खाणकामगारांची चिंता शासनाला, ना खाणमालकांना!

0
17

     ‘समता’ नावाच्या संस्थेकडून देशातील 8 राज्यांमधील विविध खाणी, तेथील खाणकामगार, स्त्रीया आणि त्याची मुले यांचा नुकताच अभ्यास करण्यात आला. यातून हाती आलेले निष्कर्ष भयानक आहेत.

     अत्यंत हलाखीच्या स्थितीत जगत असलेले हे कामगार आरोग्य आणि शिक्षणासोबत स्वच्छ पाणी आणि निवार्‍यासारख्या मूलभूत गरजांपासूनही वंचित आहेत. माणूसकीला लाज आणणारे त्यांचे हे जगणे पाहून मनात चीड दाटून येते. शासन खाणींचे परवाने देत असले तरी या अभ्यासानुसार एकट्या महाराष्ट्रातील 40 टक्के खाणी, विनापरवाना, अर्थात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे समजते. दगड फोडणे, सुरूंग लावणे यांसारखी कष्टाची आणि धोक्याची कामे करणार्‍या या कामगारांना खाणमालक कोणत्याही प्रकारचे संरक्षण पुरवत नाहीत. एका मुलाला सर्पदंश झाला असता, त्याच्या आईने खाणमालकाकडे उपचारासाठी 100 रूपये मागितले. मात्र मालकाने पैसे देण्यास नकार दिला. अशा बिकट परिस्थितीत जगणार्‍या या खाणकामगारांच्या मुलांची तर अक्षम्य हेळसांड होत असते. या मुलांना लसीकरण, शुध्द पाणी, आरोग्य, शिक्षण अशा सगळ्याच गोष्टींपासून वंचित रहावे लागते. त्यांची जबाबदारी ना शासन घेते ना खाणमालक! या भागांमध्ये साधी अंगणवाडीही नसते. मागणी केल्यावर ‘येथे एवढी लोकसंख्या हवी’ वर्गेरे नियमांवर शासन बोट ठेवते. या नियमांच्या कचाट्यात ही मुले आणि त्यांची भविष्ये अडकली आहेत.

– विजया चौहान
शिक्षण हक्क समन्वय समिती
आणि मराठी अभ्यास केंद्र.

दिनांक – 21/04/2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleभ्रष्टाचाराविरूध्द बोलणा-यांकडे नैतिक पायाचा अभाव
Next articleमराठी साहित्यांत गुप्त्हेरकथांचा ओघ आटलेला
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.