‘थिंक महाराष्ट्र’च्‍या सहाव्‍या वर्धापनदिनानिमित्‍त – ‘उत्‍सव चांगुलपणाचा’

    0
    20
    carasole

    सप्रेम नमस्‍कार,

    महाराष्‍ट्राच्‍या सामाजिक आणि सांस्‍कृतिक माहितीसंकलनाची चळवळ उभारणा-या ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचा सहावा वर्धापनदिन ‘उत्‍सव चांगुलपणाचा’ या कार्यक्रमाने ठाण्‍यात साजरा होत आहे. त्‍या कार्यक्रमात संशोधन, कर्तृत्व आणि समाजसेवा अशा तीन गुणांचे दर्शन घडवणा-या विशेष व्‍यक्‍तींचा रसिकांना परिचय करून दिला जाणार आहे. कार्यक्रम येत्‍या शनिवारी, १९ मार्च २०१६ रोजी सायंकाळी ६ वाजता ठाण्‍याच्‍या नौपाडा येथील सहयोग मंदिराच्‍या दुस-या मजल्‍यावरील सभागृहात संपन्‍न होईल.

    ‘उत्‍सव चांगुलपणाचा’ या कार्यक्रमात महाराष्‍ट्रातील चौदाशे देवरायांचा अभ्‍यास करणारे वनस्‍पतीशास्‍त्रज्ञ डॉ. उमेश मुंडल्‍ये, थॅलिसिमिया या दुर्मिळ रोगाने ग्रस्‍त असलेल्‍या लहान मुलांना आधार देण्‍याचे काम करणा-या सुजाता रायकर आणि अडीच हजार शेतक-यांच्‍या सहभागातून कोट्यावधींचा टर्नओव्‍हर असणारी कंपनी उभारणारे नाशिकचे शेतकरी विलास शिंदे यांच्या मुलाखती घेण्‍यात येणार आहेत. मुलाखतींपूर्वी त्‍या तिन्‍ही व्‍यक्‍तींच्‍या कर्तृत्‍वाचे दर्शन घडवणा-या छोटेखानी फिल्‍मस् पडद्यावर दाखवण्‍यात येतील. ठाण्‍याचे किरण भिडे त्‍या तीन आगळ्या वेगळ्या व्‍यक्‍तींशी संवाद साधणार आहेत.

    कार्यक्रमापूर्वी ५.३० ते ६.०० या वेळात अल्‍पोपहार आणि चहापानाची व्‍यवस्‍था आहे. कार्यक्रमस्‍थळी ‘थिंक महाराष्‍ट्र’ वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन असलेले ‘महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित’ हे ३५० रु. किमतीचे पुस्‍तक सवलतीच्‍या दरात २७५ रुपयांना उपलब्ध असेल.​​

    तुम्‍ही त्‍या कार्यक्रमास जरूर यावे. धन्‍यवाद.  ​

    – टिम ‘थिंक महाराष्‍ट्र’

    About Post Author

    Previous articleतरंग आणि बारापाचाची देवस्की
    Next articleसेलिब्रेश्नच्या नॉव्हेल आयडीया
    किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767