जनता गाढव आहे का?

0
85

–  संजय भास्कर जोशी

  नरहर कुरुंदकरांचा जो प्रश्न गांधीजींच्या आंदोलनाबाबत होता; आणि आजही अनेक तो विचारतात, की आंदोलनाला पाठिंबा देणारी एवढी जनता गाढ़व आहे का? त्याचे उत्तर असे आहे, “होय, जनता गाढ़व असेलही, किंवा तुम्ही तिला मुकी मेंढरे म्हणू शकता,  पण मेंढरांना, गाढवांना सन्मानाने, स्वच्छ आणि सुखाने जगू द्यायचा हक्क नाकारण्याचा अधिकार बलिष्ठ सिंहाला किंवा लबाड कोल्ह्याला नाही. बुद्धी, सामर्थ्य आणि शौर्य हे गुण घाउक स्वरूपात वाटले जात नसतात. परेटोचा ८०:२०  नियम आठवा. स्वच्छ सुखी जगण्याचा हक्क अस्तित्वानेच मिळावा, गुणसमुच्चयाने  नाही. बाकी आंदोलनाचे टायमिंग, मार्ग  वगैरे मुद्दे योग्य लोक चर्चेला घेतील, घेतही आहेत. फक्त आंदोलने केवळ बुद्धीवर अन शौर्यावर चालत नसतात इतकेच लक्षात घ्यावे.

–  संजय भास्कर जोशी

     नरहर कुरुंदकरांचा जो प्रश्न गांधीजींच्या आंदोलनाबाबत होता; आणि आजही अनेक तो विचारतात, की आंदोलनाला पाठिंबा देणारी एवढी जनता गाढ़व आहे का?
     त्याचे उत्तर असे आहे, “होय, जनता गाढ़व असेलही, किंवा तुम्ही तिला मुकी मेंढरे म्हणू शकता,   पण मेंढरांना, गाढवांना सन्मानाने, स्वच्छ आणि सुखाने जगू द्यायचा हक्क नाकारण्याचा अधिकार बलिष्ठ सिंहाला किंवा लबाड कोल्ह्याला नाही. बुद्धी, सामर्थ्य आणि शौर्य हे गुण घाउक स्वरूपात वाटले जात नसतात. परेटोचा ८०:२०  नियम आठवा. स्वच्छ सुखी जगण्याचा हक्क अस्तित्वानेच मिळावा, गुणसमुच्चयाने  नाही. बाकी आंदोलनाचे टायमिंग, मार्ग  वगैरे मुद्दे योग्य लोक चर्चेला घेतील, घेतही आहेत. फक्त आंदोलने केवळ बुद्धीवर अन शौर्यावर चालत नसतात इतकेच लक्षात घ्यावे.

     तूर्तास बाबा आमटे यांचे एक अप्रतिम चिंतन आठवते ते सांगतो –

     क्रांती ही सीतेसारखी असते
     ती वनवासी रामाची साथ करते
     पण तोच मर्यादा पुरुषोत्तम
     जेव्हा राज्यारूढ़ होतो
     तेव्हा ती पृथ्वीच्या पोटात गड़प होते….

संजय भास्कर जोशी, भ्रमणध्वनी – 09822003411, इमेल – sanjaybhaskarj@gmail.com

संजय भास्‍कर जोशी यांची इतर मल्लिनाथी

‘टिंबख्तू’: एक विदारक सत्य!

शिक्षा आणि गुन्हा

बाब अगदीच साधी!

‘लोकराज्‍य’चा चमत्‍कार!

{jcomments on}

About Post Author

Previous articleबाळशास्त्री जांभेकर
Next articleसुधीर नांदगावकर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.