राहता गाव

0
23

कोपरगावच्या दक्षिणेस बारा मैलांवर नगर – मनमाड रस्त्यावर राहाता हे गाव असून 1872 व 1881 सालची लोकसंख्या अनुक्रमे 2209 व 2389 इतकी होती. कोपरगाव उपविभागातील प्रमुख बाजारपेठ तेथे असून प्रवाशांसाठी बंगला बांधलेला आहे. राहता ही कोपरगाव उपविभागातील धान्याची मुख्य बाजारपेठ आहे. तेथे श्रीमंत- धनवान व्यापारी अनेक राहतात. दौंड-मनमाड ही रेल्वे सुरू झाल्यानंतर मालाची निर्यात करणार्‍या पेनिनसुला रेल्वे मार्ग लासलगांव येथून वळवून चितळी व पूणतांबा पर्यंत जोडला गेला. आठवडा बाजार गुरूवारी भरतो. राहता येथे 1 जानेवारी 1851 पर्यंत कनिष्ठ न्यायाधीशांचे कोर्ट होते. शासकीय शाळा या जुन्या कोर्टाच्या इमारतीत भरते.

‘असे होते कोपरगाव’ या पुस्तकातून (पान क्रमांक 97)

About Post Author