निषेध! निषेध !

  0
  121

     जगात सर्वत्र निषेधाची लाट आलेली आहे. गेल्या शनिवारी निषेधाचा कहर झाला. जगभरच्या ऐंशी देशांमधील साडेनऊशे शहरांत वेगवेगळ्या कारणांनी निषेध-निदर्शने-आंदोलने चालू होती. इटालीची राजधानी रोममध्ये तर हिंसाचार उसळला. न्यू यॉर्कमध्ये ‘ऑक्‍युपाय वॉलस्‍ट्रीट’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. हे आंदोलन तेथे गेले महिनाभर चालू आहे. जगभरची ही आंदोलने जागतिक अर्थकारणामधील अस्थिरतेमुळे उदभवली आहेत.

       जगात सर्वत्र निषेधाची लाट आलेली आहे. गेल्या शनिवारी निषेधाचा कहर झाला. जगभरच्या ऐंशी देशांमध्ये साडेनऊशे शहरांत वेगवेगळ्या कारणांनी निषेध-निदर्शने-आंदोलने चालू होती. इटालीची राजधानी रोममध्ये तर हिंसाचार उसळला. न्यू यॉर्कमध्ये ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट’च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. हे आंदोलन तेथे गेले महिनाभर चालू आहे.

       निरीक्षण असे, की जगभरची ही आंदोलने जागतिक अर्थकारणामधील अस्थिरतेमुळे उदभवली आहेत. ‘कंपन्यांची लालसा’, ‘सरकारमधील भ्रष्टाचार आणि नाकर्तेपणा’ अशा प्रकारच्या शब्दप्रयोगांची सर्व देशांमध्ये रेलचेल आहे. सर्वत्र तक्रारीच तक्रारी मांडल्या जात आहेत.

       प्रत्यक्ष परिस्थितीही तशी आहे! स्पेनमध्ये एकवीस टक्के बेकारी आहे. ग्रीसची आर्थिक पुनर्घटना करण्याची वेळ आलेली आहे. इटालीतील अस्थैर्य तर शिखराला पोचले आहे. गेले दशक भीषण होते असे म्हणतात, परंतु प्रत्यक्षात एक पिढीच नष्ट होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

       ही भीती अधिक गहिरी होते, कारण आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणता पर्यायच समोर येत नाही आणि त्यामुळे खुली बाजारपेठ व लोकशाही यांचे अनिर्बंध राज्य चालू आहे. आर्थिक अस्थैर्याचा झटका 2008 साली बसला. तेव्हा पाश्चिमात्य जगात अचंबा व्यक्त केला गेला. काही अर्थसंस्था आणि बँका यांचे प्रचंड नुकसान व तूट ही जणू समाजाची हानी आहे असे समजून आर्थिक संस्था व बँका सावरण्यात आल्या. ते रास्तही होते. अन्यथा जगभरची अर्थव्यवस्था कोलमडून पडली असती. ती दुर्दशा टाळली गेली. तरी त्या उपाययोजनेचे धक्के अनेक देशांना अजून बसत आहेत. त्यातही जे देश सावधपणे वागले ते गंभीर पेच उदभवण्यापासून बचावले आहेत. उदाहरणार्थ ग्रेट ब्रिटन. त्यांनी काटकसर व संयम हे धोरण अवलंबल्यामुळे तेथे पडझड खूप मोठी नाही. त्या उलट स्थिती आयर्लंड व ग्रीस यांची. तेथे उध्वस्तताच अनुभवाला येते.

       निदर्शने होतात हे खरेच, परंतु निदर्शकांकडे खुल्या बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही. मिश्र अर्थव्यवस्था आणि समाजवाद यांचे प्रयोग झाले. परंतु ते अपयशी ठरले. एक चीनचा मार्ग समोर दिसतो. चीनला आर्थिक भवितव्य आहे, परंतु तेथे स्वातंत्र्य गहाण ठेवावे लागते. कोणताही पर्याय नसताना केलेली निषेध–निदर्शने-आंदोलने अराजकाने संपतात असाही इतिहास आहे.

       काही लोक या घटनांकडे ‘एण्ड ऑफ कॅपिटॅलिझम’ म्हणून पाहतात. जागतिकीकरणानंतर सर्वत्र बाजारपेठ आणि भांडवलशाही यांचे राज्य सुरू झाले व समाजवाद संपुष्टात आला असे गेली दोन दशके समजले जात होते. परंतु 2008साली अमेरिकेतील अर्थव्यवस्था कोसळल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजला. गेले काही महिने युरोप अधिकाधिक गर्तेत जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मार्केटचा मंत्र चालणार नाही. अशी हाकाटी पिटली जाऊ लागली आहे. तथापी लॉर्ड मेघनाद शहा यांच्यासारखे लोक मात्र असे समजत नाहीत. त्यांनी त्यांच्या ‘इंडियन एक्स्प्रेस’मधील स्तंभात, हा भांडवलशाहीचा अंत नसून ‘द पार्टी इज ओव्हर’ असे म्हटले आहे. सध्या जगभर सर्वत्र या विषयावर चर्चा चालू आहे. आपल्याकडे मात्र दिवाळी येऊ घातल्याचे वातावरण आहे!

