महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या स्वरूपाला ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्लेख आला असून त्यांनी या भाषेचा भिल्लांची भाषा म्हणून उल्लेख केला आहे.
महाराष्ट्राच्या धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांत बोलली जाणारी ‘अहिराणी’ ही एक भारतीय आदिम बोली. तिच्या थोड्या वेगळ्या ‘खानदेशी’ असे म्हणतात. मराठीची पोटभाषा म्हणून समजली जाणारी ही बोली सर ग्रिअर्सन संपादीत ‘लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया’च्या नवव्या खंडाच्या तिस-या भागात अहिराणीचा उल्लेख आला असून त्यांनी या भाषेचा भिल्लांची भाषा म्हणून उल्लेख केला आहे. मात्र त्यांचे हे संशोधन चुकीच्या माहितीवर बेतले असून अहिराणी ही सर्व जातीजमातीच्या लोकांची लोकभाषा आहे. अहिर लोकांची भाषा म्हणून अहिराणी अशी या भाषेच्या नावाची व्युत्पत्ती आहे. अहिराणी ही लोकभाषा आजही जवळजवळ अंदाजे एक कोटी लोक बोलतात. महाराष्ट्रातील तीनशे किलोमीटर लांब व दोनशे किलोमीटर रूंद एवढ्या मोठ्या भौगोलिक क्षेत्रात ही भाषा बोलली जाते.
अहिराणीचे अभ्यासक डॉ. सुधीर देवरे यांनी ‘अहिराणी भाषा -सामाजिक अनुबंध’ या विषयावरील परिसंवादात अहिराणी बोलीत केलेले भाषण ‘थिंक महाराष्ट्र’वर प्रसिद्ध करत आहोत. आजची ज्ञानभाषा असलेल्या इंग्रजी भाषेत जसा इतर अनेक भाषांचा मिलाफ आहे, त्याचप्रमाणे मराठीतही अनेक बोलीभाषांचा मिलाफ आढळतो. मात्र त्या भाषांकडे आज दुर्लक्ष होत असल्याचे लक्षात येते. जर बोलीभाषा सकस झाल्या तर आपोआप प्रमाणभाषाही सशक्त होते. म्हणूनच अहिराणीचे स्वरूप (अहिराणी न जाणणा-या) मराठी भाषिक जनतेस कळावे या उद्देशाने हे भाषण येथे अहिराणी भाषेत सादर करत आहोत. खाली नमूद करण्यात आलेल्या भाषणाचा अर्थ चटकन समजावा, यासाठी देवरे यांनी मराठी वाचकांसाठी थोडे प्रास्ताविक केले. अहिराणीतील हे भाषण वाचताना आधी पुरेसा अर्थबोध होत नव्हता. मात्र हे प्रास्ताविक वाचल्यानंतर जेव्हा पुन्हा हे भाषण वाचनात आले त्यावेळी मजकूरा ब-यापैकी अर्थबोध तर झालाच, पण त्याचबरोबर या भाषेची ढब आणि ठेवण थोडी जवळून जाणताही आली. वाचकांनाही याप्रकारे अहिराणीतील भाषणाच्या वाचनात मदत होईल या उद्देशाने हे प्रास्ताविक सादर करत आहोत.
– किरण क्षीरसागर
प्रास्ताविक
या भाषणात अहिराणी भाषेच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या बोलींवर, त्याच्या व्युत्पत्ती–उत्पत्तींवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न झालेला आहे. प्रत्येक स्थानिक बोली भूगोल, काळ आणि परिवेश भाषेतून अविष्कृत करत असते. तसेच लोकपरंपरा, लोकवाङमय, लोकव्यवहार, लोकपरिमाणे, लोकवस्तू व लोकवास्तू यातून भाषा घडत असते.
भाषाविचाराबरोबरच देव, विधी, उत्सव, नाट्य याचाही विचार सामाजिक अनुबंधमध्ये करण्यात आलेला आहे. लोक तसे देव! स्थानिक पातळीवर ज्या झाडांची पत्री सहज उपलब्ध होऊ शकते, जी फळे सहज उपलब्ध होऊ शकतात, तिच देवाला वाहिली जातात. जे पदार्थ त्या त्या परिसरात तयार केले जातात, तेच पदार्थ देवाला नैवेद्य म्हणून दाखवतात. या अर्थाने हे लोकदेव आहेत.
