मराठी माणसाचा न्यूनगंड…

4
83
Marathi_mansach_nungand

सुजाता आनंदन ‘हिंदुस्थान टाइम्स’ मध्ये दर बुधवारी मुख्यत: महाराष्ट्रा बाबत एक स्तंभ लिहितात. त्यामधून त्यांची या राज्याबाबतची व येथील माणसांबाबतची चांगली आस्था दिसून येते. त्यांचे राजकीय नेत्यांबरोबरचे संबंधही उत्तम आहेत. त्यांनी बाळ ठाकरे व ठाकरे घराणे याबद्दल अनेक वेळा प्रेमपूर्वक लिहिल्याचे आठवते…

मात्र त्यांनी 10 नोव्हेंबर 2009 च्या ‘हिंदुस्थान टाइम्स’ मध्ये लिहिलेला प्रसंग धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या वर्मावर अचूक बोट ठेवणारा वाटला. त्यांनी नमूद केलेले निरीक्षण असे:

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अलिकडे झाली. त्या आधीच्या प्रचारकाळात ‘टाइम्स नाऊ’ च्या अर्णव गोस्वामी ने राज ठाकरेची मुलाखत घेतली, तेव्हा इंग्रजी वाहिनीवर राजने आपण मराठीतच बोलणार असा आग्रह धरून भाषेसंबंधातील अस्मिता प्रकट केली. परंतु त्याने मराठीतून बोलणे पसंत केले याचे साधे कारण, त्याला इंग्लिश येत नाही हे होय!

सुजाता आनंदन यांचा अनुभव असा आहे, की राजला काही इंग्रजी शब्द एकमेकांशी जुळवून प्राथमिक स्वरूपाचे इंग्रजी बोलता येत नाही. यामुळे त्याच्यामध्ये एक न्यूनगंड तयार झालेला आहे. सुजाता आनंदन यांनी तसा एक प्रसंग त्यांच्या लेखात नोंदला आहे. त्या लिहितात,

राज आणि उद्धव नव्वदच्या दशकात राजकारणात प्रथम आले. तेव्हा त्यांच्या एका दौ-यात त्यांच्याबरोबर मी होते. त्यावेळी देशी-विदेशी माध्यमांना या नवागतांबद्दल औत्सुक्य वाटू लागले. एका वाहिनीने तर त्यांचा सततच पाठपुरावा केला. त्या वाहिनीला राजची खास मुलाखत हवी होती आणि वाहिनीचे लोक त्याला सतत भेटू पाहत होते. त्यांनी त-हत-हेने प्रयत्न केले. तरीसुद्धा राज त्यांच्यापासून दूर राहू पाहतो असे त्यांच्या ध्यानी आले. शेवटी, निर्माता कंटाळला. त्यांचा राजवर बराच वेळ व पैसा खर्च झाला होता. त्यांना हे पक्के करून घ्यायचे होते, की राज त्यांना मुलाखत देऊ इच्छितो की नाही? तो मुलाखत देणार असेल तर त्यांची आणखी काही काळ थांबण्याची तयारी होती.

सुजाता आनंदन म्हणतात, मी हे राजच्या कानावर घातले तेव्हा तो एकदम संकोचला. त्याला वाहिनीवाल्यांशी बोलायचे होते, पण तो बोलू शकत नव्हता! तो मला म्हणाला, ‘आप ऎसा किजिए आप ही उनसे बात कर लिजिए. आप तो हमारे विचारोंके बारे मे सब जानती है!’ अनेक दूरचित्रवाहिन्या येण्याच्या आधीचा तो काळ. राजलाही या माध्यमाची महती कळायची होती. मी त्याला म्हटले, “त्यांना तुझ्याशी बोलायचे आहे. तू त्यांच्या पडद्यावर दिसणे गरजेचे आहे. मी तर सहभागी पत्रकार आहे. माझा त्यांना काहीच उपयोग नाही!” तो एकही शब्द न बोलता तिथून निघून गेला. त्याला बोलायचे नव्हते. हे स्पष्ट होते. मी निर्मात्याला म्हटले, “त्याला इंग्रजी नीट बोलता येत नाही. पण त्याच्या काकांना येते, तू बाळ ठाकरे यांच्याशी बोलून घे!”

