About Post Author
रामदास भटकळ
रामदास भटकळ यांचा जन्म 5 जानेवारी 1935 साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी पदवी संपादन केली. त्यांनी चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एलएल. बीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातून एम.ए. पूर्ण केले. पॉप्युलर या मराठी पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. त्यांनी प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या ‘इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस’मध्ये तीन महिन्याची नोकरी केली. त्यांनी यु.एस.स्टेट डिपार्टमेंटच्या निमंत्रणावरुन 1965 साली अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला. रामदास भटकळ यांनी ‘बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन’ व ‘कॅपेक्सिल’ या निर्यातदारांच्या संस्थेच्या ‘बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल’चे अध्यक्षपद भुषविले आहे. त्यांनी ’द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया’, ‘जिगसॉ’, ‘मोहनमाया’, ‘जगदंबा’, ‘रिंगणाबाहेर’ या पुस्तकांचे लेखन केले आहे. भटकळ हे महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9820871408
रामदास भटकळ यांनी रामभाऊ
रामदास भटकळ यांनी रामभाऊ पटवर्धन यांच्या जागवलेल्या आठवणी खूप बोलक्या, संपादन व्यवहाराच्या नैतिकतेला स्पर्श करणा-या. राम पटवर्धन हे अनेकांचे सुप्त शिक्षक, मार्गदर्शक आणि प्रयोगशील साहित्याचे नि:सिम पुरस्कर्ते. शुभेच्छा. कमलाकर सोनटक्के.
रामभाऊ भटकळांवर रामदास भटकळ
रामभाऊ, भटकळांवर रामदास भटकळ यांचं विस्तृत टिपण खूप प्रत्ययकारी, संपादन प्रांतातील व्यवहार आणि नैतिकतेच्या सीमारेषा स्पष्ट करणारं.
विविध क्षेत्रातील प्रसिध्दी पराण्मुख पथप्रदर्शकांविषयी अधिक सामग्री आल्यास उपकारक ठरेल. शुभेच्छा, कमलाकर सोनटक्के.
भटकळांचं माणसांविषयीचं लिखाण
भटकळांचं माणसांविषयीचं लिखाण चांगलंच असतं. त्यांनी पाडगावकरांवरही छान लिहिलं आहे. तसंच हेसुद्धा छान, पटवर्धनांच्या अनेकांगांना स्पर्श करणारं झालं आहे. पण शेवटी ’कुणीच कुणाला – अगदी स्वतःलाही – पूर्णपणे ओळखत नसतो,’ या गोलमाल विधानामागे ते विनाकारण दडतात. १९५१ पासूनची ओळख काही एक ठोस विधान करण्यास पुरेशी आहे!
Very good article sir
Very good article sir
Comments are closed.