वाद्यवीणेचे संदर्भ

0
51
डॉ. अनिलकुमार भाटे
डॉ. अनिलकुमार भाटे

डॉ. अनिलकुमार भाटेअरूण निगुडकर यांचा वीणा हा लेख आवडला, पण त्यामधील काही संदर्भ खटकले :

१. पुराणातले उल्लेख आणि पुरातत्त्वशास्त्र यांची लेखकाने घातलेली सांगड पटत नाही.
२. सरस्वती नदी नेमकी कुठली याबद्दल वाद आहे. माझे संशोधन दाखवते की saptasimdhava या सात नद्यांपैकी प्रत्येकीला सरस्वती हे नामाभिधान वेद व पुराणे यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिले गेले आहे.

३. या लेखात भारतीय हा शब्द अनेकदा आला आहे. तो पटत नाही. भारतीय कोण? वर म्हटलेल्या सात नद्यांपैकी सर्वात पहिली कझागास्तानमधली सरदर्या आणि दुसरी अफगाणिस्तानच्या उत्तरेची अमुदर्या आहे. तिसरी पाकिस्तानमधली सिंधू आहे. लेखकाने दिलेली क्रोनोलोजी व त्यातले कालमापनाचे संदर्भ चुकीचे आहेत.

डॉ. अनिलकुमार भाटे

भाटे यांच्‍या मुद्द्यांवर अरूण निगुडकर यांनी दिलेले उत्‍तर –

अरूण निगुडकरमुदा २ रा : सरस्वती नदी कुठली याबद्दल वाद आहेत

उत्तर :  इस्रो बीएआरसी, उत्तरांचल, हरयाना-हिमाचल, पंजाब, गुजरात यांची वॉटर बोर्डस्, सरस्वती संशोधन प्रकल्प, केंद्र व वरील राज्यांची पुरातत्त्व खाती, केंद्राची वॉटर ग्रीड सिस्टिम, डॉ. एस. कल्याणरामन यांची सरस्वती संशोधन संस्था अशा सुमारे वीस संस्था व प्रमुख यांना सरस्वती नदी कुठली असा प्रश्न पडलेला नाही. या तर आताच्या संशोधन संस्था आहेत, परंतु ऋग्वेदालाही हा प्रश्न पडला नाही.– “अंबीतमे, देवीतमे नदीतमे सरस्वती”. अशी ही सरस्वती नदी सर्वात मोठी आहे असे तेथे म्हटले आहे. आजच्या आधुनिक संशोधनाने ते खरे ठरवले आहे. (तिचा काळ हिमयुग संपल्यानंतर म्हणजे अकरा हजार वर्षांपूर्वी) हरयाना व राजस्थान या राज्यांत (कलायत, कुरूक्षेत्र येथे) बोअरवेल्सच्या साहाय्याने तिला भारतीय शास्त्रज्ञांनी परत जिवंत केले आहे. या सर्व खात्यांचे अहवाल  केंद्राने प्रसिद्ध केले आहेत. सरस्वतीबद्दल (कुठली खरी) असा वाद् ऋग्वेदकाळापासून आजतागायत कधीच नव्हता. भाटे यांनी हे रिपोर्ट तपासल्यास त्यांच्याही मनात वाद वा शंका उरणार नाही. वेद, उपनिषदे पुराणे यांची उत्पत्ती या नदीकाठी झाली, हा इतिहास आहे.

     त्यातलाच.. ‘सप्त सिंधव’ मध्ये सात नद्यांना व त्यांपैकी प्रत्येकीला सरस्वती हे नामाभिधान वेद-पुराणात वेगवेगळ्या ठिकाणी दिले गेले आहे. त्यात सरदर्या व अमुदर्या व पाकिस्तानातील सिंधू नदी यांचाही समावेश आहे.

     कझाखस्तानमधील (कझागास्तान नावाचा देश नाही) सरदर्या व अफगाणिस्तानमधील अमुदर्या या नद्या सप्तसिंधवात कधीच अंतर्भूत झाल्या नव्हत्या. सप्तसिंधू म्हणून ज्या नद्या वेदात सांगितल्या गेल्या त्यांचे आधुनिक संशोधन असे दाखवते, की अमुदर्या नदी (oxus वक्ष ही नदी (पामीर व वारवान, मध्य आशिया ) समुद्रात जात नाही, परंतु तुर्कमेनिस्तानच्या कौझलकुम वाळवंटात नाहीशी होते. सरदर्या नदीही सप्तसिंधू मध्ये (सात नद्यांचा प्रदेश) येऊ शकत नाही, कारण ती सिंधू-झेलम, चिनाब, रावी, बिआस, सतलज, यमुना या पूर्वापार भूप्रदेशाच्या उगम, संगम, वा समुद्रात विराम पावत नाही.