त्यांचे बाळ ठाकरे यांच्याशी आधीच बोलणे झाले होते आणि त्यांना राजची मुलाखत हवी होती. मला राज आणि उध्दव या दोघांबद्दलही वाईट वाटले. त्यांचे काका आणि वडील यांनी ‘माय मराठी’ या नावाने जे आंदोलन केले, त्या आंदोलनाचे ते भाषिक बळी ठरले होते. जग जवळ येऊन इंग्रजी संभाषणाचे प्रमाण जगभर वाढत असताना या मुलांना इंग्रजी येत नाही म्हणून स्वत:चे तोंड बंद ठेवावे लागत होते. मला आठवते त्याप्रमाणे लालु प्रसादने त्या काळात आपल्या राज्यातील गवळ्यांना देखील इंग्रजी कसे शिकवता येईल याचा विचार चालवला होता.

राजने त्याला इंग्रजी येत नाही या उणिवेचा उध्दवबरोबरच्या चढाओढीत मात्र उत्तम फायदा करून घेतला आहे. ( त्यांच्या मुलाने शाळेमध्ये मराठीऎवजी जर्मन भाषेचा पर्याय स्वीकारला आहे.) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी, आबू आझमीने हिंदीत शपथ घेतली म्हणून त्याच्यावर केलेला हत्ला हे या दांभिकतेचे आणि न्यूनगंडाचे प्रकटीकरणच होय. त्यांच्या या भूमिकेमुळे हिंदी या राष्ट्रभाषेचादेखील अपमान झाला आहे.

सुजाता आनंदन यांनी नमूद केलेली ही घटना आणि त्यांची त्या घटनेवरील टिप्पणी एकूण मराठी समाजालाच उदबोधक आहे. मराठी समाजाचे खरे दु:ख त्याच्या न्यूनगंडात आणि त्यामुळे मराठी माणसांनी स्वीकारलेल्या दांभिकतेत आहे.

सुजाता आनंदन यांनी हे निरीक्षण परखडपणे व स्वानुभवातून टिपले. पंरतु महाराष्ट्रात निरखत राहिले तर इंग्रजी संभाषणे कौशल्याचा अभाव हे मराठी समाजाचे मोठेच दुबळेपण आहे. राष्ट्रीय वाहिन्यांवर बोलणारे व्यावसायिक सध्या तयार झाले आहेत. ते चटपटीत हजरजबाबी, वाहिन्यांवर जसे हवे तसे बोलू शकतात. त्यामध्ये मला मराठी माणूस सहसा  आढळलेला नाही. जो एखाद-दुसरा मराठी पत्रकार राष्ट्रीय वाहिनीवर येतो त्याला बहुधा महाराष्ट्रासंबंधातील प्रश्नांबाबत बोलण्यासाठी पाचारण केले जाते. राष्ट्रीय घटनेसंबंधात त्याचे मत महत्त्वाने गणले जात नाही. एक उदाहरण म्हणून गेल्या वर्षी, 26/11च्या हल्ल्यानंतर बहुधा ‘एनडी टिव्ही’वर झालेली चर्चा आठवते. त्या चर्चेत विक्रम गोखले हे मराठीतील अग्रणी अभिनेते सहभागी झाले होते. चर्चेतील ते एकमेव भागधारक असे होते, की जे संभाषणाच्या ओघात इंग्रजी कमी आणि हिंदी अधिक बोलत होते.

