अशोक समेळ; सारे काही नाटक! (Stage Personality Ashok Samel)

13
162
अशोक समेळ
नाटककार अशोक समेळ हे नाव मराठी रंगभूमीचा 1980 नंतरचा इतिहास लिहिताना प्रामुख्याने घ्यावे लागेल. समेळ यांची नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून मराठी नाट्यसृष्टीत गेली चाळीस वर्षे सातत्याने कामगिरी आहे. अशोक समेळ यांनी तरुणपणी नट म्हणून एण्ट्री पुत्रकामेष्टी या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर ऐंशीच्या दशकात घेतली. त्या वेळी त्यांना प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर या दिग्गजांचा सहवास लाभला. त्यांच्या चर्चा कास्टिंगवर, नाटकावर, प्रयोगाच्या बांधणीवर होत. समेळ सांगतात, की त्यांचे नाटकासंबंधीचे ज्ञान असे वाढत गेले. नाटकाची संहिता नेमकी कशी लिहिली तर परिणामकारक होऊ शकते याबद्दल नकळत शिक्षण मिळत गेले.         
समेळ यांनीडोंगर म्हातारा झालाया, अनिल बर्वे यांच्या कादंबरीवरून नाटक 1984ध्ये तयार केले. त्याचा पहिला प्रयोग रिझर्व बँकेने केला. तेव्हाच त्यांनी ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचे ठरवले आणि स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. तिलाऋग्वेदहे नाव दिले. ‘डोंगरया नाटकासाठी अशोक समेळयांना लेखक म्हणूननाट्यदर्पणमामा वरेरकरपुरस्कार मिळाले. ते मोठेच यश होते, परंतु व्यावसायिक दृष्ट्या नाटक अयशस्वी ठरले. डोंगर म्हातारा झालाहे नाटक बंद झाले.
त्यांचे दुसरे नाटक होते पिंजरा‘. नाटक रॉबर्ट ब्लॉच यांच्या सायकोकादंबरीवरूनलिहिले होते. नाटक ऋग्वेदनेच निर्माण केले होते. त्यांनी त्या नाटकात पद्मा चव्हाण यांची प्रमुख भूमिकेसाठी निवड केली. ते स्वतःदेखील त्यातील एक महत्त्वाची भूमिका करत होते. पद्मा चव्हाण हे मोठे आकर्षण होते. नाटकाचे तुफान प्रयोग झाले. अशोक समेळ यांना लेखनाबरोबरच दुसऱ्या नाटकात अर्थव्यहारामध्येही यश मिळाले. गुजराती निर्माते कांती मडिया यांनी ते नाटक गुजराती रंगभूमीसाठी स्वीकारले. तेथेही त्या नाटकाचांगले यश मिळाले. गुजरातीत त्या नाटकाचे नाव होतेकचिंडो‘. त्यामुळे अशोक समेळयांच्यासाठी गुजराती रंगभूमीचे दरवाजे उघडले गेले ते कायमचे. समेळ यांनी त्यांचे स्थान नवनव्या नाटकांनी तेथे पक्के केले. त्यांनी लेखक म्हणून मराठी रंगभूमीला एकवीस व्यावसायिक नाटके दिली, तर गुजराती रंगभूमीला सत्तावीस व्यावसायिक नाटके दिली. त्यांची मराठीत कुसुम मनोहर लेले‘, ‘शपथ तुला जिवलगा‘,  ‘तीस वर्षांनंतर‘, ‘तू आहेस तरी कोणही गाजलेली नाटके, तर गुजरातीतपूछे छे दिकरी‘, ‘गांधी बिफोर गांधी‘, ‘सुगंधनु सरनामुही गाजलेली नाटके. त्याशिवाय त्यांनी अनिल बर्वे यांच्या कादंबऱ्यांवरूनयुद्धविराम‘, ‘अकरा कोटी गॅलन पाणी‘, ‘होरपळही प्रायोगिक नाटकेराज्य नाट्य स्पर्धेसाठी लिहिली. अशोक समेळ यांनी रणजित देसाई यांच्या कादंबरीवरूनराजा रविवर्माहे नाटकदेखील लिहिले. त्यात काशिनाथ घाणेकर राजा रविवर्मा यांची भूमिका करणार होते. पण नाटकाची तालीम सुरू होण्यापूर्वीच घाणेकर यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ते नाटक पुढे प्रायोगिक रंगभूमीवर आले आणि सतरा पुरस्कार जिंकून यशस्वी ठरले.
अशोक समेळ यांनी लिहिलेले प्रत्येक नाटक वैशिष्ट्यपूर्ण हे. तरी त्यांच्या शपथ तुला जिवलगा या नाटकाचा किस्सा वेगळाच आहे. त्यांनी ते नाटक आयर्विन वॉलेस यांच्यासेव्हन मिनिट्सया कादंबरीवरून लिहिले. त्या नाटकाचा विषय सेक्स हा होता. ते नाटक बाळ धुरी, स्मिता तळवलकर, आशा पोतदार अशा मान्यवर कलाकारांसह उभे राहिले. सेक्स या विषयावर नाटक आहे म्हणून सेन्सॉरने त्यालासर्टिफिकेट दिले. त्यावर भरपूर वादंग माजले. पुढे, नाटकासर्वांसाठीहे सर्टिफिकेट मिळाले. समेळ सांगतात, मौज अशी की पुढे 2016 साली त्यांची स्वतःचीच सेन्सॉर बोर्डावर नियुक्ती झाली! अशोक