धूर्त आणि क्रूर

0
208

–  डॉ. द. बा. देवल

  रामदेवबाबा यांच्‍याकडून करण्‍यात आलेल्‍या उपोषणादरम्‍यान, मांडवात अनेक आबालवृद्ध झोपलेले असताना पोलिसांकडून बळजबरीने कारवाई करण्‍यात आली. त्‍या वेळी कपिल सिब्‍बल यांनी त्‍या घटनेचे स्‍पष्‍टीकरण करताना, ही कारवाई करण्‍याचा निर्णय पोलिसांचा होता असे सांगत, या प्रकाराची जबाबदारी पोलिसांवर टाकली! या वेळेस तर ते आधीपासूनच या प्रकरणाची जबाबदारी पोलिस खात्‍याकडे असल्‍याचे सूचित करत आहेत. अण्‍णांच्‍या होऊ घातलेल्‍या उपोषणाच्‍या पार्श्‍वभूमीवर ही अत्‍यंत धूर्त आणि क्रूर चाल वाटते. अण्‍णा उपोषणाला बसले आणि त्‍यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला तर पोलिसांकडून या उपोषणावरही कारवाई करण्‍यात येण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. असे घडल्‍यास सिब्‍बल यांना पुन्‍हा एकदा पोलिसांवर जबाबदारी झटकून मोकळे होता येईल. त्‍याचीच ही पूर्वतयारी वाटते.


–  डॉ. द. बा. देवल

     कपिल सिब्‍बल यांना अण्‍णांच्‍या उपोषणाबद्दल पत्रकारांकडून प्रश्‍न विचारले गेले असता, ‘या उपोषणाला परवानगी पोलिस देणार आहेत, कॉंग्रेस नाही’ असे उत्‍तर त्‍यांच्‍याकडून देण्‍यात आले. यावरून काही आठवड्यांपूर्वी घडलेली घटना आठवली. रामदेवबाबा यांच्‍याकडून करण्‍यात आलेल्‍या उपोषणादरम्‍यान, मांडवात अनेक आबालवृद्ध झोपलेले असताना पोलिसांकडून बळजबरीने कारवाई करण्‍यात आली. त्‍या वेळी कपिल सिब्‍बल यांनी त्‍या घटनेचे स्‍पष्‍टीकरण करताना, ही कारवाई करण्‍याचा निर्णय पोलिसांचा होता असे सांगत, या प्रकाराची जबाबदारी पोलिसांवर टाकली! या वेळेस तर ते आधीपासूनच या प्रकरणाची जबाबदारी पोलिस खात्‍याकडे असल्‍याचे सूचित करत आहेत. अण्‍णांच्‍या होऊ घातलेल्‍या उपोषणाच्‍या पार्श्‍वभूमीवर ही अत्‍यंत धूर्त आणि क्रूर चाल वाटते. अण्‍णा उपोषणाला बसले आणि त्‍यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळाला तर पोलिसांकडून या उपोषणावरही कारवाई करण्‍यात येण्‍याची शक्‍यता नाकारता येणार नाही. असे घडल्‍यास सिब्‍बल यांना पुन्‍हा एकदा पोलिसांवर जबाबदारी झटकून मोकळे होता येईल. त्‍याचीच ही पूर्वतयारी वाटते.

     मला या उपोषणासंबंधी एक सूचना करावीशी वाटते. मेधा पाटकरांकडून एवढी उपोषणे करण्‍यात आल्‍यानंतरही त्‍यांचा काहीच परिणाम दिसत नाही. उपोषणे करण्‍याने काहीही साध्‍य होत नाही. जोपर्यंत राजकारणात आपली माणसे कार्यान्वित होत नाहीत, तोपर्यंत वर्तमान परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही. लवासाविरुद्ध कितीही आरडाओरड झाली तरी लवासा आहे तिथेच राहणार आणि वाढणार. अण्‍णांनी जयप्रकाश नारायणांसारखी चूक करू नये. आम्‍हाला मत देण्‍याजोगा एकही पक्ष उपलब्‍ध नाही. अण्‍णांनी तो पर्याय निर्माण करून द्यावा. यासाठी अण्‍णांनी राजकीय पक्ष स्‍थापन करावा. यामध्‍ये नवीन आणि को-या माणसांचा समावेश असावा. राजकारण एवढ्या गलिच्‍छ पातळीला पोचले आहे की अण्‍णांच्‍या या पक्षाला देशभरातून जोरदार प्रतिसाद तर मिळेलच, पण जनता ओंजळीने भरभरून मतेही देईल!

डॉ. द. बा. देवल, मोबाईल – 9167668188

मु पो. किहीम-जिराड, ता. अलिबाग, जि. रायगड,

{jcomments on}

About Post Author

Previous articleडॉल्बीचा दणदणाट
Next articleमृणालिनी-उमा ह्यांची मायेची सावली
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.