साने गुरुजी आणि वटपौर्णिमा

0
22

माझी आजी किर्तन-प्रवचन वगैरे नेहमी ऐकत असे. पण साने गुरुजींचे कळकळीचे पण सडेतोड शब्द ऐकून ती भारावून गेली. गुरुजींचे शब्द समोरच्याच्या काळजाला हात घालत असत.

साने गुरुजींची दुसरी आठवण म्हणजे एकदा, त्यांचे दादरच्या वनिता समाजात भाषण होते. आमचे घर वनिता समाजापासून फारच जवळ. शिवाय, साने गुरुजींचे विचार माझ्या आजीने ऐकावेत ही माझ्या मनाला फार हौस. आजी अशिक्षित असली तरी सुसंस्कृत होती. मी आजीला त्या व्याख्यानाला घेऊन गेले. वनिता समाज म्हणजे उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांचा भरणा. वटपौर्णिमा नुकतीच झाली होती. सार्‍याजणी नटुनथटून आल्या होत्या. भाषण रंगात आले, सर्वजणी तन्मय होऊन ऐकत होत्या आणि गुरुजींनी वटपौर्णिमेचा विषय घेतला.

ते म्हणाले, मला वाटलं की आपण वटपौर्नर्णिमा हे ‘व्रत’ न ठेवता ‘सण’ बनवला आहे. त्या दिवशी म्हणे उपवास करायचा. सर्वांनी उत्तम वस्त्रे नेसून, असतील-नसतील ते दागिने लेवून, पूजेचे तबक घेऊन मंदिरात जायचे. तेथल्या आवारातील वटवृक्षापाशी गुरुजी बसलेले असतात. भोवती बायकांची हीSS गर्दी जमलेली असते. गुरुजी सांगतील त्याप्रमाणे वटवृक्षाची पूजा करायची. त्याला रायवळ आंबा, पाच जांभळे, एक केळे, फणसाचे पाच गरे, मूठभर कडधान्याची भीज असा नैवेद्य ठेवायचा, मग गुरुजींना दक्षिणा द्यायची आणि एक रायवळ आंबा पण द्यायचा. त्यानंतर तेथे जमलेल्या सुवासिनींपैकी ज्या आपल्या खास परिचित असतील किंवा सहजपणे आवडतील – रंगरूप, कपडे, दागिने यांवरून, त्यांना सवाष्णीचे वाण द्यायचे. ते मात्र हापूस आंब्याचे! पूजनीय वटवृक्षाला रायवळ आणि सगेसोयर्‍यांना हापूस आंबा? कुठला देव प्रसन्न होईल या पूजेने?”

माझी आजी किर्तन-प्रवचन वगैरे नेहमी ऐकत असे. तिचा व्याख्यान ऐकण्याचा हा पहिलाच प्रसंग. साने गुरुजींचे कळकळीचे पण सडेतोड शब्द ऐकून ती भारावून गेली. “किती खरं बोलतोय हा बाबा. कुठे मिळवलं एवढं ज्ञान, एवढा अनुभव?” वगैरे बोलू लागली. असे होते गुरुजींचे शब्द समोरच्याच्या काळजाला हात घालणारे!

 

वसुमती धुरू – (022) 24222124.

(या लेखात वटपौर्णिमा या शब्‍दासाठी हायपरलिंक देणे आवश्‍यक होते. ही माहिती उपलब्‍ध होऊ शकली नाही. जर वाचकांना या शब्‍दांची लिंक किंवा माहिती पाठवणे शक्‍य असेल, तर त्‍यांनी info@thinkmaharashtra.com या पत्‍त्‍यावर संपर्क साधावा)  

{jcomments on}

माझी आजी किर्तन-प्रवचन वगैरे नेहमी ऐकत असे. पण साने गुरुजींचे कळकळीचे पण सडेतोड शब्द ऐकून ती भारावून गेली. गुरुजींचे शब्द समोरच्याच्या काळजाला हात घालत असत.  

About Post Author

Previous articleप्राण्यांचे संगोपन
Next articleनिराधार कोरडी ‘वाट’
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.