समेळ हे लेखक, नट, दिग्दर्शक, निर्माता हा तोल कसा सांभाळतात हे कोडेच आहे. शिवाय त्यांचे बोलणेही भरपूर आणि भडाभडा आहे. त्यामुळे ते किस्से रंगवून रंगवून सांगतात. तरी काही किस्से मोठे धक्कादायक आहेत. एक भयंकर घटना 1987 सालच्या दिवाळीत घडली. भायखळ्याच्या शमशु गोडाऊनला फटाक्यांमुळे आग लागली. त्या गोडाऊनमध्ये अनेक निर्मात्यांचे नाटकाचे सेट्स होते. अशोक समेळ यांच्याऋग्वेदकंपनीच्या नाटकाचे आणि गुजरातीनाट्यसंपदाच्या नाटकाचेही सेट्स त्यात जळाले. प्रॉपर्टी, कपडे सगळेच जळले. समेळ सांगतात, की ते निर्माता म्हणून शून्यावर आले. त्याच सुमारास त्यांची नोकरीही गेली. त्यांनी त्यांच्या स्वगतया आत्मचरित्रात कबुली दिली आहे, की माझ्या नाट्यवेडामुळे, सुट्ट्यांमुळे, माझ्या कामात झालेल्या अक्षम्य चुकांमुळे माझी नोकरी गेली!त्यानंतर समेळ यांनी त्यांचे लेखन मात्र सुरू ठेवले. त्यांनीखलनायक‘, ‘तू आहेस तरी कोणअशी नाटके लिहिली. ती रंगभूमीवर आली. तेअश्रूंची झाली फुलेमध्ये कलाकार म्हणून काम करत राहिले.
त्यांनी कुसुम मनोहर लेले‘ ‘या 1996 साली लिहिलेल्या नाटकाने त्यांना पुन्हा पैसा आणि नावलौकिक असे दोन्ही मिळवून दिले. ते नाटक सत्य घटनेवर आधारित होते. अपत्यप्राप्तीसाठी एका विवाहित भामट्याने एका गरीब मुलीला फसवून लग्न केले आणि मूल झाल्यावर तिला लाथ मारून त्या दाम्पत्याने हाकलून दिल्याची घटना घडली होती. त्यावर समेळ यांनी नाटक लिहिण्यास घेतले. त्याच वेळी विनिता ऐनापुरे यांची नराधमही लघु कादंबरी त्याच विषयावर आली. त्यामुळे त्यांचेही नाव नाटकाच्या जाहिरातीत दिले. ‘कुसुम मनोहर लेलेया नाटकाने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. गुजराती निर्मात्यांनी ते नाटकपूछे छे डिकरीया नावाने केले. गुजराती व्यावसायिक रंगभूमीवर त्या नाटकाचे शंभर दिवसांत शंभर प्रयोग झाल्याने लिम्का बुकमध्ये त्या नाटकाचे व अर्थात अशोक समेळ यांचे नाव आले.
          अशोक समेळ यांचा अर्धा कल नाटकातील प्रायोगिकतेकडे होता. त्यांना प्रायोगिक रंगभूमीसाठी ठाणे येथे महापालिकेच्या शाळेत 2007 साली जागा मिळाली. प्रदीप ढवळ यांनी शाळेच्या हॉलमध्ये रंगमंदिराच्या स्टेजचे वातावरण उभे केले. रंगमंचालाऋग्वेद रंगमंचअसे नाव दिले. समेळ यांनी स्वामी विवेकानंदयांच्या आयुष्यावर लिहिलेल्यासंन्यस्त ज्वालामुखीया नाटकाचा पहिला प्रयोग त्याच रंगमंचावर झाला. नाटकात स्वामी विवेकानंद यांची भूमिका अशोक समेळ यांचा मुलगा संग्राम यांनी केली. भुवनेश्वरी देवीच्या भूमिकेसंजीवनी समेळ होत्या. त्या नाटकाने सलग चाळीस तासांत अकरा प्रयोग करून विश्वविक्रम स्थापन केला. त्याची नोंद गिनीज बुकमध्ये आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स यांमध्ये झाली आहे. समेळ यांनी दूरदर्शन व इतर वाहिन्यांसाठी अनेक मालिकांच्या भागांचे लेखन केले. त्यांनी अल्बमही स्वलिखित मालिका, तर  ‘आभाळमाया‘, ‘तिसरा डोळा‘, ‘सांज भूल‘, ‘हे बंध रेशमाचेअशा अनेक मालिकांचे दोन हजारांपेक्षा अधिक भाग लिहिले आहेत. त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथांचेही लेखन केले आहे. अशोक समेळ यांच्या पत्नी संजीवनी यादेखील मराठी चित्रपट आणि मालिकासृष्टीतील जाणत्या कलाकार आहेत. त्यांनी कलर्स मराठीवरील बाळू मामाच्या नावानं चांगभलं, लक्ष्मी सदैव मंगलम्, तसेच झी युवावरील ऑलमोस्ट सुफळ संपूर्णया मालिकेत महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांचा मुलगा संग्राम ललित 305, पुढचं पाऊल या मालिका, तसेच एकच प्याला, कुसुम मनोहर लेले या नाटकांतून पुढे आला. संग्रामचे लग्न अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्यासोबत झाले आहे. समेळ यांनी, त्यांनी जमवलेल्या चौदा हजार पुस्तकांचे दालन ठाण्यातील त्यांच्या आसपासच्या वाचकांना खुले करून दिले आहे. 

