फँड्रीतील जब्या – सोमनाथ अवघडे

23
17
carasole

बोलक्या डोळ्यांचा, निरागस चेह-याचा सोमनाथ अवघडे भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध झाला तो ‘फँड्री’ चित्रपटामुळे. अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला सोमनाथ मूळचा सोलापूरच्या  करमाळा तालुक्यातील केम या छोट्याशा गावचा. आई जयश्री, वडील लक्ष्मण, मोठा भाऊ रवी आणि बहीण अंबिका असे त्याचे पाच जणांचे कुटुंब. सोमनाथचे वडील पोतराज. तो त्यांचा पिढीजात व्यवसाय. ते हलगीही वाजवत. त्याची आई शेतात मोलमजुरी करत असे.

सोमनाथ म्हणतो, ”मला कळू लागल्यापासून मी देखील शाळेतून घरी आल्यावर वडिलांसोबत हलगी वाजवायला जायचो. मी, माझं कुटुंब आणि माझे मित्र एवढ्याच लोकांचा माझा गोतावळा. गावातल्या ‘मोठ्या’ लोकांशी आमचा संबंधच नसायचा. कोणी हलगी वाजवायला बोलावले तर जायचे. आपले काम करायचे. बिदागी घ्यायची आणि यायचे. बस्स! पण ‘फँड्री’मुळे सगळेच बदलले.”

दिग्दर्शक नागराज मंजुळे हेदेखील मूळचे करमाळ्याच्या जेऊर गावचे. त्यांना त्यांच्या ‘पिस्तुल्या’ या लघुपटासाठी 2011 साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त मंजुळे यांचा केम गावात सत्कार होणार होता. ते कार्यक्रमाला आले असता त्यांना तेथे हलगी वाजवणारा सोमनाथ दिसला आणि तेथेच ‘फँड्री’चा नायक म्हणून सोमनाथची निवड झाली.

सोमनाथ मोठ्या उत्साहाने सांगतो, ”गावात कोणी पाहुणा यायचा असल्यास त्याचे स्वागत हलगी-ताशा वाजवून केले जाते. अण्णाकाका (नागराज मंजुळे) गावात येणार होते, तेव्हा आमच्या ‘उत्तरेश्वर पथका’ला हलगी वाजवण्यासाठी बोलावले होते. मी माझ्या वडिलांसोबत तेथे गेलो होतो. तेथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान अण्णाकाकांनी मला हलगी वाजवताना पाहिले. मला हलगी वाजवायला खूप आवडते. ‘फँड्री’तील जब्या पण हलगी वाजवणारा दाखवलाय. त्यामुळे अण्णाकाकांनी त्यांच्या एका मित्राला माझा व्हिडिओ शूट करायला सांगितला. माझा व्हिडिओ काढताहेत हे पाहून मला आनंद वाटला आणि मी आणखी जोशात येऊन हलगी वाजवू लागलो, नाचू लागलो.”

कार्यक्रम पार पडल्यानंतर नागराज मंजुळे यांनी सोमनाथला जवळ बोलावून चित्रपटात काम करणार का असे विचारले? नागराज यांनी तेथेच त्याची ऑडिशनही घेतली. प्रत्यक्ष कामाची वेळ आली तेव्हा सोमनाथ बिथरला. त्याला वाटत असे, की ‘पिक्चरमधील हिरो कसा भारी असतो आणि हे लोक मला हिरो म्हणून घेताहेत! मला तर धड बोलताही येत नाही.’ त्या विचारांनी तो मंजुळे यांच्यापासून दूर राहू लागला. सोमनाथने चित्रपटात काम करण्यास नकार दिला, म्हणून त्याचे आईवडील त्याला रागावले. नागराज, त्यांचे सहकारी-मित्र चित्रपटाच्या, कामानिमित्त केमला येत-जात होते. ते सोमनाथच्या घरी जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्नच करत असत. “मी ती माणसे येतील तितक्यावेळा घरच्यांची बोलणी ऐकावी लागणार या भीतीने घरातून पळून जाऊन गावातील पाण्याच्या टाकीवर लपून बसत असे.” सोमनाथला ते दिवस आठवले की हसू येते.

