तरूणाईला आवाहन – राहुलप्रणीत की हजारेप्रणीत?

0
30

     राहुल गांधीने देशात वृद्ध विरूद्ध तरूण असे काहीसे चित्र उभे केले आहे. राहुलचे देशातील तरूणांना आवाहन असे, की तुम्‍ही राजकारणात सामिल होवून कॉंग्रेसला पाठींबा द्या. मात्र त्‍यामध्‍ये कॉंग्रेसमधील घराणेशाहीबद्दल अवाक्षरही उच्‍चारण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे हे आवाहन केवळ ‘निवडणुकांपुरते’ मर्यादीत असल्‍याचे वाटते. तर दुस-या बाजूला अण्‍णा हजारे यांच्‍या भ्रष्‍टाचारविरोधातील आंदोलनाला देशभरातून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला. अण्‍णांकडून या प्रकारे तरूणांना आवाहन करण्‍यात आले नव्‍हते. अण्‍णांनी केवळ भ्रष्‍टाचाराविरूद्ध उभे राहण्‍याचे आवाहन केले होते आणि ते जनतेस अपील झाले. त्‍यांना तरूणवर्गाकडून जोरदार पाठींबा दिला गेला. आता तरूणवर्गासमोर राहुल गांधीप्रणीत आणि अण्‍णा हजारे प्रणीत अशी दोन आवाहने आहेत. त्‍यातील कोणते आवाहन तरूणाईला अपिल होईल?

     अण्‍णांच्‍या आंदोलनानंतर त्‍यावर कसे रिअॅक्‍ट व्‍हावे, याचा कुणालाच अंदाज नाही असे दिसते. भ्रष्‍टाचारामुळे ‘याबद्दल कुणीच काही करत नाही’ या प्रकारची जनतेच्‍या मनात जी वषिण्‍णता होती, त्‍यातून अण्‍णांना प्रचंड पाठींबा मिळाला. तसा तो अकल्पित होता. त्‍यामुळे राजकारण्‍यांपासून मेधा पाटकरांपर्यंत या आंदोलनाच्‍या यशाला कसे सामोरे जावे, ते कसे स्‍वीकारावे हे कुणालाच ठावूक नाही, असे वाटते. त्‍यामुळे एकाच वेळी बचावात्‍मक आणि आक्रमक अशा दोन्‍ही अंगांनी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या जात असल्‍याचे दिसून येते.

शरद देशपांडे
पुणे विद्यापिठ,
निवृत्त तत्त्वज्ञान विभागप्रमुख

{jcomments on}

About Post Author

Previous articleलोकपाल विधेयकाबद्दल नकारात्मक सूर आततायी
Next articleगांगल यांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.