 

         

समेळ यांचे बालमित्र पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर

अशोक समेळ यांनी उत्तर आयुष्यात, वयाच्या पंचाहत्तरीत मी अश्वत्थामा चिरंजीवही कादंबरी लिहिली. ती बृहत् कादंबरी आहे. पृष्ठसंख्या सातशे. समेळ यांनी त्यासाठी भरपूर संशोधन व प्रवास केला. अश्वत्थामा हा महाभारतातील महायोद्धा वेदशास्त्रसंपन्न असा असून त्याच्या सदैव चिरंजीव अस्तित्वाचा उलगडा करण्याचा प्रयत्न कादंबरीत आहे. कादंबरीचे प्रकाशन रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते झाले. नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष फैयाज प्रकाशन समारंभाला पाहुण्या होत्या. त्या म्हणाल्या, “व्यासांनी ज्या व्यक्तीरेखेकडे दुर्लक्ष केले, त्याच व्यक्तिरेखेवर संशोधन करून ही महाकादंबरी लिहून व्यासांचे उर्वरित काम समेळ यांनी केले आहे.” कादंबरीला उत्तर महाराष्ट्र साहित्य सभेचा पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार 2016 ला मिळाला. समेळ यांनी महाभारतातीलभीष्मया व्यक्तिरेखेवर महाकादंबरी लिहून पूर्ण केली आहे. समेळ यांना विविधांगी कामगिरीबद्दल चौतीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार’, ‘राम गणेश गडकरी पुरस्कार’, ‘ठाणे गौरव’, ‘ठाणे नगर रत्न पुरस्कारअशा पुरस्कारांचा समावेश आहे.

