सुतोवाच वादसंवादाचे

0
22
_Think_M_Logo

थिंक महाराष्‍ट्रगांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्‍तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन दिवस येऊन गेले. परिचर्चेनंतर कृतीच्या अंगाने काही घडावे हा जसा विचार व्यक्त झाला; तसेच या निमित्ताने ‘वादसंवाद’ सुरू व्हावा असेही मत, विशेषतः मोहन हिरालाल यांनी व्यक्त केले. त्याचा आरंभ तोच करून देत आहे. त्या पाठोपाठ, अवधूत परळकर याने ‘महाराष्ट्र  टाइम्स मध्ये‘ परिचर्चेबाबत जो लेख लिहिला तो प्रसिद्ध करत आहोत. त्यानंतर या निमित्ताने जे साहित्य जमा झाले आहे ते एकेक प्रकट होत जाईल…

– संपादक

About Post Author

Previous articleदासोपंतांची पासोडी
Next articleसार्वत्रिक, सतत मुक्‍त ज्ञान प्रक्रिया
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.