‘उरकणे’ या क्रियावाचकाचा उपयोग ‘चल, पटपट काम आटोप! फार वेळ लावू नकोस!’ अशी सूचना देताना केला जातो. उरकणे म्हणजे एखादी गोष्ट चटकन करून टाकणे. पण तो शब्द आला कोठून? ‘उरग’ असा संस्कृत शब्द आहे. ‘उरसा गच्छति’ म्हणजे ‘छातीने चालतो, तो सर्प’ असा त्या शब्दाचा अर्थ. सर्पाची गती कशी असते? तो नजरेआड किती झटकन होतो, नाही का? त्या उरगाप्रमाणे एखादी गोष्ट वेगाने करणे म्हणजे ‘उरगणे’. त्या शब्दाचा उच्चार ‘उरकणे’ असा भ्रष्ट होणे स्वाभाविक आहे.
-म.बा.कुलकर्णी gjcrtn@gmail.com
(‘शब्दचर्चा’ वरून उद्धृत संपादित -संस्करीत)