अहिराणी व इतर बोलींमध्ये सध्या स्तंभलेखन होत असून ते किस्से, विनोद, फटके अशा पद्धतीने हलक्याफुलक्या स्वरूपात दैनिकांतून होत आहेत. मात्र भाषाविषयक नियतकालिकातून वा दर्जेदार वैचारिक मासिकातून हे लेखन होत नाही. बोलीभाषांमधून यापुढे वैचारिक लेखन व्हायला हवे. तसेच समीक्षेची भाषाही यायला हवी.
कोणत्याही बोलीची उत्पत्ती संस्कृतमधून झाली असे संशोधन आजपर्यंत होत आहे. खरे पाहिले तर प्रमाणभाषेतून बोली तयार होणार नाही, तर बोलीभाषेपासून प्रमाणभाषा तयार होऊ शकतात. म्हणून त्या त्या गटात, त्या त्या परिसरात आधी बोलीभाषा अस्तित्वात आल्या आणि नंतर प्रमाणभाषा तयार झाल्या.
अहिराणी भाषा – सामाजिक अनुबंध
आगोदर मानुस, त्यानानंतर समाज आणि मंग भाशा. भाशा आणि बोली हाऊ फरक आता यानंपुढे करना नही. जी बोली आपू बोलतंस ती भाशा. मंग हायी भाशा आक्खा जगनी र्हावो नहीत्ये येक गाव–पाडा पुरती बोलामा येवो. बोली म्हंजे भाशाच र्हास.
मानसं येरान्येसंगे देवानघेवान कर्ता जे काही बोलतंस ती भाशा. कोनतीच भाशामा आशुद्ध काही र्हात नही. तशे पाहे त्ये आजनी जी जागतिक भाशा इंग्रजी शे ती सुद्धा शुद्ध नही. आशेच आनखी आठे कोनीतरी म्हने मराठी मानससले अहिरानी भाशा कळत नही. कळस आनि बाहेर सगळा महाराष्ट्र दखल भी घेस. फक्त काम चांगलं व्हवाले पाहिजे. कालदिस मन्ह जे आठे ‘अहिराणी लोकपरंपरा’ पुस्तक प्रकाशित जयं त्ये मुंबईना ग्रंथाली प्रकाशनी काढं. दिनकर गांगल सर यास्नी त्ये व्हयीसन मांगी घिदं. महाराष्ट्र टाईम्स ना तैनना कार्यकारी संपादक यास्नी मैफल पुरवनी मा अहिराणी ढोल वर लेख लिव्हा व्हता. डॉ.य. दि. फडके यास्नी बेळगावना अ.भा.साहित्य संमेलनना अध्यक्षीय भाशनमा येक पानभर अहिराणी ढोल वर लिव्ह व्हतं आनि या तिन्ही अभ्यासक अहिराणी भाषक नव्हतात हायी सांगाकर्ता हाऊ उल्लेख करी र्हायनू.
दोन जनस्ले येकमेकनं सांगेल कळनं की जयी ती भाशा तयार. मंग तुमी तिले कोनतंबी नाव द्या. तिले नाव दिधं नही तरी कोनतीबी भाशानं काहीच आडत नही. मंग आशा भाशा त्या त्या लोकस्ना गटनं, जातपातंन नाव लायीसन लोकजीवनमा तग धरी र्हातीस.
अहिर लोकस्नी अहिराणी भाशाबी खानदेशमा आशीच तयार व्हयनी. आजूबाजूनं लोकजीवन म्हंजे लोकस्न रोजनं जगनं. हायी जगनं भाशामा वनं आनि अहिराणी भाशा तयार जयी.
मानुस आठून तठून जशा येक नही. जमीन आठून तठून जशी येक नही. बाहेरनी हवा-वातावरन आठून तठून जशे येक नही. तशा भाशाबी आठून तठून येक नहीत, यान्ह मोर्हेबी भाषा येक र्हानार नही आनि यानं मोर्हे कोनी किताबी तशे करानं ठरायं तरी ते यव्हवारी व्हनार नही. तरीबी आक्खा जगमा आज आपल्या सवतान्या भाशा बोलाले लोक लाजीकाजी –हायनात. म्हनूनच गंजच भाशा आजपावत मरी गयात तिस्ना पत्ताबी लागत नही.
