मुंबई–ठाणे परिसरात पर्यावरणविषयक जागृतीच्या क्षेत्रात ‘हरियाली’ हे नाव प्रसिद्ध आहे. ही संस्था गेली पंधरा वर्षे विविध मार्गांनी बियावाटपाचे, वृक्षलागवडीचे व संवर्धनाचे काम करत आहे. त्याचबरोबर आम नागरिकांत पर्यावरणविषयक भान तयार व्हावे यासाठी विविध तर्हेचे कार्यक्रम योजत आहे. त्यापाठीमागे पुनम सिंघवी यांच्यासारखा तळमळीचा व जनमानसात स्थान असलेला कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे ‘हरियाली’ ही संस्था न राहता चळवळ बनली आहे.
About Post Author
प्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्यांनी गणिताच्या आवडीने राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्करली. ते बँकेतून वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्या ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ या मोहिमेमध्ये त्यांचा सहभाग होता.
लेखकाचा दूरध्वनी
9920202889 (022) 26832164