ऑर्गन निर्माते उमाशंकर दाते

15
45
carasole

‘ऑर्गन’ हे पाश्चात्य संगीतामध्ये सर्वात गुंतागुंतीचे आणि महत्वाचे एक वाद्य. दिसायला सर्वसाधारण आपल्या पायपेटीसारखेच, पण तंत्रज्ञान आणि बांधणी वेगळी असल्याने अधिक नादमाधुर्य निर्माण करणारे. इंग्रज राजवटीत भारतातील चर्चमध्ये वाजवण्यात येणाऱ्या या सुरेल वाद्याचा बालगंधर्व, गोविंदराव टेंबे यांसारख्या दिग्गजांनी त्‍यांच्‍या संगीत नाटकांमध्ये वापर करून त्याला न्याय दिला. त्‍या वाद्यानेही स्‍वतःच्‍या सुरेल स्‍वरांच्‍या साथीने भारतीय संगीताचा अप्रतिम नमुना सादर केला. त्‍या वाद्याच्या जादुई आविष्काराने जगाला भुरळ घातली होती. परंतु इलेक्ट्रॉनिक्सच्या क्रांतीमुळे त्याचे उत्पादन पूर्णपणे थांबले. त्याच्या निर्मितीचे तंत्र आणि वाजवण्याची कला नवीन पिढीला अवगत नसल्यामुळे वापरात असलेले ऑर्गनही अडगळीत जाऊन पडले. ऑर्गन काळाच्या ओघात नामशेष होऊ लागले. मात्र त्‍या गुणी वाद्याचे असे लुप्त होणे कोकणातील खेडेगावात राहणा-या एका सुज्ञ संगीतकाराला मान्य नव्हते. त्याने ऑर्गनच्या नवनिर्मितीचा ध्यास घेतला. त्या अवलियाचे नाव आहे उमाशंकर उर्फ बाळ दाते.

दाते हे कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍याचे. ते आडिवरे या लहान गावात ते संगीत शिक्षक म्‍हणून काम करतात. दाते बारावीला असेपर्यंत त्‍यांचा संगीताशी काहीही संबंध नव्हता. त्‍यांनी गावातील मंदिरात प्रसिद्ध हार्मोनिअमवादक आणि गायक उदय गोखले यांचे भजन ऐकले आणि त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. परंतु लहान गाव आणि साधनांचा अभाव यामुळे त्यांना संगीताचा गुरु भेटेना. दाते यांनी संगीत मार्गदर्शक कॅसेट्स आणि पुस्तके यांनाच गुरु मानले आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्‍यांनी आकाशवाणीमध्ये ऑडिशनही दिली. त्‍यांचा हळुहळू संगीत क्षेत्रातील दर्दी लोकांशी परिचय वाढत गेला. परंतु दाते यांना कौटुंबिक परिस्थितीचा विचार करता संगीतासाठी पूर्णवेळ देणे शक्य नव्हते. ते पोटापाण्यासाठी खासगी वाहतूकी, केबल टि.व्‍ही. असे व्यवसाय करत राहिले. त्‍यांना राजापूरच्‍या शाळेमध्‍ये संगीत शिक्षकाची नोकरी 2010 साली चालून आली. याचदरम्यान त्‍यांनी एक संगीत नाटक पाहिले. तेथे त्‍यांना ऑर्गन या वाद्याची भुरळ पडली आणि ऑर्गनसोबत त्यांना आयुष्याचाही सूर गवसला. ते त्या वाद्याच्‍या सुरांच्या प्रेमात पडले. त्‍यांची ते दुर्मिळ वाद्य मिळवण्यासाठी धडपड सुरू झाली. मात्र त्यांना ते वाद्य निर्माण होत नसल्‍याचे समजले. त्या शोधकार्यात त्यांना जुन्या ऑर्गनचा साऊंड बॉक्स मिळाला. दाते यांना तंत्रज्ञानाची आवड होतीच. त्‍यांची जिज्ञासूवृत्ती त्‍यांना शांत बसू देईना. त्‍यांनी ते दुर्मिळ वाद्य भारतात तयार करण्‍याचा संकल्प केला आणि त्‍यांचे त्या विषयातील संशोधन सुरु झाले.