तो म्हणतो, ”एक दिवस अण्णाकाकांनी मला जवळ बोलावून त्यांच्या ‘पिस्तुल्या’ चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराचे फोटो दाखवले. ते मला म्हणाले, ‘तू चांगले काम केलेस तर तुलादेखील असेच बक्षीस मिळेल. तुला विमानातही बसायला मिळेल. तुला पिक्चर मध्ये काम नसेल करायचे तर नको करू. पण माझ्याबरोबर पुण्याला चल. तेथे आमचे काम पाहा. मग ठरव.’ त्या नंतर मी माझ्या भावासोबत पुण्याला गेलो. तेथे त्यांचे ऑडिशन्स, स्क्रीप्ट वाचन आणि इतर कामे पाहिली. सर्वांच्या ओळखी होत गेल्या. धीर चेपत गेला. अण्णाकाका डायलॉग द्यायचे आणि सांगायचे, तुला येते तशी अॅक्टिंग कर. मी काम करू लागलो. रोज नवे छान अनुभव येऊ लागले. चित्रपटात माझ्या मित्राची भूमिका करणारा सूरज पवार प्रत्यक्षातही माझा चांगला मित्र झाला. शूटिंगदरम्यान आमचे काम नसेल तेव्हा आम्ही खूप खेळायचो. धम्माल करायचो. पिक्चर करताना अण्णाकाकांसह इतर कलाकारही माझे कौतुक करायचे. तेव्हा खूप मस्त वाटायचे. पिक्चरच्या थीम साँगमध्ये (जीव झाला येडा पिसा… रात रात जागला) संगीतकार अजय अतुल यांच्यासह मीदेखील हलगी वाजवली.”

चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर सोमनाथ गावी परतला, तेव्हा चित्रपट कसा होईल याचा त्याला अंदाजही नव्हता. तो अण्णाकाकांना व इतर सहकलाकारांना पिक्चर कधी रिलीज होणार, विचारायचा. तेव्हा त्याला उत्तर मिळायचे, अजून बरेच काम बाकी आहे! चित्रपटाचे मुंबईत एडिटिंग, डबिंग सुरू आहे, याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याला या गोष्टी कळतच नव्हत्या. तो म्हणतो, ”मला खूप प्रश्न पडायचे, पिक्चर थेटरला लागणार का? मला बक्षीस मिळणार का?”

पण एकदाचा ‘फँड्री’ प्रदर्शित झाला आणि सोमनाथचे आयुष्यच बदलून गेले! तो भावूक होऊन सांगतो, ”पेपरमध्ये माझे फोटो छापून यायला लागले. टीव्हीवर मुलाखती व्हायला लागल्या. लोक मला ओळखू लागले. माझ्या गावातील लोकही माझ्याकडे आदराने पाहू लागले. तळच्या जातीतील असल्याने कधीही न बोलणारे लोकही माझ्याशी मुद्दाम निमित्त काढून बोलत. गावात माझा, माझ्या कुटुंबाचा मान वाढला. पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ‘फँड्री’च्या शोला खूप गर्दी झाली होती. फेस्टिवलच्या निकालादिवशी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मला जाहीर झाले तेव्हा अण्णाकाकांना खूप आनंद झाला. त्यांनी मला मिठीच मारली. अंजुम राजाबली यांच्या हस्ते मला पारितोषिक देण्यात आले. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्या… मला काही सुचत नव्हते. फेस्टिवलनंतर थिएटर बाहेर पडलो तर सगळे मला मिठी मारत होते. माझ्याकडे सही मागत होते. तो आनंद तर काय सांगू! त्या नंतर मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मला इतका मोठा पुरस्कार मिळेल असे वाटतंही नव्हटते. मी पुरस्कार घ्यायला दिल्लीेला विमानाने गेलो. अण्णााकाकांनी सांगितल्यांप्रमाणे मला बक्षिसही मिळाले होते आणि विमानात बसायलाही! तो आनंद मला सांगताही येत नाही.”

