वीज वितरणाच्या विरोधाभासात जैतापूर प्रकल्पाचा हट्ट अनाठायी

0
18

       ‘जैतापूर प्रकल्‍प होणारच’ हे सरकारचे म्‍हणणे म्‍हणजे ‘मुंबईसह संयुक्‍त महाराष्‍ट्र झालाच पाहिजे’ असे म्‍हणण्‍यासारखे आहे. सत्‍ता आमच्‍या हातात आहे आणि आम्‍ही तुम्‍हाला चिरडून टाकणारच, असा आवेश त्‍यात दिसतो. जैतापूरचा प्रकल्‍प राज्‍याच्‍या वीजेच्‍या निकडीसाठी तयार करण्‍यात येत असल्‍याचे सांगण्‍यात येत असतानाच राज्‍याला शिक्षण, पाणी अशा अजून कितीतरी महत्‍तवाच्‍या गोष्‍टींचीही निकड आहे, मात्र सरकार त्‍याला जैतापूरइतकेच महत्‍त्‍व देत नाही. पिण्‍याच्‍या पाण्‍याला प्राधान्‍यक्रम देण्‍यात आलेला असतानाही राज्‍यात अनेक ठिकाणी पिण्‍याच्‍या पाण्‍याची वानवा आहे.

       जर वीजेसाठी हा प्रकल्‍प तयार केला जात आहे, तर त्‍यासाठी हा एकमेव मार्ग आहे का? कोकणात 1 हजार मेगावॅट क्षमतेचे 4 जलप्रपात वीजप्रकल्‍प तयार करणे शक्‍य असताना आपल्‍या सरकारकडे त्‍यासाठी वेळ आणि पैसा दोन्हीही नाही. ही वीज राज्‍याच्‍या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्‍यक असल्‍याचा मुद्दा सांगितला जातो. पण यातून उभ्‍या राहणा-या उद्योगांमध्‍ये खरोखर किती लोकांना रोजगार मिळणार आहे? बरं, या प्रकल्‍पाची वीज कुणाला पुरवली जाणार हासुद्धा मुद्दा आहेच. अंबानींच्‍या केवळ तीन टाळक्‍यांच्‍या घराला 6 लाख युनिट वीज पुरवली जाते. वीजेच्‍या वितरणात हा विरोधाभास दिसत असताना राज्‍यात खरोखर जिथे वीजेची निकड आहे तिथे ही वीज पोहोचेल का? जर याच व्‍यक्‍तींसाठी वीजेची निर्मिती करायची आहे तर 1 हजार मेगावॅट क्षमतेचा एक प्रकल्‍प थेट मलबार हिललाच का नाही सुरू करत? तिथेही समुद्रकिनारा जवळ आहेच ना!

विजया चौहान
शिक्षण हक्क समन्वय समिती
आणि मराठी अभ्यास केंद्र.

दिनांक – 27/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleवाचकांचा अर्थपूर्ण पत्रव्यवहार
Next articleजैतापूर अणूउर्जा प्रकल्पाची रचना समजून घेणे आवश्यक
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.