इथे कोणा व्यक्तीचे उणेदुणे व्यक्त करायचे नाही. प्रत्येक मराठी माणूस याच समाजात याच दुबळेपणाने वाढत आलेला आहे. सुचवायचे एवढेच आहे, की राज ठाकरे यांनी मराठी माणसांच्या भावनांचे राजकारण हवे तर करावे, परंतु त्याचबरोबर मराठी माणसांची ताकद वाढेल, तो अधिक सामर्थ्याने सा-या जगाला सामोरा जाईल यासाठीच्या प्रयत्नांना चालना द्यावी.

thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleपं. भाई गायतोंडे – तबल्यावरील अक्षरे
Next articleएक ‘हिंमत’राव डॉक्टर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

4 COMMENTS

  1. I am a regular reader of
    I am a regular reader of Hindustan Times and read Sujata Anandan’s column every wednesday. Following are my observations about her articles; 1) She takes great pride in calling Mumbai as Bombay. By doing so she expresses her contempt towards Marathi. 2) Her column at best can be called a gossip column because she throws a lot of names to indicate her proximity with known political leaders and tries to spread half rumors as their utterances. 3) There was a time (about 1 year back) when 90% of her articles would be in praise of Sharad Pawar and in my letters to her and to HT I would call that column ‘Pawar on Wednesdays’. However since one year she has stopped praising Pawar which indicates that he has stopped patronizing her. 4) All marathi leaders feel happy if someone writing a column in an English daily writes about them. Bal Thakre was not an exception and must have called her once or twice to meet him. Using that meeting she has been writing many things which one will find difficult to believe as Bal Thakre’s views. 5) Finally it is difficult to believe that Raj will have any complex about his so-called poor English. In fact Raj’s asset is his super-confidence while dealing with any adverse situation. If at all he has not allowed someone to interview him as Sujata says it must be for some other reason and not due to difficulty in understanding/talking English. We know that a powerful Congress leader like Kamraj could speak and understand only Tamil. Kumar Ketkar or Bhalchandra Mungekar don’t speak fluent English. Yet they are confident while justifying points which are 99%wrong. In short knowledge or lack of knowledge of English language can hardly deter Raj from giving any interview. It is Sujata’s bias which makes her say so, and our anti-Raj Marathi editors are just lapping it up with glee.

  2. मला वाटतं मुलांने ‘कोणती भाषा
    मला वाटतं मुलांने ‘कोणती भाषा शिकावी’ हा त्या मुलाच्या आवडीचा स्वाभाविक ‘अधिकार’ आहे. आज आपण विद्यार्थीकेंद्रित (student centric) शिक्षणाचा उदोउदो करतोय तेव्हा त्यांच्या मुलांनी जर्मन भाषा निवडल्यावर हिंदी भाषेचा अपमान कसा काय होऊ शकतो?

  3. श्री. श्रीराम बापट यांनी जे
    श्री. श्रीराम बापट यांनी जे सुजाता आनंदन यांच्याविषयी लिहले आहे ते अगदी योग्य आणि खरे आहे.
    संपूर्ण हिंदुस्तान टाइम्स मध्ये मुंबईला Mumbai असे लिहित असताना ही बाई हटकुन Bombay लिहते.
    एकदा तर ती इंग्लंडला गेलेली असताना बहुतेक बीबीसी किंवा इतर कोणी तरी तिला म्हणाले की
    ‘आम्ही आता बॉम्बे ला मुंबईच म्हणतो कारण महाराष्ट्रातील माणसांना ते आवडते.’
    तर या बाईने त्यांना काय सांगावे!
    ती म्हणाली की ‘असे कोणत्याही महाराष्ट्रियन माणसाला वाटत नसून फक्त बाळ ठाकरे यांना वाटते’
    मला आठवते की ती बाळासाहेबांना ‘बाळ ठाकरे’ म्हणूनच पेपर मधे लिहायची.
    एकदा तर या बाइने खोटेपणाचा कळस केला. आपल्या सर्वांना माहीत असेल की १९८४ मध्ये दिल्लीत शिखांचे जसे हत्याकांड झाले तसे मुंबईत झाले नाही कारण बाळासाहेबांनी सैनिकांना शिखांना संरक्षण देण्यास सांगितले होते, त्यामुळे शिखांच्या केसालाही धक्का लागला नाही. परंतु याच सुजाता आनंदनने लिहले होते की मुंबईतील टैक्सीवाले शिख बाळासाहेबांमुळे मुंबई सोडून गेले. अशी पूर्ण खोटारडी बाई आहे ही.
    अशा भरपूर गोष्टी आहेत. परंतु जाऊ द्या! कशाला शिळ्या कढीला उत आणायचा!

Comments are closed.