सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील अरण येथील ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दिवशी, शनिवार, १ जानेवारी २००० रोजी करण्यात आली. ग्रंथालयामध्ये नऊ हजार पुस्तके आहेत. वाचनालयाने सुरुवातीपासून वाचकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचनालयाच्या वतीने १८ एप्रिल २००३ या दिवशी पुस्तकप्रेमी अरणभूषण हरिभाऊ नाना शिंदे यांची ग्रंथतुला करण्यात आली. ती सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रंथतुला असल्याचे त्यावेळी बोलले गेले. वाचनालय ‘ब’ वर्गात आहे.
वाचनालयाने वाचकांना पुस्तके, नियतकालिके व वृतपत्रे उपलब्ध करून देण्याबरोबर विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम योजले. वाचनालयाने ग्रंथप्रदर्शन, काष्ठशिल्प प्रदर्शन, नाना स्पर्धा, मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने, गुणवंतांचे सत्कारसोहळे; तसेच, जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून व वाचनालयाच्या वतीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देऊन ग्रामस्थांच्या मनामध्ये आस्थेचे स्थान निर्माण केले आहे.
वाचनालयाच्या वतीने ग्रंथालय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘रणजितसिंह मोहिते-पाटील आदर्श ग्रंथालय’, ‘ग्रंथालय सेवक’, ‘ग्रंथालय कार्यकर्ता’ व ‘साहित्य पुरस्कार’ देण्यास २००४ पासून सुरुवात झाली आहे. हे पुरस्कार २००४ या वर्षी जिल्हा पातळीवर देण्यात आले, ते २००५ या वर्षी पुणे विभागीय पातळीवर देण्यात आले, तर २००६ या वर्षापासून प्रत्येक वर्षी राज्यपातळीवर देण्यात येत आहेत. पुरस्कार वितरणाच्या सातत्यपूर्ण दिमाखदार सोहळ्यांमुळे अरणच्या ‘हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालया’ची ओळख राज्यभर निर्माण झाली आहे.
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून वाचनालयाच्या इमारतीसाठी पाच लाख रुपयांचा निधी २००५-०६ मध्ये दिला. त्यामुळे वाचनालयाची दोन मजली आकर्षक इमारत उभी राहिली. ‘संत सावता माळी विद्यालया’च्या ‘हरित-सेना विभागा’च्या सहकार्याने इमारतीभोवती झाडे लावून व वाढवून वाचनालयाच्या वतीने ‘झाडे लावू, झाडे जगवू’ हा संदेश देण्यात आला.
वाचनालयाच्या वतीने तालुकास्तरीय वाचनालय कार्यशाळा घेण्यात येतात. ‘सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघा’ची अधिवेशनेही वाचनालयाने यशस्वीपणे घेतली आहेत. वाचनालय सार्वजनिक वाचनालयांचे मार्गदर्शन केंद्र म्हणूनच सर्वांना परिचित होत आहे. अनेक मान्यवरांनी वाचनालयाला भेटी दिल्या आहेत. C.B.I.चे उपसंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, I.A.S. रोहिणी भाजीभाकरे, I.A.S. रमेश घोलप, ग्रंथालय संचालक बी.आर. सनान्से, ऑलिम्पिक खेळाडू रिनाकुमारी आदींनी निमित्तानिमित्ताने वाचनालयाला भेट देऊन प्रशंसोद्गार काढले. I.A.S. रमेश घोलप यांच्या जडणघडणीत वाचनालयाचा मोलाचा वाटा आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक तरुणांना वाचनालयाचा चांगला फायदा झाला आहे.
९४२२४२८८५७, ९९२१५९२१०१
haridasranadive@gmail.com
उत्तम कार्य
उत्तम कार्य
Thanks Think Maharashtra team
Thanks Think Maharashtra team.
Increased our positive energy
Increased our positive energy by knowing aran wachnalay we the youngsters are also want to develop such type of wachnaly in our village dubere.Now we have 1700 books in our Sant Tukaram sarwajanik wachnalay Dubere.
Comments are closed.