दोन बातम्या

0
27
  1.      1-7-2011 – लोकसत्‍ता – पान क्र. 1 – ‘‘नीरज ग्रोव्‍हर हत्‍याकांड प्रकरणात जेरोमला न्‍यायालयाने सदोष मनुष्‍यवधासाठी (खरं म्‍हणजे ‘हत्‍ये’साठी!) दहा वर्षे सक्‍तमजुरी आणि दोन गुन्‍ह्यांसाठी प्रत्‍येकी पन्नास हजार रुपयांचा दंड सुनावला. तर नीरजच्‍या मृतदेहाची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी मदत केल्‍याबद्दल मारियाला तीन वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला.’’
  2.      3-7-2011 – टाइम्‍स ऑफ इंडिया – पान क्र. 1 – ‘‘… जनावरांशी क्रूरपणे वागणा-यांना एक …..
  1. 1)     1-7-2011 – लोकसत्‍ता – पान क्र. 1 – ‘‘नीरज ग्रोव्‍हर हत्‍याकांड प्रकरणात जेरोमला न्‍यायालयाने सदोष मनुष्‍यवधासाठी (खरं म्‍हणजे ‘हत्‍ये’साठी!) दहा वर्षे सक्‍तमजुरी आणि दोन गुन्‍ह्यांसाठी प्रत्‍येकी पन्नास हजार रुपयांचा दंड सुनावला. तर नीरजच्‍या मृतदेहाची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी मदत केल्‍याबद्दल मारियाला तीन वर्षांची सक्‍तमजुरीची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला.’’
  2. 2)     3-7-2011 – टाइम्‍स ऑफ इंडिया – पान क्र. 1 – ‘‘… जनावरांशी क्रूरपणे वागणा-यांना एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा पाच वर्षांच्‍या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली जाईल, लोकसभेत लवकरच सादर होणारे नवे बिल!’’

     लागोपाठ आलेल्‍या या दोन बातम्‍या. मानवहत्‍येबद्दल आणि मृतदेहाचे शंभराहून अधिक तुकडे केल्‍याबद्दल       झालेली शिक्षा, तीन आणि दहा वर्षे आणि दंड पन्नास हजार ते   एक लाख रुपये. मात्र जनावरांशी क्रूरपणे       वागण्‍याबद्दल होऊ शकणारी सजा पाच वर्षे किंवा दंड एक कोटी रुपये. काय वाटते या दोन बातम्‍या एकत्र       वाचून? कायदे       करणारी माणसे आणि न्‍याय करणारीही माणसेच! माणसाच्‍या दृष्‍टीने माणसाची किंमत       जनावरांच्‍या तुलनेत किती कमी असावी, निदान आपल्‍याकडे तरी, याचे हे उत्‍तम       उदाहरण! …की जनावरप्रेमाचा अतिरेक?

     जाता जाता… वर्षानुवर्षे ज्‍या माणसांना जनावरांसारखे वागवले जाते, त्‍या माणसांच्‍या   हत्‍येनंतर तरी त्‍यांची किंमत या नव्‍या कायद्यामुळे वाढेल का?

जयंत धर्माधिकारी – भ्रमणध्वनी – 9820039694, इमेल- suhita.thatte@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleअसंतोषाचे आंदोलन
Next articleवसाहतवादी वृत्ती
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.