लोकजीवन जशे र्हास तशी भाशा र्हास. लोकजीवनमा ज्या ज्या जिनसा र्हातीस, ज्या ज्या झाडं झुडपं र्हातंस. जमीन, पानी, हवा, पीकंपानी जशे र्हास त्यास्ना वरतीन लोकजीवनमा लोकपरंपरा, लोकवास्तू, लोकवस्तू, लोकहत्यारं तयार व्हतंस आनि मंग त्यामुळे आपोआप भाशा तयार व्हस.
संस्कृतमजारतीन मराठी आनि मराठीमातीन अहिराणी आशी जी आजपावत आपुले कोनी अहिरानी भाशानी उत्पती सांगी व्हयी ती चूक शे. बोलीभाशास्पशी प्रमानभाशा तयार व्हस. प्रमानभाशास्पशी बोली नही तयार व्हनार, हायीच कोनी ध्यानात घेत नही. म्हनीसन आशे कैन्हनं उलटं संशोधन व्हयी र्हायनं.
कोनत्याभी भाशामा बाकीन्या भाशास्ना शब्द येनं साहजिकच शे. काही टक्का दुसरी भाशाना शब्द बोलीस्मा दखातंस म्हनीसन ती भाशा त्या अमूक परमानभाशापशी तयार जयी, हायी म्हननं वडनं पान पिपळले लावानं गत व्हयी. लोक जधळ भाशा वापराले लागतंस आनि दुसरी भाशा बोलनारा लोकससांगे व्यवहार करतंस तधळ शब्द इकडना तिकडे आनि तिकडना इकडे व्हत र्हातंस. काही काळमा त्या शब्दबी भाशाना घटकच व्हयी जातंस आनि हायी साहजिकच शे.
अहिराणी बोली- सामाजिक अनुबंध, अशा मराठी परमानभाशामा या परिसंवादना इशय शे. सामाजिक अनुबंध म्हंजे समाजसोबतनं नातं. यामा चार पोटइषय करेल शेत. त्यापैकी पहिला इषय:
खान्देशातील विधी, विधी–नाट्य, देव–देवता :
- विधी = व्रत घेनं, चक्र भरनं, धोड्या, तोंड पाव्हाना कार्यक्रम, सुखगाडी ( सुखदेवता )
- विधी-नाट्य = भोवाडा, खंडोबा आढीजागरण, भील आनि कोकणा आदिवासी भाऊस्नी कन्सरा माउली.
- देव–देवता = कानबाई, रानबाई, गौराई, काठीकवाडी, खांबदेव
(नागदेव, वाघदेव), म्हसोबा, आया, डोंगरदेव, मुंजोबा.
जशी मानसं, तशा देव. विधी, विधी–नाट्य आणि देव-देवता यास्माबी त्या त्या भागनी–परिसरनी दाट सावली पडेल र्हास. जशे मानसस्न रोजनं जगनं, राग-लोभ, काम, भीती, समजुती, भक्ती ह्या परंपराखाल त्या त्या भागात तयार जयात तशा त्यावर घडामोडीस्ना आळ-आरोप देव वर करेल र्हास, जो अहिराणी भागामाबी लागू व्हयी.
लोक देव हाऊ भाव ना भुख्या –हास. म्हनीसन थोडासा कपडा, थोडासा निवद यामा तो खुश व्हयी जास. त्याले भक्त कडथीन कोनताबी घबाडनी अपेशा –हात नही. ज्या सूतना कपडा आठे तयार व्हतस त्याच कपडास्मा देव राजी व्हयी जास. ज्या झाडस्ना पानं आठे सहज मिळतीन त्या झाडस्नी पत्रीच या देवस्ले चालस. ज्या ज्या फळं आठे त्या त्या रूतूमा येतंस, त्याच फळ आठला देवले आवडतंस. ज्या पदार्थ आठे घरघरमा कमी खर्चात तयार व्हतस, तोच निवद या देवस्ले लागस आनि त्याच निवदवरी त्यास्नं पोट भरस.