  (‘मिंट’वर आधारित)

  आत्महत्यांचे शहर

       बंगलोर हे आयटी शहर म्हणून आपल्याला माहीत आहे. नारायणमूर्ती, नंदन निलकेणी यांनी या शहराचा लौकिक जगभर नेला. परंतु बंगलोरविषयी नव्याने प्रसृत झालेली माहिती अस्वस्थ करणारी आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’ने (NCRB) बंगलोरला ‘आत्महत्यांसाठी प्रसिद्ध शहर’ ठरवले आहे. ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, एक लाख लोकसंख्येत कमाल आत्महत्येचे प्रमाण बंगलोरमध्ये दिसून येते. त्या शहरात 2009 साली 2167 आत्महत्या घडून आल्या व ही भारी संख्या 2010मध्येदेखील तशीच कायम आहे असे ब्युरोकडून कळते. मात्र ब्युरोने तपशील जाहीर केले नाहीत. भारतातल्या तीस मोठ्या शहरांमधील आत्महत्या विचारात घेतल्या तर त्यांपैकी सोळा टक्के आत्महत्या ह्या बंगलोरमध्ये घडत असतात. चिंतेची गोष्ट अशी की आत्महत्या करणार्‍यांपैकी जास्त मंडळी सोळा ते चाळीस या तरुण वयोगटात मोडतात.

       बंगलोरच्या तुलनेत 2009 साली मुंबईत 1051 तर दिल्लीत 1215 आत्महत्या घडून आल्या. तरी ही दोन्ही शहरे बंगलोरपेक्षा कितीतरी मोठी आहेत!

       बंगलोरमध्ये ‘सहाय’ ही हेल्पलाईन चालवणार्‍या अनिता ग्रेशस म्हणाल्या, की बंगलोरमध्ये तरुण-तरुणी देशभरातून अध्ययन व नोकरी या निमित्ताने येत असतात. त्यांना प्रश्न पडतो, की मैत्री कोणाशी करायची आणि विश्वास तरी कोणावर ठेवायचा? डॉक्टर सतीशचंद्र यांनी हीच मांडणी थोड्या वेगळ्या प्रकारे केली. ते म्हणाले, की बंगलोर सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या झपाट्याने बदलत आहे. इथे प्रत्येकजण यश मिळवण्यासाठी येतो आणि त्याला सर्वकाही भरपूर हवे असे वाटत असते. त्याला अपयश सहनच होत नाही. डॉ. मोहन इसाक यांनी बंगलोर आणि कोलकाता येथील आत्महत्यांचा अभ्यास चालवला आहे. ते म्हणाले, की बंगलोरमध्ये आत्महत्या गेली कित्येक वर्षे वर्षाला दोन हजारांहून अधिक होत असतात, तर कोलकात्यात दरवर्षी सुमारे दोनशे आत्महत्या होत असतात. ते म्हणतात, की याचे प्रमुख कारण कोलकात्याला आधुनिकीकरणाची बाधा अजून झालेली नाही!

  ‘इंडियन एक्स्प्रेस’वरून

       आपल्याकडचे विचारवंत अशोक राजवाडे यांनी पुढील आवाहन अनेक लोकांना इमेलने पाठवले आहे. ज्ञानदा देशपांडे यांनीही त्यांच्या ‘फेसबुक’वर ‘ऑक्युपाय दिवाळी’ असा उपरोधात्मक संदेश प्रसृत केला आहे.

       with the 'occupy wall street' movement all around especially in advanced capitalist countries, we see another initiative called ' occupy mainstream media ' which is worth noting. The opening line describes the process. it says:

       'since the 1990, concentration in mainstream media has accelerated with alarming rates, putting corporate interests above those of the people, stifling freedom of ex-pression and threatening the democratic process.'-  -ashok rajwade

       Occupy mainstream media Photograph

  Description : Since the 1990, concentration in mainstream media has accelerated with alarming rates, putting corporate interests above those of the people, stifling freedom of ex-pression and threatening the democratic process.

       What happened to Media Diversity? What happened to Freedom of the Press? And what happened to the Marketplace of Ideas?

       Since Bagdikian published his cl-assic book 'Media Monopoly' in …See more

  Mission : If you care about democracy, human diversity and freedom of choice, help us:

  1. Uncover and map media concentration in USA, Europe, Asia and elsewhere.

  2. Make linkages between board members, corporate interests, the media and even politicians.

  3. Monitor media bias and unprofessional practices

  4. Shame Media’s ‘uncitizenly’ behavior (not acting on behalf of Citizens as a true watchdog on money, power and politics).

  5. Roll back this process and empower Citizen Democracy.

  Join us! & Occupy Mainstream Media!

  B-302, Amisha Apartments, Baburao Ranade Marg, Dahisar West, Mumbai 400 068
  Tel: 022-28953612, 9930991851

  {jcomments on}

  About Post Author

  Previous articleअमृतमहोत्सवाच्या नावावर पैशांची उधळपट्टी
  Next articleतुंबडीवाल्यांचे गाव
  दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.