जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाची रचना समजून घेणे आवश्यक

0
23

 जैतापूर प्रकल्‍पाला गावक-यांकडून आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध जपानच्‍या भूकंपात फुकूशिमाची अणूभट्टी उद्ध्‍वस्‍त झाल्‍यानंतर अधिकच तीव्र बनला.


जैतापूर प्रकल्‍पाला गावक-यांकडून आणि शिवसेनेकडून होत असलेला विरोध जपानच्‍या भूकंपात फुकूशिमाची अणूभट्टी उद्ध्‍वस्‍त झाल्‍यानंतर अधिकच तीव्र बनला. या गोष्‍टीची पुनरावृत्‍ती जैतापूरमध्‍येही होईल, असा आरोप आंदोलकांकडून करण्‍यात येवू लागला आहे. या पार्श्‍वभूमीवर दिनांक 28 एप्रिल 2011 च्‍या लोकसत्‍तेच्‍या अग्रलेखात जैतापूर आणि फुकूशिमाच्‍या अणुभट्टीतील रचनेत असलेला फरक स्‍पष्‍ट करून सांगण्‍यात आला आहे.

 फुकूशिमाच्‍या अणुभट्ट्या परस्‍परांशी जोडलेल्‍या होत्‍या, मात्र जैतापूर येथे तयार होणा-या अणुभट्ट्या परस्‍परांशी पूर्णपणे जोडलेल्‍या नसतील. जपानच्‍या अणुभट्ट्यांमुळे घडलेला अनर्थ इथेही घडेल असे म्‍हणण्‍याआधी आंदोलकांपैकी कुणीच या दोन्‍ही अणुभट्ट्यांच्‍या रचनेचा अभ्‍यास केला असल्‍याचे दिसत नाही.

अशोक जैन
पत्रकार-लेखक

दिनांक – 28/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleवीज वितरणाच्या विरोधाभासात जैतापूर प्रकल्पाचा हट्ट अनाठायी
Next articleमाझी साडेतीनशे नातवंडे
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.