२ रा इषय : लोकगीतातील स्त्री जीवन दर्शन = लग्नातला गाना, झोकावरला गाना, गौराईना गाना, कानबाईना गाना, गुलाबाईना गाना, बारमजारल्या गाळ्या, अहिराणी रडनं, ओव्या, घरोटवरल्या ओव्या, आन्हा, उखाना, कोडा, म्हनी, आशा सगळास्मातीन अहिराणी बाईनं बाईपन पाहे त्ये ध्यानात येस, अहिराणी बाईले दागिनास्ना सोस जशा शे तशा रामना म्हनजे पतीना विरह शे. सासरना सारवासले ती जशी कटाळेल शे तशी माहेरपनले- मायले भेटाना नितात शे. माहेरना मानसस्ले भेटाले उतावळी व्हयेल शे. पहाटपशी काम करता करता ती इतकी दमी जास तरी दुसरा दिवस पुल्हाळे उठीसन ती घरोटवर गाना म्हनाइतकी ताजीतवानी व्हई जास.
लोकगीतंसमजारला शब्द आनि त्यास्ना अर्थ पाह्यात त्ये आपुले नवल वाटस, आशी हायी अहिराणी किती शिरीमंत शे हायी लोकगीतंस्मातीन सहज ध्यानात येस.
३ रा विषय : अहिराणी – बोली संशोधन – एक आढावा = अहिरानीना इतिहास, अहिरानीना भूगोल आनि अहिरानीनी उत्पत्ती–व्युत्प्तती यावर आपू वाचतंस आनि तेच सांगतंस. अभीर – अहिर – अहिराणी हायी सूत्र आता आपू कैन्हनं मान्य करी टाकं.
अहिराणी हायी मागधी, सौराष्ट्री, शौरसेनी, महाराष्ट्री, पैशाची या सगळया भाशास्पशी तयार व्हयनी का संस्कृत – मराठी –आशी वाटधरी तयार जयी? आशा इचार करापेक्षा ती आठेच तयार जयी व्हयी आशे काबर म्हनू नही?
अहिरानी भाशा आठेच रांगनी, आठेच तिन्हा बोबडा बोल फुटनात आनि आठेच ती चार जिल्हास्मा हात पाय पसरी तिन्हा जम बसाडा आशा आपू का इचार करतं नहीत. तो कराले पाहिजे.
४ था विषय : अहिराणीतील स्तंभलेखन = अहिराणीमा स्तंभलेखन व्हयी -हायनं आता, पन फक्त पेपरमा. मासिकं आनि भाशाले-इचारले जागा देनारा नियतकालिकस्मा अजून आशे स्तंभलेखन दिसत नही. यानं कारन काय ? गावगप्पा, चुटका, फटका, किस्सा यानंपुढेबी हायी लिखान सरकाले पाहिजे ना. घटकाभर करमनुक म्हनीसनच काबरं हायी स्तंभलेखन व्हयी र्हायनं? अहिरानीमा वैचारिक लेखनबी व्हवाले पाहिजे आनि समीक्षानी भाशाबी येवाले पाहिजे, जी अजून येत नही.
आता या चर्चामातीन – म्हंजे निबंधस्मातीन काय पुढे वनं? काय आर्थ निंघना?
जगमजारली कोनतीबी भाशामा त्या त्या समाजनं आनि तो समाज ज्या भागमा -हास त्या भागनं चित्र दखास. तशे अहिराणीमाबी अहिरानी बोलनारा लोकस्न चित्र अगदी टहाळबन दखास, हाऊ अनुमान या परिसंवादमातीन पुढे वना, हायी आठे नमूद करीसन मी थांबस.
आपला सगळास्ना आभार आनि ज्यास्नी आठे आपला इचार मांडात त्या चारी अभ्यासक यास्नाबी आभार मानीसन हाऊ परिसंवाद संपना आशे जाहीर करस.
(दिनांक ३ व ४ डिसेंबर २०११ ला नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात आयोजित अ.भा. चौथ्या अहिराणी साहित्य संमेलनातील ‘अहिराणी बोली: सामाजिक अनुबंध’ या विषयाच्या परिसंवादातील अध्यक्षिय भाषण.)
डॉ. सुधीर रा. देवरे