म्हैसगावचा सॅक्सोफोन वादक – कालिदास कांबळे

10
121
carasole

कालिदास हा मूळचा म्हैसगावचाच. त्याचे शिक्षण दहावी पास झाले आहे – तेही म्हैसगावातील शाळेतच. कालिदास म्हणाला, की म्हैसगावात बरीच कलाकार मंडळी आहेत. कालिदासच्या बालपणी म्हैसगावचा बँड होता आणि कालिदासचे वडील शिवाजी कांबळे हे त्या बँडमध्ये ट्रम्पेट वाजवत. ते गावातील बँडव्यतिरिक्त कुर्डुवाडीजवळील आरपीएफ येथेही ट्रम्पेट वाजवायला जात. शिवाय, त्यांची घरची शेती होती. घरची शेती कालिदासच्या बालपणापासूनच, त्याच्या कानावर हे संगीत/वाद्यसंगीत पडत होते. म्हैसगावातील सूर्यभान खारे काका पेटी वाजवतात, ते पेटीवादनाच्या कार्यक्रमाला जाताना, लहान कालिदासला, त्यांच्या बरोबर नेऊ लागले. लहानग्या कालिदासची बोटे की बोर्डवर फिरू लागली. तो वडिलांकडून ट्रम्पेटही वाजवण्यास शिकला.

त्याने दहावी झाल्यानंतर वादक म्हणून व्यवसाय करण्याचे ठरवले. कालिदासने की बोर्ड, ट्रम्पेट यांच्या जोडीला ‘बाजा’ वाजवण्यास सरुवात केली. कालिदासची बँडमध्ये वाद्ये वाजवून कमाई होऊ लागली.

कालिदासला 2001 साली, पुण्याच्या इंडियन एअरफोर्स बँडमध्ये, की बोर्ड, ट्रम्पेट वादकाची नोकरी मिळाली. सकाळी परेड असायची तेव्हा या बँडपथकाला वादनाचे काम असे. त्यानंतर रात्री, मोठ्या अधिकाऱ्यांच्या डिनर पार्ट्या असायच्या, त्यावेळी बँडपथकात वादनाचे काम असे. ती नोकरी कालिदासने 2003 सालापर्यंत केली. ती नोकरी सोडून तो म्हैसगावला परत गेला. पुण्यातील तीन वर्षांच्या काळात, कालिदासने त्यावेळचे पोलिस सबइन्स्पेक्टर यासिन खान, जे. पठाण यांचे सॅक्सोयफोन वादन एकले होते. त्याला त्या वाद्याची ओढ तयार झाली. यासिन खान त्यावेळी बडोद्याला राहत होते – नोकरीनिमित्त. म्हणून 2004 साली कालिदास बडोद्याला गेला व यासिन खान यांच्याकडेच राहून – गुरुकुल पद्धतीने – सॅक्सोफोन वाजवण्यास शिकू लागला. तो दोन वर्षे बडोद्यात होता.

कालिदास 2007 साली, सुरेखा पुणेकर यांच्या ‘सृष्टी प्रॉडक्शन लावणी शो’मध्ये की बोर्ड वाजवू लागला. तो या ग्रूपबरोबर असतो. कालिदासने या लावणी कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रभर अनेक दौरे केले आहेत.

यासिन खान यांनी म्युझिकल अॅकॅडमी पुण्यात स्थापन केली. कालिदास त्यांच्या संपर्कात असतोच.

ABSS Global Council of Art & Cultural Olympiad of Performing Art 2014 या अंतर्गत सिंगापूर येथे एक स्पर्धा होती. भारतातून वीस वादकांचा ग्रूप गेला होता. त्यात कालिदास सॅक्सोफोन वादक म्हणून गेला होता. कालिदासला सॅक्सोफोन वादनाच्या स्पर्धेत ब्राँझ पदक मिळाले. त्या स्पर्धेनंतर, लगेचच कालिदास मलेशियाला गेला होता. तेथे त्यांचा सोलो सॅक्सोफोन वादनाचा कार्यक्रम झाला.

– पद्मा कऱ्हाडे

About Post Author

10 COMMENTS

  1. खरोखरच ,महाराष्ट्रात काही
    खरोखरच ,महाराष्ट्रात काही विधायक घडत आहे! महाराष्ट्रातील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे नेटवर्क! थिंक महाराष्ट्र च्या रूपाने आम्हास पाहावयास मिळत आहे.THANK YOU PADMA KARHADE MADAM

  2. Very Nice……..Kalidas…..
    Very Nice……..Kalidas……..I am a friend of Kalidas Kamble. I become very happy & Proud of you. Keep it up. Kalidas……..!

  3. veri….. nice mama kalidas
    veri….. nice mama kalidas hi is my mather big brother i become verry happy..& pruond of you .keep it up mama .

  4. मला खुप चांगले वाटले माझ्या
    मला खूप चांगले वाटले. माझ्या मित्राची प्रगती पाहून अत्यंत आनंद झाला. तुझ्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुझा मित्र. किशोर कसबे.

  5. हे वाद्य आवडीच आहे .कालिदास
    हे वाद्य आवडीच आहे. कालिदास कांबळे ह्यास मनोमन शुभेच्छा!

  6. एकच नंबर आहे कालिदास
    एकच नंबर आहे कालिदास

  7. माझे गाव राजुरी ता.फलटण
    माझे गाव राजुरी ता.फलटण जिल्हा. सातारा.कालिदास कांबळे हे माझे गुरू आहेत. मी saxophone वाद्याचे प्रशिक्षण घेत आहे.आहे मला त्यांचा खुपच अभिमान वाटतो.त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

Comments are closed.