निलारजेपणाचा कळस

0
18

     जैतापूरचे आंदोलन पेटलेले असताना शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे कान्हा अभयारण्यात सफारीला गेले होते. यावर अनेक पक्ष आणि प्रसारमाध्यमांकडून टिकेची झोड उठवण्यात आली. याला उत्तर म्हणून, “जैतापूरचा पुळका लांबूनच पहातो आहे” असे उध्दव ठाकरेंनी केलेले विधान म्हणजे निलाजरपणाचा कळस आहे. आदोलन हिसंक वलणावर असताना अभयारण्यात मौज-मजा करण्यासाठी गेलेल्या उध्दव ठाकरेंनी या विधानात ‘आपण कुठे होतो?’ याचा उल्लेखच केलेला नाही. त्यांनी जनतेला एवढे मुर्ख समजू नये.

     दिनांक 21 एप्रिल 2011 च्या लोकसत्तेत ‘शहाणपणाचा अभाव’ या शिर्षकाखाली अप्रतिम आणि समतोल अग्रलेख प्रसिध्द झाला आहे. शिवसेनेने जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला असलेला आपला विरोध अद्याप स्पष्ट केलेला नाही. राज्याला वीजेची गरज असतानाही या प्रकल्पाला विरोध करणार्‍या उध्दव ठाकरेंकडे एखादा वेगळा पर्याय आहे का? अशी कोपरखळीही मारण्यात आली आहे.

– अशोक जैन
पत्रकार – लेखक

दिनांक – 21/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleआता अण्णा काय करणार?
Next articleभ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.