सोमनाथ सांगतो, ”आमच्या गावाकडे शिक्षणाला इतके महत्त्व नाही. पोरांना शिकावेसे वाटतच नाही. शाळेत मोजकीच पोरे असतात. शिक्षक घरी येऊन पोरांना शाळेत घेऊन जातात. त्यांनी मुलांच्या मनामध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण करायला हवी, तरच गावाकडची पोरे शिकतील. नाहीतर आईवडिलांसोबत कामाला जुंपली जातील किंवा टवाळक्या करत फिरतील. आम्हा गावाकडच्या मुलांना अजून इंग्रजीतील आकडेही धड बोलता येत नाहीत. वाचायला काही सांगितले तरी ततपप होते.”

सोमनाथच्या भावाने रवीने कलाशाखेतून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. तो नोकरीसाठी प्रयत्ने करत आहे. त्याची बहीण अंबिका हिचे लग्न झाले आहे. सोमनाथच्या शिक्षणाची जबाबदारी नागराज मंजुळे यांनी घेतली आहे. सोमनाथने मार्च 2015 मध्ये दहावीची परीक्षा दिली. त्याला पंचावन्‍न टक्के मार्क मिळाले. सोमनाथ म्हणतो, ‘मी शाळेत जायचो. पण मला अभ्यास आवडायचा नाही. आता अभ्यासाचे महत्त्व कळते. मला शिकायचे आहे. शिकलो तरच पुढे काहीतरी करता येईल, हे मला समजते. पण करिअर नेमके कशात करायचे ते ठरवलेले नाही. चित्रपटात काम मिळाले तर जरूर करीन. ”

सोमनाथ अवघडे. मु.पो. केम, ता. करमाळा, जि. सोलापूर, 8379814674

– अर्चना राणे

About Post Author

Previous articleकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव
Next articleअकलूजचे कृषी प्रदर्शन
अर्चना राणे यांनी 'दैनिक प्रहार'मध्‍ये प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्‍यांनी 'लोकमत' वृत्तपत्रात शैक्षणिक तसेच साहित्य आणि सांस्कृतिक बीटसंदर्भात काम केले. राणे यांनी पर्यावरण बीटवर काम करत असताना मुंबई, ठाणे, रायगड येथील खाड्यांची स्थिती आणि तेथील जैवविविधतेवर आधारित 'बाराखाडी' ही वृत्तमालिका लिहिली होती. त्‍यांना त्‍याकरता 2013 मध्ये 'चौथा स्तंभ' पुरस्कार देण्‍यात आला. मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या 'नॉलेज एक्सप्लोरर' या शैक्षणिक मासिकाच्‍या कमात त्‍यांचा सहभाग होता. याशिवाय पुण्यातील प्रबोधन माध्यम या न्यूज एजन्सीसाठीही त्‍या कार्यरत होत्या. पर्यावरण बीटवरील उत्कृष्ट कामगिरीकरता 'दिना बामा पाटील प्रतिष्ठान'चा तर शैक्षणिक बीटवरील उत्कृष्ट कामगिरी करता 'सरस्वती चॅरिटेबल ट्रस्ट'मार्फत 2012 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाला होता. त्‍यांना बहुजन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संसदतर्फेही शैक्षणिक बीटवरील स्पेशल स्टोरीजसाठी 2010 मध्ये आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्‍यांनी लहान मुलांसाठी लिहिलेले 'झाडे लावूया' हे गोष्टीचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820847339

23 COMMENTS

 1. ‘फँड्री’ मध्ये सोमनाथने
  ‘फँड्री’ मध्ये सोमनाथने केलेली भूमिका अप्रतिम आहे. केमसारख्या एका लहानशा खेड्यातील जब्या जगाच्या नकाशावर चमकला याचा अभिमान वाटतो. विशेष म्हणजे मराठी चित्रपटाला सर्व मापदंड मोडित काढून जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या नागराज मंजुळे याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

 2. tujha abhinav mala khup chaan
  tujha abhinay mala khup chaan vatla. Tujha to sadhe pana aani mana pasun prem karne te je abhinay hote te farach chaan hote

 3. Mast acting keli ya fim madhe
  Mast acting keli ya fim madhe. Khup aawadine pahto amhi ha chitrapat. Asech chaan chitrapat tula milo hi shubhechha.

