–हासपर्वातील संधी

0
23

संदीप बर्वे

     राजकीय पक्षांचे आज –हासपर्व सुरू असल्‍याचे दिसते. त्‍यामुळे हे चैतन्‍यहिन पक्ष म्‍हणजे डेडबॉडीज भासतात. ज्‍यांचे पोस्‍टमॉर्टम करणे ही आपली जबाबदारी ठरते. आपल्‍याकडे टिळक-आगरकर यांच्‍यासारखी वादाची परंपरा असली तरी राजकीय पातळीवर ती हरवल्‍यासारखी वाटते. त्‍यातच समाजात प्रामाणिक माणसांचीही वानवा भासते. अशा परिस्थितीत समाजात जी मोठी स्‍पेस निर्माण झाली आहे ती भरुन काढण्‍यासाठी परिवर्तनवाद्यांना मोठी संधी उपलब्‍ध झाली आहे.


संदीप बर्वे

     गोपीनाथ मुंडे यांचा इगो दुखावला गेल्‍याने त्‍यांनी बंड केले आणि मग तेवढ्याच तातडीने ते मागेही घेतले. भाजप हा राष्‍ट्रीय पातळीवरचा मोठा पक्ष. पण एका व्‍यक्‍तीचा इगो दुखावतो आणि ती संपूर्ण पक्षाची यंत्रणा हलवून सोडते! त्‍यामागे वैचारिक असे काही कारण नाही. जे आहे ते वैयक्तिक. सुरेश कलमाडी यांची वेगळीच तर्‍हा! ते आर्थिक गुन्हेगारीमुळे पक्षाला लांछन ठरले आहेत, त्यांची सर्व लक्षणे आधी दिसत होती, पण पक्ष त्यांना आवरू शकला नाही. हे राजकीय पक्षांचे र्‍हासपर्व आहे. सर्व पक्ष केवळ ‘डेड बॉडी’ज उरल्या आहेत, कारण राजकीय पक्ष म्‍हणून त्‍यांच्‍यात जे चैतन्‍य असायला हवे ते दिसत नाही. आपणच त्यांचे पोस्‍टमॉर्टम करणे गरजेचे आहे! मुंडे यांचे बंड जसे वैचारिक नाही, त्‍याचप्रमाणे इतर कोणत्‍याही पक्षात ‘विचार’ दिसून येत नाही. सेनेची भूमिका पटत नसल्‍याने वेगळे झालेले राज ठाकरेही वेगळा विचार मांडू शकले नाहीत. मुळात आपल्‍याकडे वादाची परंपरा दिसून येते. टिळक-आगरकर हे त्‍याचे आदर्श उदाहरण. मात्र राजकीय पक्षांच्‍या पातळीवर वादाची ही परंपरा हरवल्‍यासारखी वाटते.

     कलमाडी यांच्‍या तुरूंगाची झडती घेण्‍यात आली. त्‍यावेळी ते तुरूंग अधीक्षकांसोबत चहा पिताना आढळले. त्‍या अधिका-याची तातडीने बदली करण्‍यात आली. ही झडती घेणा-या व्‍यक्‍तीने आपले काम चोख बजावले.

     आपल्‍या सिस्‍टममध्‍ये फार कमी माणसे परिवर्तनवादी आहेत. अशा प्रामाणिक माणसांमुळे समाजाचा गाडा सुरू आहे. समाजातल्‍या त्रुटी आणि वाईट गोष्‍टी टिपून त्‍यावर काम करण्‍याची राजकीय पक्षांची यंत्रणा खिळखिळी झालेली आहे. समाजात प्रामाणिक माणसे कमी झालेली असल्‍याने समाज निर्नायकी अवस्‍थेकडे झुकण्‍याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र याच परिस्थितीत परिवर्तनवाद्यांना मोठी संधी उपलब्‍ध झालेली आहे. समाजात फार मोठी स्‍पेस असून ती चांगल्‍या लोकांनी भरुन काढण्‍याची आवश्‍यकता आहे. अशा लोकांनी राजकीय भूमिका घेऊन राजकीय आखाड्यात उतरावे. ज्‍यांना हे शक्‍य नाही त्‍यांनी अण्‍णा हजारे यांच्‍याप्रमाणे राजकीय वर्तुळाबाहेर शक्तिकेंद्रे तयार करावीत. अण्‍णा-रामदेव यांच्‍या आंदोलनाला तरुण वर्ग आणि महिलांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. जर या दोन वर्गांना केंद्रस्‍थानी ठेवून काम करण्‍यात आले तर अशा शक्तिकेंद्रांना पाठिंबा मिळू शकतो. राजकीय पक्ष ही देशाच्‍या कारभारातील महत्‍त्‍वाची गोष्‍ट असते. मात्र सध्‍याच्‍या परिस्थितीत राजकीय पक्षांचा जो र्‍हास सुरू आहे, तो चिंताजनक वाटतो.

संदीप बर्वे – 9860387827, ई मेल –  sandip_barve84@yahoo.co.in

{jcomments on}

About Post Author

Previous articleएका दिग्दर्शकाची हुकूमत!
Next articleम्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.