सार्वत्रिक, सतत मुक्‍त ज्ञान प्रक्रिया

  _Mohan_Hiralal_1
  मोहन हिराबाई हिरालालस्‍वराज्‍य माझा जन्‍मसिद्ध अधिकार आहे!स्‍वराज्‍य प्रत्‍येकाचा जन्‍मसिद्ध अधिकार आहे!

  माझे स्‍वराज्य ‘मीच’ व आमचे स्‍वराज्‍य ‘आम्‍हीच’ मिळवू शकतो!

  त्‍यासाठी –

  सार्वत्रिक सतत मुक्‍त ज्ञान प्रक्रिया

  निसर्गाचा अविभाज्‍य घटक म्‍हणून माणसाकडे नैसर्गिकरित्‍या दोन जबाबदा-या आल्‍या आहेत.

  • १. ज्ञान निर्मिती
  • २. व्‍यवस्‍थापन (ज्ञानासह सर्व गोष्‍टींचे)

  १. ज्ञान-निर्णय-कृती-ज्ञान अशी चक्रीय प्रक्रिया. आज निर्णय व कृतीवर अवाजवी जोर. ज्ञान प्रक्रियेसाठी योग्‍य जागा, रचना व वेळ नाही.

  २. ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ – मराठी भाषिकांसाठी अशी ज्ञान प्रक्रियेसाठी योग्‍य जागा बनू शकते काय? त्‍यासाठी रचना व कार्यपद्धती कशी असावी? जुन्‍या अनुभवापासून शिकून करायचे नवे प्रयोग कोणते?

  ३. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग काय व कसा करता येईल?

  ४. व्हिडीओ कॉन्‍फरन्सिंगद्वारे अभ्‍यासगटाच्‍या मराठी भाषेत होणा-या नियमबद्ध चर्चांचे नियोजन करून त्‍यांचे रेकॉर्डींग करणे. ते साठवून ठेवून त्‍याचे सर्वांना विनामुल्‍य उपलब्‍ध होईल असे व्‍यवस्‍थापन करणे. उदाहरणार्थ, विकिपेडीयाप्रमाणे.

  ५. या कामात ज्‍यांना रस आहे व ज्‍यांना हे काम करणे स्‍वतःची गरज आहे असे वाटते, अशा व्‍यक्‍तींचा शोध घेऊन त्‍यांचा कृतीगट तयार करणे.

  (मला या प्रक्रियेत रस आहे व हे काम करणे माझी स्‍वतःची गरज आहे असे वाटते.)

  मोहन हिराबाई हिरालाल
  mohanhh@gmail.com

  About Post Author