 4. मि हा चिञपट बगुन सोमनाथ चा
  मी हा चित्रपट बघून सोमनाथचा फॅन झालो. नागराज दादाने त्‍याच्‍याकडून काय काम करून घेतले आहे! माझ्याकडे शब्द नाही उरले. नागराज दादासाठी मी एकच शब्द बोलन. छान दादा!

 5. नागराज दादा तुम्ही खरच मातीच्
  नागराज दादा, तुम्ही खरच मातीचं सोने करताय. इथून पुढे तुमचे चित्रपट अवश्य बघेन. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.

 6. आणा मी सैराट सिनेमा पाहिला
  अण्‍णा, मी सैराट सिनेमा पाहिला. मला खूप आनंद झाला. अण्‍णा, मला पण तुमच्यासोबत काम करायचंय. मी लातूरचा आहे. अण्‍णा, ऐकदाच काम द्या सिनेमात. मो 9096914169

 7. Anna, me gaato…kdhich sndhi
  Anna, me gaato. Kadhich sandhi milali nahi. Pan sandhi milali ki nakki tyaach sone karin. Plz mala chance dya tumcha movie madhe ganya sathi.

 8. खुप मस्त गावरान भाषेत आख्या
  खूप मस्त गावरान भाषेत आख्या महाराष्ट्राचे डोळे उघडले. शाबास! तुला पुढील चित्रपटासाठी शुभेच्छा!

 9. Mala fandry…aani sairat
  Mala fandry…aani sairat chitarapat khup avadla. …mala pan ek da tri kaam krAych ahe

 10. आण्णा=मि तुमचा फँन आहे. मित्र
  आण्णा=मि तुमचा फँन आहे. मित्र गरिब कुटुंबातील मुलगा मला चित्रपटात काम करायचे आहे. आणि आई/वडील यांचे नाव मोठे करायचे आहे. तेच माझ्या आयुष्यातील शिल्पकार .मला एक संधी द्या.मि नक्की सोने करेल. 9767422857.

 11. आण्णा मला भेटाच राम आण्णा
  आण्णा मला भेटाच राम आण्णा गोष्टा तयार केली राम 9145518826

 12. दादा नमस्ते मी तुमचा खूप खूप
  दादा नमस्ते मी तुमचा खूप खूप फॅन आहे. मी गरीब कुटुंबातील मुलगा मला चित्रपटात काम करायचे आहे. दादा मला वडील नाही. आई आहे. दादा मला चित्रपटात काम करायला घ्या. अक्षय डामसे 8888402033

 13. मी सर बीडमधी रा तू। मीपन तुमच
  मी सर बीडमधी रा तू। मीपन तुमच फॅन आहे

 14. अाण्णा, सैराट सिनेमा खूप
  अाण्णा, सैराट सिनेमा खूप आवडला. यानंतरचा सिनेमा केव्हा काढणार आहे .पुढील वाटचालीस शुभेच्छा. मो.नं. 9503151460

 15. sir.me tumca cinema pahila
  sir.me tumca cinema pahila.sairat mla khup avdla . atta mala pan akhdya film made kam dya .pleej mi story pan banvto me somthane gavca ahe.

 16. नागराज सर मला अभिनेता नव्हे…
  नागराज सर मला अभिनेता नव्हे तर तूमच्यासारख दिग्दशक होयायचे त्यासाठी मला तुमच्ही मदत पाहीजे। 9518937359. Shubham Salve Ahmednagar

Comments are closed.