समेळ यांचे तीन गुरू
          अशोक समेळ सांगतात, “मी माझ्या एकूण नाट्यप्रवासात प्रभाकर पणशीकर, काशिनाथ घाणेकर आणि सुधा करमरकर यांना गुरूसमान मानत आलो आहे.त्यापुढे जाऊन त्यांनी ऋग्वेदनाट्यसंस्थेतर्फेअश्रूंची झाली फुलेच्या एक्कावन्न प्रयोगांचे सादरीकरण रंगभूमीवर करून गुरू प्रभाकर पणशीकर यांना श्रद्धांजली वाहिलीआहे!
अशोक समेळ 9320662497
मेघना साने 98695 63710 meghanasane@gmail.com
मेघना साने मुंबई विद्यापीठाच्या एम ए, एम फिल पदवीधारक असून, त्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे शहर शाखेच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवर नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेचसुयोगच्या लेकुरे उदंड झाली या नाटकांमधून पाच वर्षे भूमिका केल्यानंतर एकपात्री प्रयोगाची स्वतंत्र वाट चोखाळली आहे. त्यांनी कोवळी उन्हेया स्वलिखित एकपात्री प्रयोगाचे देशविदेशांत दौरे केले आहेत.

—————————————————————————————————
अशोक समेळ यांची काही छायाचित्रे –
अशोक पत्की यांच्यासोबत
जस्टिस कोडे आचार्य अत्रे पुरस्कार समेळ यांना प्रदान करताना

 

समेळ त्यांची दोन मुले आणि नातू

 

 

———————————————————————————————————–

About Post Author

13 COMMENTS

  1. लेखात कलावंताचा जीवनक्रम खूप छान पद्धतीत मांडला आहे,अशोक दादा मनस्वी माणूस आणि कलाकार आहेच आणि नाट्यकलेतील योगदान नोंद करण्यासारखे आहे.राज वसंत शिंगे वाशिंद

  2. समेळ सर आणि त्यांच्या, सोबतच इतरही नाट्य आणि लेखनप्रवास मेघना यांनी फार सुंदरतेने मांडलाय. आणि स्वतः नाट्यअंगात असल्याने हा प्रवास जिवंत वाटतोय. याशिवाय वरील कादंबऱ्या आणि नाटके फार चालली आणि प्रसिध्द झालीत. या लेखनाच्या निमित्ताने समेळ सरांचा आणि नाटकांचा वेगळा पैलू समोर आला… छानच

  3. समेळ सरांबददल काय बोलायचे हे एक महान व्यक्तिमत्व आमच्या जीवनात आणल्या बद्दल त्या परमेश्वराचे आभार. माझ्या एक अकल्पित गोष्ट या नाटकाची प्रस्तावना अशोक सरांनी लिहिली आहे. त्यांच्या बरोबर मैत्री करण्यासाठी वयाचे बंधन नसते ते आम्हाला मित्रांसारखेच आहेत. मेघना ताईंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व अचूक रेखाटले आहे. तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई भद्रकाली चरणीं प्रार्थनादीपक म कांबळी

  4. समेळ बद्दल काय बोलायचे एक प्रचंड व्यासंगी व्यक्तिमत्व, आमच्या जीवनात आणल्या बद्दल त्या परमेश्वराचे आभार मानायचे. त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी वयाचे बंधन नसते. ते आम्हाला मित्रांसारखेच वागवतात. माझ्या एक अकल्पित गोष्ट या नाटकाची प्रस्तावना अशोक सरांनी लिहिली आहे. मेघना ताईंनी त्यांचे व्यक्तिमत्त्व अचूक रेखाटले आहे. तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई भद्रकाली चरणीं प्रार्थना करतो.- दीपक म कांबळी

  5. एका कलंदर अभिनेत्याचा, लेखकाचा थक्क करणारा प्रवास. पुढील लेखन प्रवासास सरांना खूप शुभेच्छा.

  6. एका कलंदर अभिनेत्याचा, लेखकाचा थक्क करणारा प्रवास. पुढील लेखन प्रवासास सरांना खूप शुभेच्छा.

  7. अशोक समेळ सर म्हणजे एक आदर्श, ऑलराउंडर, उत्साही व प्रेरणादायी अतिशय आदरणीय ग्रेट व्यक्तिमत्व. त्यांच्या वरील जीवन प्रवासाचा आढावा घेणारा हा लेख व त्या लेखावरील अप्रतिम सुरेख शब्दांकन मेघना ताई तू केले आहेस.

  8. खूप आत्मियतेने लेख लिहिला आहे. समेळ सरांचा जीवनपट नेमक्या शब्दांत व्यक्त केला आहे.

  9. खूप छान लेख नेमक्या शब्दात केलेल वर्णनसमेळ सरांचा संपूर्ण प्रवासच या लेखात आपण मांडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here