जलतज्ज्ञ राजेंद्रसिंग यांची काही उद्घोषिते

-rajendrasingh

    खरे पाहू गेल्यास, दोनशे मिलिमीटर पाऊससुद्धा सर्वसाधारण जीवन जगण्यासाठी पुरेसा आहे. महाराष्ट्रात तर त्या मानाने भरपूर पाऊस पडतो. इतके असूनसुद्धा वारंवार दुष्काळ लांछनास्पद आहेत.

    महाराष्ट्रातील पडत असलेले दुष्काळ हे नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहेत. पुरेसा पाऊस पडत असूनसुद्धा त्या पावसाचे योग्य संवर्धन न केल्यामुळे अशा महाराष्ट्राला दुष्काळांना तोंड सारखे द्यावे लागत आहे.

    महाराष्ट्रातील जलसाठ्यांवर सातत्याने आक्रमण होत आहेत. सर्व जलसाठ्यांची योग्य नोंद ठेवून त्यांच्या सीमा रेखांकित करण्याची नितांत गरज आहे. तसे केले नाही तर कित्येक जलसाठे काळाच्या ओघात गायब झालेले आढळतील.

•    महाराष्ट्राचे जलधोरण हे जनतेला हितकारी नसून कंत्राटदारांच्या नफ्याला बळकटी देणारे आहे. त्यामुळे सर्वसामान्य समाज पाण्यापासून वंचित आहे.

    महाराष्ट्रातील ऊस हे पीक घेण्याचा अट्टाहास अनाकलनीय आहे. ते एकटेच पीक विविध धरणांद्वारे जमा केलेले पाणी वापरून टाकते आणि बाकीच्या पिकांकडे साहजिकच दुर्लक्ष होत आहे.

•    सध्याचेच धोरण राबवण्याचा प्रयत्न केला तर लवकरच महाराष्ट्राचे वाळवंटात रूपांतरण झाल्यास राहणार नाही.

    महाराष्ट्रातील पारंपरिक जलस्रोतांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे परंपरागत जलसाठे नष्ट होत चालले आहेत व त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात पाण्याचे मोठे दुर्भीक्ष्य जाणवत आहे.

•    महाराष्ट्रातील चौऱ्याऐंशी टक्के शेती ही जमिनीतील पाणी उपशावर आधारित आहे. तो भूजल उपसा महाराष्ट्राला दीर्घकाळात संकटाकडे नेल्याशिवाय राहणार नाही.

•    पाण्याबद्दल समाजात जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी जलसाक्षरता आंदोलन मोठ्या प्रमाणात राबवण्याची गरज आहे. विविध माध्यमांचा वापर करून जलसाक्षर समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे.

हे ही लेख वाचा- 
शाश्वत विकासासाठी, पाण्याची शाश्वती शक्य आहे का?
देशहितासाठी जनतेचा जाहीरनामा

About Post Author

2 COMMENTS

  1. उसाच्या पाण्यासाठी वेगळा…
    उसाच्या पाण्यासाठी वेगळा टॅक्स लावावा.

Comments are closed.