नायपॉल यांचे वक्तव्य ‘पोलिटिकल’

0
19

शिरीष देशपांडे

      नोबेलविजेते  व्ही.एस.नायपॉल यांनी आपल्या तोडीची एकही महिला साहित्यिक नसल्याचे वक्‍तव्‍य केले आहे. महिला भावूक असतात, त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित असतो, त्याच गोष्टी त्यांच्या लिखाणातही उतरतात असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

शिरीष देशपांडे

     नोबेलविजेते  व्ही.एस.नायपॉल यांनी आपल्या तोडीची एकही महिला साहित्यिक नसल्याचे वक्‍तव्‍य केले आहे. महिला भावूक असतात, त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित असतो, त्याच गोष्टी त्यांच्या लिखाणातही उतरतात असे त्‍यांनी म्‍हटले आहे. या संदर्भात रविंद्रनाथ टागोर यांचे ‘पोस्‍टमास्‍तर’ पुस्‍तकातील वाक्‍य आठवले. स्‍त्रीचे अंतरंग काय आहे हे केवळ स्‍त्री सांगू शकते असे म्‍हणत त्‍यांनीही हात टेकले आहेत. या दोन्‍ही व्‍यक्‍तींच्‍या मते, स्‍त्रीच्‍या ह्रदयाचे मार्ग अनाकलनीय असतात. मुळात या लेखकांनी एवढे हतप्रभ होण्‍याची गरज नाही. जर लेखक संवेदनशील असेल तर त्‍याला स्‍त्रीच्‍या अंतरंगाचा वेध घेता येणे शक्‍य आहे आणि जर तो चांगला लेखक असेल तर त्‍याला ती गोष्‍ट चांगल्‍या पद्धतीने मांडताही येईल. स्‍वतः रविंद्रनाथ टागोरांनी आपल्‍या लेखनातून कुसुमसारख्‍या स्‍त्री व्‍यक्तिरेखा चांगल्‍या प्रकारे चितारल्‍या आहेत. तसेच, अशा अनेक लेखिका आहेत, की ज्‍यांच्‍या लिखाणामुळे पुढील पिढ्या बदलून गेल्‍या आहेत. जर लेखक संवेदनशील असेल, तर त्‍याला मानवी मनच काय, तर विश्‍वमनही उलगडून दाखवता येणे शक्‍य असते. त्‍यामुळे नायपॉल यांचे हे वक्‍तव्‍य पोलिटिकल वाटते.

शिरीष देशपांडे
पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख,
S. N. D. T. विद्यापीठ.

दिनांक – 03.06.2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleसाठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये!
Next articleनव्वदीच्या ‘तरूणांचे’ टेबल टेनिस!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.