शंकरनगर, अकलुज येथे 1970 सालापासून महाशिवरात्री यात्रेबरोबरच कृषी प्रदर्शन भरवले जाते. वावरातून सोने पिकवण्यास शिकवणारे प्रदर्शन म्हणजे ते कृषी प्रदर्शन असे म्हटले जाते. ते दर महाशिवरात्रीला 23 ते 28 फेब्रुवारी दरम्यान विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या पुढाकाराने भरवले जाते. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, शिवामृत दूध संघ, रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलुजची कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यामार्फत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. प्रदर्शनामध्ये राज्यभरातील लाखो शेतक-यांचा सहभाग नोंदवला गेला आहे.
प्रदर्शनामध्ये खते, औषधे, बी-बियाणे, औजारे, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर्स, इक्विपमेंट्स, सिंचन साधने, फलोत्पादन, पॅकेजिंग, साठवणूक, शासकीय विविध विभाग, टिश्यू कल्चर, पाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जा, पशुखाद्य व औषधे, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसाहाय्य, कृषीविषयक पुस्तके, नियतकालिके यांची माहिती सखोल प्रमाणात दिली जाते.
प्रदर्शनामध्ये स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये कोंबड्यांची झुंज, सर्वांत जास्त दूध देणाऱ-या गायी-म्हशी, सर्वांत जास्त वजनाची, चांगल्या प्रकारांच्या फळे-भाजीपाला यांच्या स्पर्धा असतात.
-गणेश पोळ