‘हिंदी’चे भांडवल!

0
23

राजकीय हेतूनं भाषेचं भांडवल केलं जातं. त्यामुळे हिंदीला जे स्थान देशात मिळायला हवं ते मिळत नाही. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि इंग्लिशचं महत्त्व यांमुळे ‘हिंदी’चा वापर कमी झाला आहे. आपल्या देशात ‘इंग्लिश’ ही मानसिकता झाली आहे. ती बदलत नाही तोपर्यंत इतर कशाचा विचार होत नाही. म्हणूनच माजी पंतप्रधान आणि कवी अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटलं होतं, की संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण देणं सोपं आहे, पण आपल्या देशात त्या भाषेत चर्चा करणं अवघड आहे!‘हिंदी’ ही सार्वभौम आणि सामर्थ्यवान भाषा आहे. त्यामुळे तिचं भविष्य उज्ज्वल आहे. मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानं हिंदी मागे पडत आहे, पण प्रत्यक्षात तसं नाही. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण अशी सर्वत्र बोलली जाणारी ही भाषा आहे. आर्थिक युग असल्यानं विकसनशील देशांना अविकसित देशांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी हिंदीचं माध्यम उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या देशांनीही हिंदीचा एम.बी.ए.च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. जगातील 136 ते 140 विद्यापीठांमध्ये हिंदीचे अभ्यासक्रम आहेत. टी.व्ही., रेडिओ यांची प्रमुख भाषा आहे ती हिंदी.

हिन्दी को देश की राष्ट्रभाषा घोषित करने वाला कोई आदेश नहीं है: सुप्रीम कोर्ट ने भी खाली हाथ लौटाया हिन्दी को देश का संविधान लागू हुए 60 साल हो गए लेकिन देश की राष्ट्रभाषा क्या हो यह अभी तक तय नहीं। भले ही संविधान का अनुच्छेद 343 हिन्दी को 'देश की राजभाषा' घोषित करता हो लेकिन गुजरात हाईकोर्ट ने कहा है किऐसा कोई प्रावधान या आदेश रिकार्ड पर मौजूद नहीं है, जिसमें हिन्दी को देश की राष्ट्रभाषा घोषित किया गया हो। यह सिर्फ इसी देश में हो सकता है कि देश की राष्ट्रभाषा 'हिंदी' को अपना हक मांगने के लिए अदालत का दरवाजा खटखटाना पड़े। यही नहीं, वह एक अदालत में मामला हार जाए और फिर न्याय के लिए सुप्रीम कोर्ट में गुहार करे।

रोजगाराचे साधन म्हणूनही या भाषेचे महत्त्व मोठे आहे. हिंदी चित्रपटसृष्टी, वाहिन्या, वृत्तवाहिन्या, कला-उद्योग अशा विविध क्षेत्रांत अनुवादक, उत्तम लेखक यांची गरज आहे. त्यामुळे जर नव्या पिंढीनं हिंदी उत्तम आत्मसात केली, तर त्यांना उत्कृष्ट करियरची संधी आहे. हिंदी साहित्यातही तरुण पिढी सक्रिय आहे. अनेक भाषांमधली चांगली, चांगली पुस्तकं हिंदीत येत आहेत. हिंदी विविध क्षेत्रांतून विस्तारत आहे आणि विस्तार हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे वेगवेगळ्या बोलीभाषा, लोकसाहित्य यांच्या माध्यमातून निरनिराळ्या रूपात ‘हिंदी’ भाषा पूर्वापार चालत आलेली आहे. ती टिकून राहणार यात शंका नाही.

मुळात या भाषेला प्रादेशिकतेचे बंधन नाही. कोणीही, कशीही बोलावी, वाद उदभवत नाहीत, विरोध होत नाही. त्यामुळे सामर्थ्य, सुगमता, सुबोधता यांचं मिश्रण असणारी ‘हिंदी’ सर्व विरोध मोडून काढत दिमाखानं मिरवत आहे. जो सामर्थ्यवान असतो त्यालाच विरोध होतो; त्यामुळे हिंदीला विरोध होत असला तरी तिची पाळंमुळं भारतीय संस्कृतीत खोलवर रुजली आहेत. ती उखडणं अशक्य आहे.

लोकांची मानसिकता बदलणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी ‘भारतीय ज्ञानपीठ’ हिंदी प्रसाराचं मोठं कार्य करत आहे. स्वातंत्र्य चळवळीत आपण इंग्रजांना ‘चले जाव’चा शेवटचा इशारा दिला, सुभाषचंद्र बोस यांचा नारा होता ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूँगा’, इतकंच काय पण लोकमान्य टिळकांनीही ‘हिंदी’विषयी म्हटलं होतं, ‘शीघ्रता से और सरलता से सीखी जानेवाली भाषाओं मे हिंदी सर्वोपरी है’!

(सुनील देवधर पुणे आकाशवाणी केंद्रावर कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांनी हिंदी दिनानिमित्ताने – 14 सप्टेंबर- भाष्य केले. प्राची गावसकर यांचे शब्दांकन)

नेहा काळे
७३८७०९२५९७
neha.0928.k@gmail.com

About Post Author