‘थिंक महाराष्‍ट्र’चा सांस्‍कृतिक समारोह – उत्‍सव माणूसपणाचा!

0
25

'थिंक महाराष्‍ट्र'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेच्‍या अखेरच्‍या दिवशी, ६ फेब्रुवारी रोजी नाशिक शहरात सांस्‍कृतिक समारोह योजण्‍यात आला आहे. तो कार्यक्रम गंगापूर रोड येथील शंकराचार्य न्‍यास सभागृहात सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. तुम्‍हा सर्वांना त्‍याचे आग्रहाचे निमंत्रण!

'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक माहितीसंकलनाची अभूतपूर्व चळवळ
'ग्रंथाली', 'ज्यो‍ती बुक स्टोर्स' आणि 'शंकराचार्य न्यास' यांच्या संयुक्‍त विद्यमाने

उत्सव माणूसपणाचा!

मानवाच्या अंतःजागृतीचे जिवंत नमुने तुमच्या भेटीला

दिनांक ६ फेब्रुवारी २०१६ रोजी

सायंकाळी ५ ते ९ वाजता

शंकराचार्य न्यास सभागृह, गंगापूर रोड, नाशिक

सायंकाळी ५ वाजता

'थिंक महाराष्ट्र'च्या संकल्पनेचे सादरीकरण प्रत्यक्ष माणसांच्या संवादातून
पडद्यावरुन आणि प्रत्यक्ष व्यासपीठावरुनही!
सहभाग – डॉ. उमेश मुंडल्ये आणि सुजाता रायकर. मुलाखतकार – अपर्णा वेलणकर
मुलाखतकार – मुक्‍ता चैतन्‍य

सायंकाळी ७.१५ वाजता

'ग्रंथाली'च्या‍ तीन पुस्तकांचे प्रकाशन
आणि
'अॅपली ग्रंथाली' अॅपचे आणि टॅबचे सादरीकरण – प्रशांत क-हाडे

सायंकाळी ७.३० वाजता

गझलसंध्या  – 'एका उन्हाची कैफियत'
सादरकर्ते – गायक संजीव चिम्मलगी आणि कवी चंद्रशेखर सानेकर

प्रवास एका कल्पनेचा अवघ्या सहा वर्षांचा ।
सोबत जपला आहे ठेवा कर्तबगार माणसांचा ।।
मानवाच्या अंतःजागृतीचे जिवंत नमुनेच ते ।
यावे या सोहळ्यास जेथे उत्सव माणूसपणाचा असे ।।

 

सुजाता रायकर या मुंबईत थॅलिसिमिया या दुर्मिळ रोगाने ग्रस्त असलेल्या लहान मुलांसाठी काम करतात. तान्ह्या मुलांमध्ये तो रोग जन्म‍जात असल्याने त्यांना त्या वयापासूनच दर पंधरा दिवसांनी रक्त द्यावे लागते. त्यांची ती स्थिती आयुष्यभर तशीच राहते. सतत रक्त देणे आणि औषधे यांचा खर्च मोठा असल्याने अनेक कुटुंबे पैशांअभावी मोडकळीला आलेली रायकर यांनी पाहिली. त्यांनी थॅलिसिमियाग्रस्त पासष्ट मुलांच्या औषधोपचाराची जबाबदारी उचलली आहे.

डॉ. उमेश मुंडल्ये हे निसर्गाचा वारसा असलेल्या देवरायांचे अभ्यासक. त्यांनी महाराष्ट्रातील ३,७८३ देवरायांची नोंद करताना १,४५० देवरायांना प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी त्या भटकंतीत १,०६८ वनस्पतींची ओळख पटवली. मुंडल्ये‍ वनस्पतीशास्त्रज्ञ. मात्र ते पुस्तकांपेक्षा प्रत्यक्ष निसर्गात जास्त रमतात. म्हणूनच त्यांचे स्नेही त्यांचा उल्लेख 'फिल्डवरचा बॉटनीस्ट' असा करतात.

कार्यक्रमाच्या स्थळी 'थिंक महाराष्ट्र'चे 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' हे ३५० रु. किमतीचे पुस्तक सवलतीच्या दरात २७५ रुपयांना उपलब्ध असेल. तसेच 'ग्रंथाली' प्रकाशनाची पुस्तके सवलतीच्या दरात विकत घेता येतील.

थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
info@thinkmaharashtra.com
९०२९५५७७६७/ ०२२२४१८३७१०/ ०२२२४१३१००९
२२, पहिला मजला, मनुबर मॅन्शन, १९३ डॉ. आंबेडकर रोड, दादर (पूर्व), मुंबई – ४०० ०१४

About Post Author