दाते यांनी अनेक अडचणींवर मात करत विविध पुस्तके, व्‍हीडिओ मिळवले. ऑर्गन तयार करण्‍याचे तंत्र बारकाईने समजून घेतले. त्‍याकरता त्‍यांनी दहा वर्षे खर्ची घातली. अखेर दाते यांनी 2013 साली पहिला ऑर्गन तयार केला. त्‍यावेळी त्‍या ऑर्गनचे वजन पस्तीस ते चाळीस किलो होते. तेवढ्या वजनाचे ते वाद्य प्रवासात ने-आण करणे अवघड होते. मग दाते यांनी वाद्याच्‍या बनावटीत सुधारणा करत त्याचे वजन अठरा किलोपर्यंत कमी केले. दाते यांनी आतापर्यंत अठ्ठेचाळीस ऑर्गन तयार केले आहे. तसेच अनेक जुन्या ऑर्गन्सची पुनर्बांधणी केली आहे. त्‍यांनी ऑर्गनबाबत संशोधन करून ठराविक स्वर सप्तक निवडण्यासाठी हलता कीबोर्ड (shiftable keyboard) तयार केला आहे. त्याचबरोबर त्‍यांनी घडी करता येण्याजोगा ऑर्गन तयार केला आहे.

ऑर्गन हे वाद्य भारतीय हार्मोनियमशी साधर्म्‍य साधणारे आहे. ऑर्गनचे मूळ फ्रान्स देशातले. मात्र अमेरिकेत त्‍या वाद्याच्या तंत्रज्ञानात संशोधन होऊन आधुनिक ऑर्गन तयार झाला. त्‍या वाद्यामध्ये पाय मारल्यानंतर आत निर्वात पोकळी तयार होते. बटने दाबल्‍यानंतर हवा आत जाऊन स्वरनिर्मिती होते. याउलट पायपेटीमध्ये (हार्मोनियम) भाता मारल्यानंतर हवा आत जाते आणि बटने दाबल्यानंतर आतील हवा बाहेर येताना सूर उमटतात. मात्र ऑर्गनमध्ये पोकळी निर्माण झाल्यामुळे आवाज पायपेटीच्या तुलनेत जास्त घुमतो आणि अधिक गोडवा निर्माण होतो.

दाते यांनी आर्गन निर्माण करणारे छोटे वर्कशॉप उभारले आहे. त्‍याचे नाव ‘बाळा ऑर्गन्स अँड मुझीकल्स’ असे आहे. तेथे चार-पाच कामगार आहेत. तेथे पासष्ट हजारापासून एक लाख वीस हजार किमतीपर्यंतचे छोटे आणि मोठे अशा आकारातील ऑर्गन्स तयार केले जातात. एक ऑर्गन तयार होण्‍यास वीस दिवसांचा कालावधी लागतो. दाते यांनी ऑर्गन निर्मितीसाठी सिझन पाईन, जर्मन स्प्रूस वूड यांसारख्या उंची परदेशी लाकडाचा वापर केला आहे. ते इतर काही सुटे भाग (रीड्स) अमेरिकेतून मागवतात. तेथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ नेड फोनिक्स यांनी त्‍या वाद्यावर बरेच संशोधन केले आहे. दाते यांना फानिक्‍स यांचे मार्गदर्शन लाभले. त्‍याआधारे ते आयात केलेले सुटे भाग भारतात तयार करण्याच्‍या प्रयत्‍नांत आहेत. दाते यांच्‍या वर्कशॉपमध्‍ये तयार झालेले ऑर्गन इंग्‍लंड, अमेरिका, दुबई अशा देशांत निर्यात झाले आहेत. त्‍या वाद्याची दुर्मिळता पाहता दाते यांच्‍या ऑर्गन्सना चांगली मागणी आहे. उमाशंकर दाते ऑर्गन तयार करण्‍याच्‍या कामात मग्‍न असले तरी ते राजापूरच्‍या शाळेतील संगीत शिक्षक पदावर कार्यरत आहेत.

आदित्य ओक, राहुल गोळे, भरत बलवल्ली, जयंत फडके अशा अनेक कलाकारांनी दाते यांच्‍या वर्कशॉपमधून ऑर्गन्सची खरेदी केली आहे. आदित्‍य ओक यांनी ‘कट्यार काळजात घुसली ‘ या चित्रपटातील ‘मन मंदिरा’ गाण्यात ऑर्गनचा सुरेख वापर केला आहे. अमेरिकेच्या ‘रीड ऑर्गन सोसायटी’ आणि ‘द वीक’ यांसारख्या नियतकालिकांमध्ये दाते यांच्‍याविषयीचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. दाते यांना ‘दुनियादारी’ फाउंडेशन तर्फे ‘स्वराधीश सुधीर फडके’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

उमाशंकर (बाळ) दाते, 9405955611

– राधिका वेलणकर

About Post Author

15 COMMENTS

  1. सुंदर लेख .गावाकडच्या लोकांचे
    सुंदर लेख .गावाकडच्या लोकांचे काम……प्रसिद्धी मिळाली पाहिजे.

  2. सुंदर लेख .

    सुंदर लेख .
    बाळासाहेबांचं मन:पुर्वक अभिनंदन !