     भाट्यांची तिसरी नदी राहिली पाकिस्तानातली सिंधू नदी. ती पाकिस्तानात उगम पावत नाही असे संशोधन, इतिहास, परंपरा, संस्कृती अशा कुठल्याही शाखेचा अभ्यास सांगतो. म्हणजे गेल्या दहा वर्षांत सिंधू, झेलम,चिनाब, रावी, बिआस (बियास)/सतलज व यमुना या नद्यांच्या प्रदेशाला दिले गेले आहे. व उल्लेखित खात्यांच्या संशोधनातही हा शब्द कुठे कुठे वापरला आहे.

मुद्दा ४ : माझ्या लेखात भारतीय असा शब्द अनेक वेळा आला आहे. हे भारतीय कोण?

उत्तर :  भारतीय कोण असा प्रश्न भाट्यांना का पडला याचाच अर्थबोध होत नाही. भरतापासून म्हणजे रामायणापासून वा त्याही अगोदरपासून आम्ही सारे भारतीय म्हणून ओळखले जातो. हा काही वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. कझाखस्तानातील सरदर्या व अफगाणिस्तानातील अमुदर्या नद्यांशी माझ्या लेखाचा वा एकूणच सरस्वती संशोधनाचा संबंध नाही. तिसरी पाकिस्तानील सिंधू नदी अशा तीन नद्यांपैकी कुठली सरस्वती असा प्रश्न बहुधा भाटे यांना पडला आहे. सिंधू नदीचा ऐतिहासिक विचार आणि संकलन हे पाकिस्तानातील सिंधू नदी या लेबलाने करणे चुकीचे आहे, याचे मुख्य कारण पाकिस्तानला १९४७ पूर्वी वेगळा इतिहास नाही. प्राचीन भारताचा इतिहास व त्यातून वाहत जाणारी सिंधू नदी कैलास मान सरोवर प्रदेशातून प्रथम भारताच्या लडाखमधून वाहत पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगीट, बल्टिस्तान या प्रदेशात शिरते. १९६० च्या इंडस वॉटर ट्रीटीनुसार सिंधूचे सर्व पाणी पाकिस्तानला भारत देतो, हे खरे असले तरी ती एक राजकीय तडजोड आहे. उद्या भारताची वॉटर ग्रीड सिस्टिम कार्यवाहीत आणण्याचा निर्णय भारताने घेतला तर सिंधूचे पाणी भारताकडे वळवण्याचे आर्थिक पाठबळ व तंत्रज्ञान भारताकडेच राहणार आहे.

भाटे यांचा शेवटचा मुद्दा : लेखकाने दिलेली क्रोनॉलॉजी व त्यातले कालमापनाचे संदर्भ चुकीचे आहेत.

उत्तर : भाटे यांना माझ्या लेखात कुठले संदर्भ चुकीचे वाटतात हे त्यांनी स्पष्ट करावे. म्हणजे मी त्यांना उत्तर देऊ शकेन.

माझे संदर्भ असे आहेत :

डॉ. बी.बी.लाल (२००२)
डॉ. के.एस. वलदिया (२००२)
डॉ. एस एम् राव
डॉ. के.एम. कुलकर्णी ( २००२)
मायकेल डॅमिनो (२०००)
डॉ. एस कल्याणरामन ( १९९५,२००८)
संजय गोडबोले

     हे लेखक व त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे, त्यांपैकी अनेकांनी आपले प्रबंध जागतिक संमेलनांत सादर केलेले आहेत.

     भाटे यांना पुराणातले माझे संदर्भ व पुरातत्त्वाची सांगड पटत नाही हा त्यांचा विचार आहे व त्यांचे वैयक्तिक संशोधन हे त्यांचे स्वत:चे आहे. त्यावर मी काय लिहिणार?

     माझे संदर्भ हे माझ्या संशोधनातून आले आहेत, ते मी ज्या ज्या इतरांच्या संशोधनातून घेतले त्यांची नावे आवश्यक ती दिली आहेत.

अरुण निगुडकर
इमेल : arun.nigudkar@gmail.com

अरूण निगुडकर यांनी लिहीलेला वीणा हा लेख वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा

डॉ. अनिलकुमार भाटे

निवृत्त प्राध्यापक
विद्युत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट’
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
ईमेल: anilbhatel@hotmail.com

About Post Author