लोकसत्तेचा अलिकडेच कायापालट झाला आहे. संपादकीय पानावर ‘अन्वयार्थ’ आणि ‘कुजबूज’ ही नवी सदरे सुरू करण्यात आली आहेत, मात्र बुधवार 6 एप्रिलच्या ‘कुजबूज’मध्ये कुजबूज अशी नाहीच. ‘कुजबूज’मध्ये गॉसिपींग अभिप्रेत आहे. त्याऐवजी त्यात निवडणूकीचे वार्तापत्र देण्यात आले आहे.
लोकसत्तेचा अलिकडेच कायापालट झाला आहे. संपादकीय पानावर ‘अन्वयार्थ’ आणि ‘कुजबूज’ ही नवी सदरे सुरू करण्यात आली आहेत, मात्र बुधवार 6 एप्रिलच्या ‘कुजबूज’मध्ये कुजबूज अशी नाहीच. ‘कुजबूज’मध्ये गॉसिपींग अभिप्रेत आहे. त्याऐवजी त्यात निवडणूकीचे वार्तापत्र देण्यात आले आहे.
मुख्य पानावरील अण्णा हजारेंच्या उपोषणाच्या बातमीत या उपोषणामागे संघाचा हात असावा, असे नमूद करण्यात आले आहे. बातमी ही ऑब्जेक्टीव्ह असावी. तिचा अकारण अन्वयार्थ काढला जाऊ नये. बातमीबद्दलच्या कॉमेन्ट इतर ठिकाणी नमूद केल्या जाव्यात. त्यामुळे ‘लोकसत्तेतील’ बातमी ही राजकीय हेतूने प्रेरीत होवून देण्यात आली असल्याच जाणवते.
या वर्तमानपत्राचे मुख्य पान असो वा संपादकीय, सगळ्याच ठिकाणी पानांचे स्वरूप गंभीर दिसते. त्यात हलकेफुलकेपणा येण्याची गरज भासते. ‘लंडन टाईम्स’सारख्या प्रसिध्द वर्तमानपत्रात संपादकीय पानावर डायरी नावाचे वेगळे सदर असते. असा प्रयत्न आपल्याकडे होण्यास हरकत नाही.
– अशोक जैन
पत्रकार – लेखक
{jcomments on}
About Post Author
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.