  3. मस्त आम्ही जाऊन आलो व आगँन
    मस्त आम्ही जाऊन आलो व आगँन बनवले आहेत ते पाहीले

  4. Good work and achievement by
    Good work and achievement by Shri Date.I wish him best wishes to produce more such products with higher degree of quality.

  5. राजेंद्र भडसावळे रत्नागिरी महाराष्ट्र राज्य भारत

    माझे एक परम मित्र, ऊत्तुंग
    माझे एक परम मित्र, ऊत्तुंग अस व्यक्तीमत्व ‘म्हणजेच आपले उमाशंकर तथा बाळ दाते. इलेक्ट्रीशियन ,संगीत शिक्षक, हार्मोनियम वादक, भजनी बुवा ऑर्गन वादक , ऑर्गन निर्माते या व अशा अनेक नावांनी ते आपल्या भागात ओळखले जातात.
    एकेकाळी अमेरिकेतून संपूर्ण जगात जाणारं ऑर्गन हे वाद्य गेली काही वर्षे नामशेष होण्याच्या मार्गावर असताना या अवलियाने या वाद्याला नवसंजीवनी मिळवून दिली. आज हेच वाद्य आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अडिवरे या दुर्गम भागात तयार होते. आणि हेच संपूर्ण भारतीय बनावटिचे वाद्य आज अमेरिकेच्या वाटेवर आहे हे सांगण्यास आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. आज त्यांच्या कार्यशाळेत सुमारे पन्नास ऑर्गनची निर्मिती पूर्ण झाली आहे . पं. तुळशीदास बोरकर. आदित्य ओक, भरत बलवल्ली या व अशा अनेक दिग्गज मंडळींनी त्यांच्या ऑर्गनला पसंती दर्शवली आहे.
    स्वराधीश सुधीर फडके यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून अशा हरून्नरी व्यक्तीमत्व असलेल्या या बाळासाहेब दातेंचा दुनियादारी फाउंडेशनने नुकताच स्वराधीश सुधीर फडके या नावाने पुरस्कार प्रदान केला. रू.एकावन्न हजार व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. हा सोहळा करवीर नगरीत केशवराव भोसले नाटय़गृहात आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला अनेक मान्यवर दिग्गज कलाकार, गायक , संगीतकार वादक मंडळी ऊपस्थित होती. सोहळा अत्यंत दैदीप्यमान असा झाला.
    अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यक्तीमत्वाचे कौतुक करयला शब्द अपुरे पडतील. मी त्यांचे अभिनंदन करतो. आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद !

    – राजेंद्र भडसावळे.

  6. Informative article..
    Informative article…Umashankar Date is doing a great job…His work is just amazing and innovative.His work is and Will be definitely useful in the field of music …We ..music lovers really thank u from bottom of our heart that you have taken a lot of efforts to bring back the Magic of organ for generations ahead…Your work will always be appreciated by all the musiclovers…We wish that your work will reach all over the world very soon…

  7. दुनियादारी फाऊंडेशन तर्फे
    दुनियादारी फाऊंडेशन तर्फे स्वराधीश सुधीर फडके पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन! ऑर्गन निर्मितीमध्ये प्रत्येक बारीक गोष्टीबद्दलचाही आपला अभ्यास आहे.
    आपण अमेरिकनांपेक्षाही सरस ऑर्गनची निर्मिती कराल हे नक्की.आपल्या ऑर्गन रिड्स निर्मितीलाही शुभेच्छा!
    _प्रशांत लेले.

  8. ऑर्गन संबंधीत प्रत्यक बारीक
    ऑर्गन संबंधीत प्रत्यक बारीक गोष्टीतही आपला अभ्यास आहे.आपण अमेरीकनांपेक्षाही सरस ऑर्गन निर्मिती कराल हे नक्की.आपल्या नवीन ऑर्गन रिड्स निर्मितीला शुभेच्छा!
    _प्रशांत लेले

  9. चंद्रकांत मने, पनवेल( संस्थापक सदस्य- पनवेल कल्चरल असो.

    ऑर्गन हे अतिशय दुर्मिळ अशा
    ऑर्गन हे अतिशय दुर्मिळ अशा वाद्याचे पुनरजीवन करून संगीत क्षेत्रासाठी विशेषतः संगीत नाट्य रंगभूमीसाठी एक फार मोठे मोलाचे कार्य केले आहे , त्यांच्या कार्याला या कार्याला मनःपूर्वक शुभेच्छा! ( चंद्रकांत मने, पनवेल -9768656484, 8082015305, 7021046774.)

  10. सुंदर लेख .
    बाळासाहेब दाते…

    सुंदर लेख .
    बाळासाहेब दाते यांचे मन:पुर्वक अभिनंदन !

Comments are closed.