साने गुरुजींच्या आठवणी

0
34

     गुरुजी आईची संसार चालवण्यासाठी होत असलेली पराकाष्ठा पाहून कष्टी होत, पण त्यांचा लहानसा जीव घरकामातील मदतीशिवाय काहीच करू शकत नव्हता; म्हणून ते मनोमन म्हणत, की मी मोठा झाल्यावर आईला खूप सुखात ठेवीन. गुरुजींनी तेपण मोठे झाल्यावर देशकार्याला वाहून घेतले. ते महाविद्यालयीन जीवनापासूनच खादी वापरू लागले होते. एक दिवस, ..


गुरुजींचा बाणेदारपणा

     गुरुजी आईची संसार चालवण्यासाठी होत असलेली पराकाष्ठा पाहून कष्टी होत, पण त्यांचा लहानसा जीव घरकामातील मदतीशिवाय काहीच करू शकत नव्हता; म्हणून ते मनोमन म्हणत, की मी मोठा झाल्यावर आईला खूप सुखात ठेवीन. गुरुजींनी तेपण मोठे झाल्यावर देशकार्याला वाहून घेतले. ते महाविद्यालयीन जीवनापासूनच खादी वापरू लागले होते. एक दिवस, गुरुजी आपल्या एका आप्ताबरोबर बाहेर जायला निघाले. गुरुजींचा  अवतार पाहून आप्त त्यांना म्हणाले, “पंढरी, तुझ्याबरोबर यायला मला लाज वाटते.” त्यावर गुरुजींनी तितक्याच स्वाभिमानाने त्याला उत्तर दिले, “मलाही तुझ्यासारख्या पंचंरंगी पोपटाबरोबर जायला लाज वाटते.”

************

     गुरुजींचा विनम्र स्वभाव आणि शिकवण्याच्या उत्कट पध्दतीमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये आवडते शिक्षक होते. गुरुजींच्या वर्गात मामलेदाराचा एक मुलगा होता. वडिलांच्या पदाचा ताठा मुलात असणारच. तो मुलगा अभ्यास करत नसे. त्याचं वर्गातही लक्ष नसायचं. तेव्हा गुरुजींनी मुलाच्या वहीत शेरा मारला- ‘अभ्यासात कच्चा आहे!’

     मामलेदाराने मामलेदारी भाषेत उलट प्रश्न विचारला, ‘मुलगा शाळेत येतो; तर शिक्षक काय करतात?’

     गुरुजींनी उत्तर पाठवलं – ‘मुलगा फक्त सहा तास शाळेत असतो. बाकी अठरा तास घरीच असतो. तेव्हा पालक काय करतात?’

     गुरुजी विनम्रतेचा पुतळा असले तरी हवे तिथे ते बाणेदार वागलेले आहेत.

संकलन – गीता हरवंदे, संदर्भ – ‘सानेगुरुजी’ –अरविंद ताटके

मुख्‍य पानाच्‍या चौकटीसाठीचा मजकूर

गुरुजींचा बाणेदारपणा… संकलक – गीता हरवंदे

     गुरुजी विनम्रतेचा पुतळा असले तरी हवे तिथे ते बाणेदार वागलेले आहेत…

{jcomments on}

About Post Author

Previous articleम्हातारा इतुका न…
Next articleरामदेवबाबांचे उपोषण देशासाठी हानिकारक
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.