धातूचा अर्थ आहे- तर्क करणे, विचार करणे. ऊह हे त्यावरून तयार झालेले नाम आहे. तर्क, विचार हा त्याचा अर्थ. अप ऊह म्हणजे तो तर्क, तो विचार बाजूला सारणारा दुसरा विचार. म्हणजेच ऊहापोह या शब्दाचा अर्थ-प्रथम एक विचार मांडून झाल्यावर त्याच्या विरूद्धचा दुसरा विचार मांडणे- म्हणजेच साधकबाधक चर्चा करणे.
– म.बा.कुलकर्णी gjcrtn@gmail.com
(‘शब्दचर्चा’ वरून उद्धृत संपादित -संस्करीत)